Subscribe Us

फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनस फॉर सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम एंड डेमॉक्रॅसी


 फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशनस फॉर सोशल जस्टिस,  सेक्युलॅरिझम एंड डेमॉक्रॅसी   

    जाहीर आवाहन


२०२४ ची लोकसभा निवडणूक  विविध टप्प्यात होत असून १९  एप्रील रोजी प्रथम टप्प्यातील मतदान होत आहे.आम्ही समाजाला

विनंती करीत आहोत की यावेळी परिस्थितीचे गांभीर्य जाणून भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवारांना मतदान करून विजयी करावे. त्याची कारणे आम्ही नमूद करीत आहोत.

१.भाजप हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे बाहाण्याने मनुस्मृती आधारित हुकूमशाही आणण्याचे प्रयत्न करीत आहे.


२.त्यांना वर्तमान संविधान जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ,न्याय,धर्मनिरपेक्षता,लोकशाही, समाजवाद, प्रस्थापित करणारे संविधान हटवायचे आहे. कर्नाटक,राजस्थान, उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितले की नवीन संविधान निर्माण करण्यासाठी ४०० पेक्षा अधिक खासदार आम्हाला हवेत, म्हणून भाजपला निवडून द्या. त्याचप्रमाणे प्रधानमंत्रीच्या आर्थिक सल्लागारांनी देखील संविधान जुने आहे व नवीन संविधान आणण्याची गरज आहे, असे म्हटले.  यावरून भाजपाची संविधान बदलण्याची वृत्ती नजरेआड करता येत नाही. हे अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.


३. भाजप पक्ष धर्म आणि

जाती द्वेष निर्माण करणारा पक्ष आहे.


४.लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवून हुकुमशहा होण्याची पाऊले मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात

टाकलीत.

५.शिक्षण,कामगार,शेतकरी ,महिला इत्यादी बाबत हे सरकार संवेदनशील नाही, उलट घातक आहे,

या दहा वर्षात हे सिद्ध झाले आहे.

६.या सरकारने संघटित भ्रष्टाचार करून निवडणूक रोखे खरेदीचे माध्यमाने हजारो करोड रुपयाचा भ्रष्टाचार करून जनतेचा पैसा बरबाद केला आहे.

७.लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडून विरोधी पक्ष  नष्ट करण्याची पावले भाजपने टाकली असून ती देशविघातक आहेत.

८.मणिपूर दंगल सरकारद्वारा प्रायोजित असून त्यासमयी प्रधान मंत्री मूक - बधिर झाले आहे.

९.स्त्री ,दलित ,आदिवासी, मुस्लीम,शीख,ख्रिश्चन धर्माचे लोकांवर अन्याय- अत्याचार गेल्या दहा वर्षात वाढले आहेत.

१०. प्रचंड बेरोजगारी व महागाईने देश बिकट परिस्थितितुन जात आहे. देशाचे भविष्य अंधकारमय झाले आहे.


.या सर्व कारणांमुळे  जनतेने भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील सर्व मतदार- संघातील इंडिया प्रणित उमेदवारांना भरघोस मताने निवडून देण्यासाठी मतदान करावे असे आवाहन नागपुरातील 80 संघटनांचे फेडरेशन असलेल्या सामाजिक  संघटनांच्या वतीने करीत आहोत.

वंचित बहुजन आघाडी,बहुजन समाज पार्टी आणि इतर उमेदवार  ज्या पक्षांनी उभे केले आहेत, त्यामुळे मत विभाजन होऊन भाजपला निवडून आणण्यासाठी मार्ग मोकळा होतो, असे समाजाला वाटत असून ते विभाजन टाळून भाजपला पराभूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे पालन करण्याची

विनंती आम्ही विविध संघटनांचे प्रतिनिधीनाही करीत आहोत.

 

विनीत

प्रा. डॉ. सुखदेव थोरात, प्रा.डॉ. यशवंत मनोहर, 

एड. फिरदोस मिर्झा, 

डाॅ. अन्वर सिद्दीकी,  अरविंद गेडाम,  

प्रदीप नगराळे,जगजीत सिंग, मधुकर मेहकरे,  

डाॅ. त्रिलोक हजारे, डॉ. बी एस गेडाम, डॉ. संजय शेंडे, किशोर खांडेकर, विजय ओरके,सुनिता जिचकार,  जया देशमुख,  स्वाती शेंडे, अमन कांबळे,  ,डाॅ. बागडे, अरुण गाडे,अशोक सरस्वती बोधी, अमिताभ पावडे, दिलीप खोडके, ज्ञानेश्वर रक्षक, विलास भोंगाडे, डॉ, विमल थोरात, सुगंधा खांडेकर,डाॅ. निकेतन जांभूळकर, डॉ. सुषमा भड, डॉ. सुनील तलवारे, शरद वानखेडे, राज रक्षित, पद्माकर लामघरे, राहुल परुळकर,

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ इंजिनियर्स(बानाई), मराठा सेवा संघ,  महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम,  दक्षिणायन,  जिजाऊ ब्रिगेड,  संभाजी ब्रिगेड,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,  एएसएसई,  डॉ.  आंबेडकर ॲग्रीकोज असोसिएशन ऑफ इंडिया,  हिंद- जमात-ए- इस्लाम, ओबीसी महासंघ,  जागरूक नागरिक मंच, समता सैनिक दल,  राष्ट्रीय ओबीसी महासंघ,  सम्यक बुद्ध विहार टाकळी सिंग,  स्टुडन्टस इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया,  फोरम ऑफ डेमॉक्रॅसी अँड कम्युनल एमएटी,  एसबीआय बॅकवर्ड क्लास वेल्फेअर, आम्रपाली महिला मंडळ,  शाक्य मुनी मेमोरियल ट्रस्ट,  विश्वभूषण मानव कल्याण संस्था,  पीपल्स सोशल इन्स्टिट्यूट,  संविधान संस्कृती मिशन,  ज्योतिबा फुले अभ्यासिका,  ब्ल्यू व्हिजन फोरम,  राष्ट्रीय संयुक्त मोर्चा,  गीताई फाउंडेशन,  नशाबंदी फाउंडेशन महाराष्ट्र,  सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी अस्मिता मंच,  गुरुदेव सेवा मंडळ,  स्टुडन्ट केअर असोसिएशन, ऑल इंडिया बॅकवर्ड क्लास पोस्टल युनियन, तथागत बहुउद्देशीय संस्था,  अखिल कुणबी समाज नागपूर,  बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ,  विदर्भ जाधव कुणबी समाज,  फुले आंबेडकर ज्येष्ठ नागरिक मंडळ,  रिपब्लिकन विचार मंच, मागासवर्गीय कृषी कर्मचारी अधिकारी महासंघ,  विश्वभूषण मानव कल्याण संस्था,  रामटेके परिवार प्रतिष्ठान,  पश्चिम नागपूर भोजनदान समिती,  स्मृतीशेष दशरथ पाटील विकास संस्था,  लोखंडे नगर बुद्ध विहार,  सिद्धार्थ बुद्ध विहार,  असोसिएशन फोर सोशल अँड इकॉनोमिक इक्वॅलिटी,  पीपल्स सोशल इन्स्टिट्यूशन, राष्ट्रीय ज्योतिबा फुले अभ्यासिका,  आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचर,  बुद्धिस्ट एम्पॉवरमेंट संघ,  बी ए जी ए पी,  गर्ल्स ईसलामिक ऑर्गनायझेशन,  एम पी जे महिला सद्भावना मंच,  जी आय ओ, ओबीसी जनमोर्चा, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, ओबीसी अस्मिता मंच,  राष्ट्रीय परिवर्तन परिषद,  विदर्भ मोलकरीण संघटना,  बी ए एच ओ एस नागपूर,  डॉ.  बाबासाहेब आंबेडकर आयुर्वेदिक डॉक्टर्स ऑर्गनायझेशन,  डॉ बाबासाहेब आंबेडकर होमिओपॅथी डॉक्टर्स ऑर्गनायझेशन, 

डॉ बाबासाहेब आंबेडकर डेंटल डॉक्टर्स ऑर्गनायझेशन,  सत्यशोधक महिला महासंघ  महाराष्ट्र प्रदेश,  मैत्रेय संघ,  कल्याणी मल्टीपर्पज सोसायटी,  बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन,  खैरे कुणबी समाज संघटना  विदर्भ,  खेडुले कुणबी समाज,  बावणे कुणबी समाज,  संबुद्ध महिला संघटना, संजीवनी सखी मंच,  दीक्षाभूमी महिला समिती,  मुव्हमेंट 21,  रिपब्लिकन महिला ट्रस्ट,  सम्यक बौद्ध महिला मंडळ सुमन विहार नागपूर, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती,  असोसिएशन ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट नागपूर, ह्यूमन मेता फाउंडेशन.

Post a Comment

0 Comments