Subscribe Us

लदणी जीवनाची


लदनी जीवनाची


लदेणी एक प्रवास!

चालण्याचा अन जगण्याचाही !

अगणित पावलांचे ठसे अन पाऊल खुणाही,

हाच तो लमाण मार्ग,ठेचाळलेला,रक्तबंबाळ झालेला पण महामार्ग झालेला!

अगणित आले अन गेले 

पण तो संपला नाही.

नवे नवे रुप पालटुन पुन्हा अवतरला!

काळ हाही एक प्रवासी मार्ग,

पण तो दिसत नाही,

अनुभववा लागतो.

सुखदुःखे, चढउतार स्पर्शून जातात!

ओळखी अनोळखीचे भेटत जातात.

कांही मैलाची संगत देतात

अन लदेणीलाच जीव अर्पण करतात.विचार पेरत पेरत तो चालत राहतो.विचारांचा

सांगाडा भूमीच्या गर्भात विसावतो.

वाटसरू दोन फुले अर्पण करतो अन सांगतो पण शब्द नसतात.जेंव्हा पेरलेले रान उगवते अन असंख्य आवाज येतात आणि सांगतात,

याच मार्गाने लदेणी पुढे गेली आहे!

जीवनाची लदेणी अशीच असते.

जेंव्हा ती क्षणभर विसावते तेंव्हा मागे जनसागर असतो.

तो मात्र मजेत पुढच्या प्रवासाला निघालेला असतो,लदेणी मरतही नाही अन सरतही नाही ! तो मात्र

जीवनाचे गाणे गुणगुणत पुढे पुढे चालत राहतो!


जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

Post a Comment

0 Comments