Subscribe Us

गोरमाटी भाषिक गण समाजातील दिशाहीन पारंपरिक राजकीय चळवळ..?


 काकडवांदा


गोरमाटी भाषिक गण समाजातील दिशाहीन पारंपरिक राजकीय चळवळ..?


गोरमाटी भाषिक गण समाजातील सद्या प्रचलित असलेल्या पारंपरिक राजकीय चळवळीला माझं मुळीच समर्थन नाही. 

      मागील ७५ वर्षाचा राजकीय अनूभव लक्षात घेतल्यास ही पारंपरिक राजकीय चळवळ गोरमाटी भाषिक गण समाजाला आणि त्यांच्या मातृभाषेला संविधानिक ओळख मिळवून देण्यास असमर्थ ठरते. 

            गोरमाटी भाषिक गण समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय सत्तेत भागिदारी मिळवून देण्याची धम्मक फक्त 'अनुसूचित जमात'याच संविधानिक पासवर्ड मध्ये आहे. 

          लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय सत्तेत भागिदारी मिळाल्याशिवाय गोरमाटी भाषिक गण समाजाच्या सामाजिक,राजकीय,भाषिक आणि सांस्कृतिक प्रगतीला एक नव उजेड वाट गवसणार नाही. 

            नाही तर गोरमाटी भाषिक गण समाजाला आणि त्यांच्या मातृभाषेला संविधानिक ओळख मिळण्यासाठी आणखी ५०/६० वर्ष प्रतिक्षा करावी लागणार आहे,तो पर्यंत गोरमाटी भाषा आणि धाटी मेलेली असेल येवढे मात्र निश्चित.. ! 


         चला.. ही निवडणूक संपल्यानंतर एका ढवळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन उद्याच्या भावी पिढीच्या उज्वल भविष्य आणि भवितव्यासाठी *पाणसोरी* काढू या..अजून वेळ गेलेली नाही... 


          होडवाद,कसरेवाद,एकमेकांचे पाय धरून मागे खेचण्याची घाण प्रवृत्ती असलेल्या या  समाजाला 'अनुसूचित जमात' ही संविधानिक ओळख मिळविल्या शिवाय आता पर्याय नाहीच. 

*धोळे झेंडानं बट्टो कोनी लागे दा रे...!* (प्रतिभावंत कवी प्रा.अरूण पवार आणि प्रा.शंकर राठोड यांच्या गाजलेल्या काव्य मैफिलीतून साभार) 

       गोरमाटी गण समाजाच्या धाटीची अस्मिता असलेल्या धवल पताक्याचा ताठ बाणा सामुहिकपणे जपणे आज गरजेचे आहे.

        (धोळो झेंडा हेटं गोळा वेयेसवायी जात,भाषा आन् धरमेर नामकरणेरो एक डाटा शासनेनं उपलब्ध करन देतू आयेवाळो छेई.एक डाटा सवायी समाज आन् भाषानं संविधानिक ओळख मळणो मसकल छ.) 

         गोरमाटी भाषिक गण समाजातील ज्या पारंपरिक राजकीय चळवळीने गोरमाटी भाषिक गण समाजाच्या सामाजिक,राजकीय,भाषिक आणि सांस्कृतिक प्रगतीची पार वाट लावली त्याच राजकीय चळवळीचे आणखी समर्थन करायचे कांय? 

 प्रश्न आमचे... 

उत्तर तुमचे...! 


या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या गोरमाटी खासदारांचे मनपूर्वक अभिनंदन...!!!


            भीमणीपुत्र

     मोहन गणुजी नायक

Post a Comment

0 Comments