Subscribe Us

विश्वस्व धर्म सूर्य पाहो


विश्वस्व धर्म सूर्य पाहो

औद्योगिक नागरीकरणामुळे स्थळ व सामाजिक परिवर्तन सातत्याने घडण्याची प्रक्रिया सुरू असते.पूर्वीचे रूप पालटून त्यात आधुनिकता येते. बाह्य बदलामुळे समाजामध्ये आंतरिक बदल सुद्धा घडून येत राहतात.पेहेराव परिवर्तनाने बदल स्वीकारण्याची मानसिकता बंजारा समाजामध्ये तयार झाली त्यामुळेच समाजिकीकरणाला वेग आला.पूर्वी"मुसळ वायांम महत्वेर घटक वेतोतो, सासु चोटीर पाणी पितीती"आता शेंडी कोणी कापुन नेली?शेंडी नाही म्हणून प्रथा बंद!कालौघात अनिष्ट रूढी टिकल्या नाहीत.सूर्योदयापूर्वी गोपाळ मुहूर्तावर होळीनंतर होणारी लग्ने सोयीनुसार लागु लागली. सामाजिक अभिसरणातून हे बदल घडुन आले.शिक्षण,नवे नवे तंत्रज्ञान व औद्योगिकरणामुळे लोकरितिरिवाजामध्ये पारंपारिकता जावून आधुनिकता आली. राहणीमानात बदल घडुन आला. काळाबरोबर प्रथा, रूढी प्रवाहित होत राहतात.धार्मिक कल्पना, रूढी व धाटीचे विघटन होवून नवी मूल्ये स्थापित होत राहतात.दैनंदिन जीवन कायद्याने थोडेच चालते!म्हणून आपण कांही पूर्वापार चालत आलेल्या वंशपरंपरा पाळतो.शैक्षणिक व तांत्रिक कौशल्यावरून सामाजिक दर्जा ठरतो त्यामुळे जीवनशैली लवचिक व व्यापक झालेली दिसते कारण प्राप्त व्यवसाय नव्या जीवनशैलीला जन्म देतात. भाषिक गट निर्माण होतात जसे की, डॉक्टर, नर्सेस, कंपाउंडर यांची भाषा व मूल्ये यामध्ये वेगळेपण दिसू लागते. भाषिक मिश्रण तयार होते.प्रादेशिक व शास्त्रीय भाषेचा प्रभाव पडतो हे कसे नाकारणार!आपण"नसाब"या व्यवस्थेला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत,नसाब ही जातपंचायत!पण तिला न्यायिक अधिष्ठान कोठे आहे. नाईक साहेबांनी ही व्यवस्था कायद्याच्या चौकटीवर भक्कमपणे उभी रहावी म्हणून न्यायपंचायतीचा पर्याय दिला होता पण कांही काळानंतर ती व्यवस्था पूर्णपणे बंद पडली.ग्राम तंटामुक्ती समित्या आल्या!लोकशाही प्रधान व्यवस्थेत राहत असतांना नवा रचनात्मक सुसंगत विचार स्वीकारण्याची आज गरज निर्माण झाली आहे.बंजारा समाज एक व्हावा असे प्रामुख्याने आज बोलले जात आहे. समाजाला फक्त विचारच एकत्र बांधू शकतो. पण त्या अंगाने आपण या विषयाकडे बघतच नाही असे दिसते.वसंतराव नाईक साहेब यांचे सामाजिक व राजकीय विचारामुळे प्रगतीच्या खाणाखुणा समाजामध्ये दिसत आहेत हे नाकारता येणार नाही.तांड्यातांड्यात उच्च शिक्षित वर्ग निर्माण झाला. न्यायाधीश, वकील, उच्च पदस्थ सनदी अधिकारी तयार झाले.अशिक्षित किंवा साक्षर अर्धशिक्षित वंशपरंपरेने तांड्याचे नायक कारभारी होवू लागले. सामाजिक असमतोल निर्माण होवून दर्जा व प्रतिष्ठेचे मापदंड बदलले.सारंग नायकाने प्रथमच तांडा व्यवस्थेत कांही नव्या परंपरा निर्माण केल्या.नायकाची निवड वंश परंपरेने न करता अनुभवी,शिक्षित व आधुनिकतेची दृष्टी असलेल्या व्यक्तीमधुन सर्वसंमतीने करावी.नायक हा तांड्याचा मुख्य न मानता पालक मानला जावा. कारभारी व ज्येष्ठांच्या सल्ल्याने त्याने तांड्यात काळानुरूप नव्या परंपरा,नवे विचार रुजवून ऐक्य भावना वाढीस लागेल या दृष्टीने प्रयत्नशील असावे.ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी बंजारा समाजाला एकसंघ करण्याचा प्रयत्नही केला होता. समाजाची दुःखे राष्ट्रीय नेत्यांसमोर अधिवेशने घेवून मांडली.आज पद लालसेने संघाची स्थिती आपण वाईट करून ठेवली. किमान सदस्य शुल्क ठेवून ५ कोटी सदस्य नोंदणी करता आली असती व प्रत्येक घटकाला संघ आपला आहे ही जाणीव निर्माण झाली असती. म्हणजे एकच मुख्यसंघटन!

संत सेवालाल महाराजांचे विश्वकल्याणाचे तत्वज्ञान"सेन साई वेस"जोरकसपणे न मांडता तुलनात्मक दृष्ट्या मांडले जात आहे. नाईक साहेबांनी स्थापन केलेलाऑल इंडिया बंजारा सेवा संघ, संत सेवालाल महाराज, शुभ्र ध्वज इत्यादी! ही प्रतिके बंजारा समाजाला एकत्र बांधण्यात मैलाचा दगड ठरु शकतात.खरेतर गोर बंजारा हा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवलेला संप्रदाय आहे. समाजातील अनेक घटक आक्रमणाच्या प्रभावाने,हिंदु धर्मातील चातुर्वर्ण्य विषमतेमुळे मुस्लिम, शिख, ख्रिश्चन व बौद्ध धर्मात परिवर्तित झाले आहेत त्यांना परतीचे मार्ग  खुले होण्यासाठी "गोरधर्म"हाच सर्वोत्तम पर्याय आहे.गोंधळलेली स्थिती नव्याने अनेक प्रश्न निर्माण करते. वाटा अंधुक दिसु लागतात. नव्या धर्मामुळे अखिल वैश्विक बंजारा समाज एकाच सूत्रात बांधल्या जावू शकतो!विश्वस्व धर्म सूर्य पाहो!हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील कडवे!जगातल्या एकमेव भास्कराने मानवतेने ओतपोत भरलेला  एकच"मानवता धर्म" पहावा!हे त्यातले तत्वज्ञान!हिंदु, जैन, शिख, बौद्ध हे जसे संप्रदाय होते तसाच गोर हा सुद्धा एक संप्रदयाच आहे. आता हा संप्रदाय सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी धर्म म्हणून संस्थापित व्हावा!सामाजिक ऐक्याचा हाच मुलभूत मार्ग आहे.


प्राचार्य जयसिंग द जाधव पातूर जि अकोला

2/25/22, 19:53 - Jaisingh Jadhao: गावाकडच्या कथा - (भाग 5)

Post a Comment

0 Comments