Subscribe Us

हेवी वेट-लाईट वेट


 हेवी वेट-लाईट वेट


  इंग्रज आमदानीत भारतातील कांही सर्वच्या सर्व जाती किंवा जमातीला जन्मजात गुन्हेगार ठरवून निर्बंध लादले गेले व त्याचे दुष्परिणाम व यातना स्वातंत्र्यानंतरही १९५२पर्यंत त्यांच्या वाट्याला आल्या. हा प्रजासत्ताकाचा केवढा मोठा अपमान आहे.

सुलताना, भांतु जातीचा असाच एक जन्मजात गुन्हेगार जातीतील दरोडेखोर होता.गरिबी काय असते हे त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने गरिबांचा एक पैसाही लुटला नाही, मदतीची याचना कधी झिडकारली नाही. लहान लहान दुकानदारांकडून त्याने पैसे देऊन वस्तु खरेदी केल्या, फुकट लूटमार करून घेतल्या नाहीत.स्त्रियांच्या अब्रुवर हात घालणारांचे हात कलम केले. गरीब लोकांबद्दल त्याला आपुलकी होती. त्याचे लक्ष ब्रिटिश खजिना व मालमत्तेवर असे!

त्याला जीवंत पकडुन देणाऱ्यास बक्षीस होते.सडसडीत बांध्याचा हा तरुण सेमी मिलिटरी कपडे घालत असे.५०-६० बंदूकधारी तरुणांची ती टोळी होती. मजबूत गुन्हेगारीच जाळ मजबूत होत.सरकारजवळ त्याने केलेल्या गुन्ह्याच्या ५० फाईली होत्या.हर्बर्ट,गारप्पू, तराई भाबरचा तो घनदाट जंगल भाग!कालढुंगी पासून कांही अंतरावर!परिसरातील लोकांची त्याला सहानुभूती होती मात्र इंग्रजांचा तो कर्दनकाळ होता तरीही मानवता व वचनाचा तो पक्का होता. सुलतानाला पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने फ्रेडी या तरुण ऑफिसरची नेमणूक केली व सोबतीला ३०० पोलिसांचा स्पेशल डकैती फोर्स दिला.

फ्रेडीला अपयश येत होते. शेवटी त्याने सुलतानाला भेटीसाठी बोलाविले, अभयाचे वचन दिले.विस्तीर्ण झाडाखाली जंगलात भेट झाली. सुलतानाने फ्रेडीला खाण्यासाठी एक कलिंगडे आणले,निसंकोच खा!

फ्रेडीने कलिंगडे खाल्ले.भेट संपली.

तीन दिवसांनी फ्रेडीला सुलताना कडून पत्र आलं-तुमच्याकडे दारूगोळा व बंदुका कमी आहेत असे दिसते! गरज पडली तर मी तुम्हाला हत्यार पुरविण!ढिसाळपणा करू नका!

नमस्ते!सावध रहा!तुमच्यावर मला पकडण्याची जबाबदारी इंग्रज सरकारने दिली आहे. नव्हे तर ती तुम्ही स्वतः घेतली आहे. उद्या कदाचित मी व माझे साथीदार पकडल्या सुद्धा जातील, कोर्ट मला मृत्युदंडही देईल, पण मी जेंव्हा नसेल तेंव्हा माझ्या परिवाराची आपण काळजी घ्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करत आहे.

दिवसामागून दिवस जात होते. एका रात्री सुलताना झोपला होता. फ्रेडीने त्याला कैद केले. कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने फाशीची शिक्षा दिली. समाज गुन्हेगारापासून संरक्षण मागतो पण सुलतानाला फाशी दिल्या गेली तेंव्हा कोठडीवर पहारा देणाऱ्याच्याही मनात आदराने अश्रू तराळले.

जन्माने गुन्हेगार असलेल्या भांतु जातीप्रमाणेच बंजारा समाजाची वेदना असावी. जन्माने गुन्हेगार असल्याचा शिक्का मारलेल्या जातींना पांढरपेशा समाजात स्थान मिळण्याची संधी नाकारल्या गेली होती म्हणून लहान लहान गुन्ह्याकडे त्यांना जावे लागले.हा समाज प्रजासत्ताकाचा एक भाग आहे, हे १९५२पर्यंत समजल्या गेले नाही. हे दुर्दैव आहे! फ्रेडीला भेटायला जातांना सुलताना हातात सुरे, बंदुका घेवून नव्हे तर कलिंगडे घेवून गेला होता. हे इतके गुण विमुक्त जाती बद्दल विचार करतांना अंतर्मुख व्हायला पुरेसे नव्हते काय?

त्यासाठी३१ऑगस्ट१९५२ उजाडावा लागला!या घटनेवर"डाकू सुलताना"हा चित्रपट निघाला. सुलतानाने केलेली विनंती फ्रेडीने अमलात आणली, त्याच्या परिवाराची काळजी घेतली, सुलतानाच्या मुलाला ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी पाठविले. उच्च शिक्षण घेवून मुलगा जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून निवृत्त झाला आहे.


प्राचार्य जयसिंग द जाधव

Post a Comment

0 Comments