Subscribe Us

सेवाभाव


 -------सेवाभाव------


अंधारलेल्या भयाण त्या राती,

उगवला तारा क्षितिजा वरती !

दिसु लागल्या उजेडाच्या वाटा,

निर्मिल्या तु जगण्याच्या पायवाटा !१!


विस्तारले तु परीघ आशा,

बदलल्या ललाटी भाग्य रेषा !

जगी जगावे माणुस व्हावे,

सभोवती आपुल्या जीवे 

जपावे !२!


गाव अपुले विवेकी विचारु,

गतिमान चक्रे बदले स्वीकारु !

येता जरी संकटे गनिमी कपटे,

झुंजू एकसंघे नव्हे एकटे !३!


बाहुत माझ्या शुद्धचित यावे,

ध्यानात माझ्या दुबळेही तरावे !

हा डाव जीवनी सोंगट्याचा,

जसा खेळ ऊन सावल्यांचा!४!


वाट माझी,बोट माझे धरावे,

जिथे असु जसे असु मज स्मरावे !

पळतील भुते कराल विळखे,

माझिया वचने सन्मार्ग उमजे !५!


खवळलेल्या सागरा, दीपस्तंभ मी,

दिशाहीन नाविकांचा आधार मी !

मृत्तिकेतुन झेप घेणारा  कोंब मी!

नभातून धरेवर बरसणारा 

थेंब मी!६!


रणांगणी केला पाडाव शत्रुचा,

अंतरी विनाश षढरिपुचा !

जाणिजे मोल ज्ञानेंद्रियांचे,

शुभ चिंतावे ध्यास सकलांचे !७!


पळस फुलावा,बेधुंद व्हावा, 

तैसे चि बहरावे सकल जन !

रंगात रंगुन एक वर्ण व्हावे,

भेदाभेद उरुची नोहे,शुद्ध व्हावे मन !८!


याच भूमीवरी रोवले मी बीज,

अंकुरले दिशादाही जपावे तीज !

डौलदार वृक्ष, अनेकांना छाया!

लावीतसे माया, तुज सेवाभाया !९!


जयसिंग द जाधव पातूर जि अकोला(9923482062)

Post a Comment

0 Comments