Subscribe Us

गामेरो पुढारी आचो चावच


 गामेरो पुढारी आचो चावच

होळी खेळण्यात लोकांना विशेष करून बंजारा समाजाला फार आनंद येतो.इतर समाजापेक्षा बंजारा समाजाची होळीचे वैशिष्ट्य वेगळे आहे.इतर समाज एकाच पारंपरिक पद्धतीने होळी खेळताना दिसतात परंतु या समाजाची होळी वेगळ्या स्वरूपाची आहे.इतर समाज हा सायंकाळी च होळी दहन करतो परंतु बंजारा समाज रात्रभर गीतं गाणे,डफड्याच्या तलावर नाचतो आणि सकाळी सकाळी या समाजाची होळी दहन होत असते.होळीची सुरुवात फार आधीपासून सुरू होते.गावतील कारभारी च्या घरी दररोज संध्याकाळी लेंगी,जवळपास एक महिन्याच्या आधी पासूनच होळीची सुरुवात होते.खुप वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.हा समाजाची लोकगीते खुप प्रगल्भ आहे, समाज मागासलेला असल्याकारणाने या लोकगीतांची दखल भारतात कोणतेही सरकार घेत नाही.या समाजात तिजत्योहार या उत्सवाचे गाण्याची वेगळी चाल, दिवाळी ला सुध्दा प्रबोधनात्मक गीते आहेत आणि त्याची चाल वेगळी.मी होळी हा सण साजरा करतो किंवा नाही करत हा भाग वेगळा परंतु या होळीच्या निमित्ताने मी एक लेंगीचे गाने ऐकून,मी खूप प्रभावित झालो.ते लेंगी गाणे आहे ते असे

         गामेरो पुढारी आचो चावच,

         जना ओरे गामेरी शान आवच !!धृ!!

         गामेरो पुढारी पिद्याड्या चायेनी!

          दारू गांजीयाती वूतो दूर चावच!!

         जना ओरे गामेरी शान आवच

         गामेरो पुढारी अभिमानिया चायेनी!

         सेरे सारू वोरो मन आचो चावच!!

         जना ओरे गामेरी शान आवच

       गामेरो पुढारी लावालुडीया चायेनी!

         जेरी वात जेन केयेन चावच!!

             जना ओरे गामेरी शान आवच

         गामेरो पुढारी भानगुडीया चायेनी!

           बिना पिसारो काम करेन चावच!!

            जना ओरे गामेरी शान आवच

     गामेरो पुढारी भांडखोरीया चायेनी!

             सेनूती मिठो बोलेन चावच!!

             जना ओरे गामेरी शान आवच

    या लेंगी ला एकता दुर्गा माता मंडळ वडगाव ढाकोडी ता‌. दिग्रस जि.यवतमाळ यांनी प्रसिद्धी केले आहे.गितकार आहे  शाहीर शामराव हरलाल चव्हाण व उदेसिंग चव्हाण यांच्या सोबत गायिका आहेत सौ.शिलाबाई प्रेमसिंग चव्हाण,सौ.रेणूकाबाई प्रकाश चव्हाण,सौ.सानाबाई जयसिंग चव्हाण व सौ. सुलोचना बाई देवसिंग चव्हाण व मधूर डफडा वादक योगेश देविदास राठोड.

    ही लेंगी आपण एकदा जरूर ऐका.आपल्या डोक्यात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही.

    या लेंगी मध्ये समाजात नेता आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य कसे असावे हे अधोरेखित होते.

    प्रत्येक समाजात नेतृत्वाची आवश्यकता असते,ते क्षेत्र कोणताही असो, ते राजकीय असेल अथवा सामाजिक किंवा धार्मिकही असू शकते, नेतृत्वविना कोणताही समाज अस्तित्वहीन असतो.नेता आणि त्यांचे नेतृत्व कोणताही समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका असते.

                    प्रा.नारायण जाधव तांडेवाळा

                     दहेली(तांडा) ता.किनवट

                           अमरावती

                         9403619186

Post a Comment

0 Comments