Subscribe Us

गोरमाटी (बंजारा) भाषेच्या जतन संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जोपासणारा दिवाळी अंक*


 गोरमाटी (बंजारा) भाषेच्या जतन संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जोपासणारा दिवाळी अंक

दमाळ प्रकाशन चा 'आरोळी विशेषांक ' - गोरमाटी बंजारा भाषेच्या जतन संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जोपासणारा दिवाळी अंक


चंद्रपूर येथील दमाळ प्रकाशन या संस्थेचे प्रकाशक , एक धडपडणारा बंजारा तरुण गणेश राठोड , करमठोट, गोरमाटी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सदैव धडपड करणारा हा विनाअनुदानित तत्वाच्या शाळेवर काम करणारा शिक्षक . सामाजिक बांधिलकी जोपासत दमाळ प्रकाशन नावाची एक प्रकाशन संस्था तयार करतो . विविध पुस्तकांचं , संपादन प्रकाशन करत असतो .2023 च्या दिवाळी निमित्त जो अंक काढला त्या आरोळी विशेषांकाचे प्रकाशन त्यांनी केले आहे .


 विशेषांक मध्ये संपादकीय लेखापासून तर कविता लेख या गोष्टींचा खूप चिंतनशील पद्धतीने संपादन केले आहे . समाज विकासात योगदानासह  बंजारा  भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी एक प्रेरक सांस्कृतिक ठेवा  आहे .


गजानन सूर्यभान भिंगारे यांनी ग्लोबल इंटरनेट कॅफे चंद्रपूर येथून या दिवाळी अंकाची सुंदर रंगीत सजावट केलेले आहे आणि पौर्णिमा ग्राफिक्स चंद्रपूर यांनी छपाई केलेला हा अंक आहे .

या अंकामध्ये 'तलफ ' या शीर्षकाचा एक लेख वाकडोद गोविंद पवार यांनी लिहिलेला आहे .लेखन चळवळीच्या संदर्भात लिहिलेल्या या लेखातून लेखनाची गरज का आहे हे स्पष्टपणे मांडलेलं आहे .

कवी लेखक राहुल सिंधू पालतिया यांचा 'गोरमाटी आन डॉ.बाबासाहेब आंबेडकर ' या शीर्षकाचा लेख उद्बोधक आणि प्रेरणादायक आहे .

रम्या प्रभ्या तांड्याचा सरपंच आस क्या , पक्या यांच्यातील गोरमाटी भाषेतील संवाद त्यातून विविध कायदे आणि घटना निर्मितीची गोष्ट वाचकांना कळते . या संवाद प्रसंगात लेखकाने स्वतःची 'गोरमाटी तोन आंबेडकर कळो कोनी ' या शीर्षकाची कविता सादर केली आहे .

मुलांना शिकवण्याचा सल्ला पुस्तक वाचायला लावणे तांडा घडावा यासाठीची तळमळ या संवाद लेखनातून राहुल सिंधू पालथी यांनी मांडलेली आहे .तांड्यामध्ये रोज संध्याकाळी संविधान वाचण्याचा उपक्रम सुरु करण्याचा विचार या लेखातून मांडण्यात आला आहे .

या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या कविता सुद्धा वाचनीय आहेत .

चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ता अभियंता संजय राठोड यांचा धोळो हांगोळो (पांढरे वादळ ) या शीर्षकाचा लेख बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवितो .सोबतच बंजारा समाजाच्या शासकीय अडचणी आणि बंजारा समाजावरील सामाजिक आक्रमण याविषयी मत व्यक्त करतो मत व्यक्त करतो .

लकणी या कवितेतून विश्वनाथ राठोड यांनी लेखन वाचनाचे महत्त्व प्रबोधनात्मक पद्धतीने मांडलेलं आहे .

नामदेव जाधव लोलडोह राजुरा यांचा संकलित लेख 'तीज गोरमाटी सण ' हा बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडवितो .

पोलीस दलात कार्यरत असलेले राजुरा पोलीस स्टेशनचे सुदाम हरी राठोड यांनी दानशूर नानूजी नायक या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन देणारा लेख या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आलेला आहे .


कवी संतोष जाधव यांची 

'आपणेच रच ' या शीर्षकाची कविता मार्गदर्शक आहे आहे .'पाणी ' या कवितेतून कवी प्रभाकर पवार यांनी जीवनाचा सिद्धांत मांडला आहे .

दमाळ प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून बंजारा गोरमाटी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी हा मुद्रण  स्वरुपातील दिवाळी अंक प्रकाशित करुन गणेश राठोड, करमठोट यांनी सामाजिक प्रबोधनाकडे वाटचाल सुरू केली आहे .

गोरमाटी बंजारा भाषेच्या जतन संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जोपासणारा दिवाळी अंक  प्रकाशित केल्याबद्दल त्यांच्या या अतुलनीय कार्याला हार्दिक शुभेच्छा


एकनाथ लक्ष्मण गोफणे

जळगाव

Post a Comment

0 Comments