Subscribe Us

चंद्रपूर लोकसभा उमेदवार मा अशोक भाऊ पवार यांचा अल्प परिचय


 सन्माननीय निलयभाऊ पवार, नमस्कार, जय सेवालाल*

आपण अत्यंत सुंदर विवेचन केले आहे...आपले खुप खुप आभार*

म्हणूनच आम्ही चंद्रपूरकर स्वतः बाहेर पडून समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सन्माननीय अशोक भाऊ राणाजी राठोड यांचे नेतृत्वात समाजातून हरवलेले तळागाळाचे राजकारण... या तळागाळातील आपल्या बांधव, भगिनींसाठी, यातूनच नेतृत्व उभे करण्यासाठी सज्ज झालो आहोत... आज आरक्षण बचावाचा लढा... जो समाजासाठी फार महत्त्वाचा आहे... या लढ्याला मरणासन्न अवस्थेतून बाहेर काढत... सन्माननीय राजेश भाऊ राठोड बुलढाणाकर यांच्या कार्यावर विश्वास ठेवून हा लढा पुढे नेण्यासाठी, तो बुलंद करण्यासाठी जिवतोड मेहनत घेऊन तसेच भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या माध्यमातून जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे... रखरखत्या उन्हात आम्ही चंद्रपूरकर मंडळींनी जिल्ह्यातील सगळे तांडे पादाक्रांत केले आहे....

चंद्रपूर जिह्यालगतचे तांड्यात सुद्धा आरक्षणातील बोगस घुसखोरी बदल बंजारा समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे...

स्वतः सन्माननीय अशोक भाऊ राठोड व संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दिगंबर भाऊ राठोड यांनी डिसेंबर, जानेवारी महिन्यात अख्या महाराष्ट्र राज्य भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेच्या रजत महोत्सवी वर्षात होणार अधिवेशनाचे निमंत्रण देण्यासाठी, समाजात, कर्मचारी बांधवात जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौरा केलेला आहे...*

साहेब आपण फारच सुंदर विवेचन केलेले आहे त्यानुसार WhatsApp Univercity वर तर प्रसार प्रचार कराच, परंतु आपली नाळ आपल्या तांड्यातील शेवटच्या माणसाशी जोडा... सांगण्याचे तात्पर्य की, तुम्ही म्हटल्याप्रमाणे #जो पर्यंत तुम्ही तांडेच्या-तांडे, गाव, खेडे, बाजार, शहरी भागातील सर्वसामान्य जनता, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर कामगार, कारागिर कष्टकरी, नोकरदार महिला यांचे सोबत जावून संवाद साधणार नाही, तो पर्यंत तुम्ही पुढे येऊ शकत नाही, तुमची धडपड, तुमची तळमळ निर्विवाद असणे, प्रामाणिक असणे आवश्यक आहे...

म्हणूनच आता प्रस्थापित लोकांमधून नाही, तर सामान्य जनतेतून जनहिताची, समाजाची, समाजाच्या बारीक सारीक प्रश्नांची जाण असलेल्या, निष्कलंक, निष्ठावान, जनतेशी प्रामाणिक असलेल्या नेतृत्वाला पुढे करून त्यांच्या माध्यमातून राजकीय शक्ती निर्माण करणे काळाची गरज आहे... आज रोजी प्रस्थापित नेतेमंडळी समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष करीत असल्याचे मागील बंजारा आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून #भामटा# हा शब्द वगळण्यात येऊ नये... हा विषय विधानसभेच्या पटलावर असतांना त्याची प्रचिती आली आहे... दोन तिन बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकप्रतिनिधींनी त्यावेळी मदत केली आहे... पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात जाऊन कोणीही पुढे आलेला नाही...

म्हणून जनसामान्यांचे आवाज बुलंद करणारे नविन नेतृत्व आता तयार गरजेचे झाल्याने त्यांची सुरूवात आम्ही चंद्रपूरातून सन्माननीय अशोक भाऊ राठोड यांचे माध्यमातून केली आहे...ते येत्या लोकसभा निवडणुकीत १३, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघातून #जय विदर्भ पार्टी# व या पार्टीला समर्थन देणार्या १२ पार्टीचे संयुक्त उमेदवार म्हणून आज नामांकन दाखल करीत आहे... चला आज त्यांना सदिच्छा देऊया, या लोकसभेत ते समाजाचे नेतृत्व करणारे खासदार व्हावे या करीता त्यांचे अभिष्टचिंतन करूया...

त्यांचा अल्प परिचय

बंजारा समाजाचे धडाडीचे उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये उभे असलेले आदरणीय अशोकभाऊ राठोड यांचा थोडक्यात परिचय*

 *कोण आहेत अशोक भाऊ राठोड*?

 जिल्हा परिषद चंद्रपूर येथून लेखाधिकारी या पदावरुन निवृत्त . 

मुळगाव -वागदा, तालुका केळापूर ,जिल्हा  यवतमाळ

*प्रसिद्ध संत राणाजी महाराज यांचे चिरंजीव.*

 पत्नीचे नाव- सौ अनिता अशोक राठोड( शिक्षिका)

(सासरे- श्री सकरूजी रेखाजी पवार मु. पो. शिवनी, ता. घाटंजी, जिल्हा यवतमाळ हल्ली मु. पो. इस्तारी नगर, घाटंजी)

मुलगा डॉ स्मित, एमबीबीएस  appearing for PG

मुलगी डॉ. श्रुती राठोड बीडीएस appearing for PG

भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्थेचे राष्ट्रीय महासचिव जिल्हा पासून तर राष्ट्रीय महासचिव पर्यंत कारकीर्द.                      भाजप आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेमध्ये राजपूत भामटा यांचा भामटा शब्द वगळण्याबाबत ठराव मांडला त्यात भामटा शब्द न वगळण्याबाबत आणि एस आय टी स्थापन  करण्यासाठी या विरोधात विधान परिषदेमध्ये मा. आमदार राजेश राठोड यांच्या मार्फत पाठपुरावा करण्यासाठी स्वतः जातीने हजर राहून राजेश राठोड यांना सर्व पार्श्वभूमी समजून सांगितली व विधानसभेतील तो प्रश्न खोडून काढावा यासाठी पुढाकार घेतला. तसेच आरक्षणा संदर्भात मां.*सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्ली येथे याचीका दाखल करुन  मा. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली येथे हजर राहतात.* आजही ते प्रकरण सुरू आहे.

सामाजिक कार्य*                  शासकीय सेवेत असताना शासनामार्फत महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला . तसेच महाराष्ट्राच्या लेखा परिक्षेत प्रथम क्रमांकाने (First Merit) गुणवत्ता प्राप्त करुन एक आगळेवेगळे प्रतिबिंब रोवले. त्यांनी आतोनात प्रयत्न करुन समाजासाठी एक ॲम्बुलन्स  ऊपलब्ध करून दिली.  अनेक गोरगरीब रुग्णांना ती जीवनदायी म्हणून फायद्याची ठरली. कोरोना कालावधीत सुद्धा त्याचा फार मोठा फायदा झाला .  स्वतः पुढाकार घेऊन  चंद्रपूर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सव, वसंतराव नाईक चौक निर्मिती ,सुशोभीकरण, वसंतराव नाईक जयंती व बंजारा समाजाचे होळी व इतर सण साजरी करण्याची परंपरा सुरू केली.

 चंद्रपूर येथे स्वतः पुढाकार घेऊन संत सेवालाल महाराज मंदिर , माता जगदंबा मंदिर आणि सार्वजनिक वाचनालय ऊभे करण्यामागे फार मोठा सिंहांचा वाटा आहे.घुसख़ोरी भामटा प्रकरणात पांढरे वादळ मोर्चा, आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण या पुस्तकावर बंदी, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकावर निषेध , शाळेत विद्यार्थ्यांना ओळख पत्राचे वाटप, नाॅन क्रिमीलेअर साठी शासनास पत्रव्यवहार, समाजातील गरीब मुलींना दत्तक घेणे, फ्लोराईड युक्त पाण्यासाठी पत्रव्यवहार, स्वतः वारंवार रक्त दान करुन अनेक लोकांचे जीव वाचवले. अशा अनेक प्रश्नांसाठी झटत आहे.

जिल्हा परिषद चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेमध्ये सतत पंधरा वर्षे भरघोस मताने निवडुन येत होते. त्या संस्थेच्या अध्यक्ष, सचिव या पदावर उत्कृष्ट कार्य केले.  त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणुन त्यांची ओळख झाली. 

भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून ओळख* 

लेखाअधिकारी पदावरून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना शासनाच्या कार्यालयात लेखा परिक्षणाचे काम देण्यात  येत आहे.

अशोक राठोड स्वतःजवळ पैसे नसताना लोकांनी त्यांना उभा केलेला उमेदवार* का उभे आहेत ते तर ....

आज पर्यंत  राष्ट्रीय पक्षांनी बंजारा समाजाचा केवळ उपयोगच केलेला आहे. फायदा मात्र काहीही नाही . देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे  झाली अजूनही तांड्यांना महसुली दर्जा नाही. लाजिरवाणी बाब आहे. आजही अनेक तांडे विकासापासून कोसो दूर आहेत . आपण शिकलो, आपला परिवार शिकला तांड्याचे काय ?

महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची दोन कोटीच्या वर लोकसंख्या असतानाही 48 लोकसभा मतदारसंघां पैकी एकाही ठिकाणी बंजारा समाजाच्या उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाकडून तिकीट दिल्या जात नाही.  समाजासाठी ही फार मोठी चिंतनाची बाब आहे .किती दिवस राष्ट्रीय पक्षासाठी चाकरी, लाचारी , गुलामी  करायची.  त्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघांमध्ये बंजारा समाजाने आपला उमेदवार उभा करावा. जेणेकरून समाजाची ताकद या पक्षांना कळल्याशिवाय राहणार नाही. समाजाने सुद्धा आपल्याच समाजाच्या उमेदवाराला पाठबळ द्यावे. ही विनंती.

अशोक राठोड चंद्रपूर यांच्यासोबत कोण आहेत*?

◾ *बारा घटक पक्षांचा पाठिंबा*.     जय विदर्भ पार्टी, शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती, आरपीजे सोशालिस्ट पार्टी, लोक स्वराज्य पार्टी, संयुक्त भारत पक्ष, विरोकी विर पार्टी, रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी, बंजारा बहुउद्देशीय संस्था   देशोन्नतीचे सर्वेसर्वा प्रकाश पोहरे, भारतीय मूस्लीम समाज परिषद, इत्यादी अनेक पक्ष/संघटनांचा पाठींबा.

◾ जिवती, कोरपना, राजुरा ,चंद्रपूर, गोंडपीपरी तालुक्यातून शैकडो कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागलेले आहेत.  तसेच बहुजन समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या जाहीर पाठिंबा.

◾ *वागदा येथील प्रसिद्ध गुरु व भजनकार संत राणाजी महाराज यांचे जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी , पांढरकवडा,वणी, मारेगाव, आर्णी तालुक्यामध्ये 10000 भक्त मंडळी व भजनकार आहेत त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचारामध्ये सहकार्य मिळत आहे*.

          चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांमध्ये चंद्रपूर यवतमाळ या दोन जिल्ह्यात 16 तालुके जवळपास २०२५ बुथ येतात. त्या ठिकाणी त्यांचे प्रचार कार्य सुरू झालेले आहे. गरज आहे फक्त आपल्या आशीर्वादाची . शक्य असेल तर फोनवर आणि तोंडी प्रचार करा. 

◾ *निवडून आले तर काय करणार*

1. विदर्भ राज्य मिळविण्यासाठी कटिबद्ध.

2. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देणे. (शेतकऱ्यांची मूळ मागणी असुनही  कोणत्याच पक्षाने पूर्ण  केली नाही व करणारी नाही)

2. रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये मोठमोठे कारखाने स्थापीत करणे. स्थानिक ठिकाणी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करून देणे. जेणेकरून मुंबई' औरंगाबाद सारखे शहरांमध्ये पुन्हा गर्दी वाढणार नाही. (कोणत्याच नेत्याच्या डोक्यात ही कल्पना नाही)

3. जातीनिहाय जनगणना करायला भाग पाडणे. 

4. बहुजनांच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर उपलब्ध करून देणे.

5. पहिली ते पदवीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणे.

6. पट्टेधाकांचे प्रश्न मार्गी लावणे.

7. जिवती तालुक्यात एकही राष्ट्रीयकृत बँका नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नाही. याची हमी.

8. आरोग्य सुविधा निर्माण करणे.

9. सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे

10. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे.

11. गाव तेथे सार्वजनिक वाचनालय.

12. बोगस भामटा घुसखोरीतला आळा घालणे.

असे अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लावणे.

*अशोकभाऊ राठोड यांना समाजासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे. कृपया आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मताने निवडुन द्यावे. ही नम्र विनंतीआहे.

Post a Comment

0 Comments