Subscribe Us

नसाब,हासब आणि मळाव ही तिन स्तरीय गण सभा ही तांड्यांची समांतर शासन व्यवस्था..!


  मुंगा मोलारीवाते

नसाब,हासब आणि मळाव ही तिन स्तरीय गण सभा ही तांड्यांची समांतर शासन व्यवस्था..!*

तीज आणि होळी हे गोरमाटी गण समाजाचे प्रमुख उत्सव असून उद्भवलेल्या परिस्थिती नुसार तीज आणि होळी हे उत्सव साजरे करायचे की नाही?

        याचा निर्णय गण सभेत सर्व मतांनी पारित व्हावा लागतो. तांड्यांचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो.भारतीय सांसदीय शासन प्रणाली ही संकल्पना देसी असून गण समाजी लोक जीवनाच्या गण सभेवर बेतलेली आहे. 

       नायक हा गण सभेचा प्रमुख असला तरी तांड्यांच्या हिताचे निर्णय हे गणसभेत सर्व मताने घेतले जाते. 

      नसाब,हासाब आणि मळाव ही तिन स्तरीय गण सभा असून सभागृहात उद्भवलेल्या पेच प्रसंगावर तोडगा काढण्याचा अधिकार 'दूद कचेरी'नावाच्या वरिष्ठ सभेकडे असतात.तांड्यातील मान्यवर डायसाण हे दूद कचेरी या सभा ग्रहाचे पदसिद्ध सभासद असतात. 

     एकंदरीत दूद कचेरीचे स्वरूप "फुल बेंच' सारखे असते.दूद कचेरीचा निर्णय वा निकाल हा अंतिम स्वरूपाचा असतो. 

      दूद कचेरीने दिलेल्या निकाला विरोधात आरोपींना दुसरीकडे अपिल करण्याची परवानगी नसते..! 


             भीमणीपुत्र

     *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments