Subscribe Us

बंजारा या मुळ विमुक्त भटक्या जमातीला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ठ करा


विषय:- बंजारा या मुळ विमुक्त भटक्या जमातीला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ठ करण्याबाबत *"प्रेस कॉन्फरस" बाबत*

बंजारा समाजाला ब्रिटीश काळात सन १८७१ मध्ये क्रिमीनल ट्राईब म्हणुन घाेषित करण्यात आले हाेते; आणि बंजारा समाज स्वतंत्र्यानंतर ही क्रिमीनल ट्राईब मध्येच हाेते;

त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरुजी ह्यानी सन १९५२ मध्ये १४ विमुक्त आणि २८ भटक्या जमातीना गुन्हेगारी कायद्यातुन मुक्त केले;

त्यानंतर बंजारा समाजाच्या वांरवारं मागणी नंतर महाराष्ट्र शासनाने सन १९६१ मध्ये विमुक्त भटक्या (DNT) जमाती असा प्रवर्ग तयार करुन आपल्या पातळीवर एक अल्पशा न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे; *"परंतु ज्या मध्ये केंन्द्र शासनाचे कुठलेही लाभ अनुसूचित जाती/जमातीच्या धर्तीवर मिळत नाही;"*

त्यामुळे बंजारा समाजाची अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ठ करण्यासाठी वांरवांर मागणी करणायात आली; त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी सन १९६८ पासुन शिफारस पत्र पाठविले आहे; म्हणजेच आमची मागणी जुनी आहे;

म्हणुन या राज्यशासनाला विनंती आहे की; जर आपण *"धनगर"* या जमातीचा अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ठ करण्याचा विचार करीत असाल तर,बंजारा समाज सगळयात पहिले अनुसूचित जमाती या आरक्षणासाठी पात्र आहे; नक्कीच राज्यशासन बंजारा समाजाचा सगळ्यात पहिले विचार करतील;

अनुसूचित जमाती मध्ये बंजारा समाजाला समाविष्ठ करत नसाल तर आम्ही सैविधांनिक मार्गाने आमचा घटनेनी दिलेल्या अधिकाराचा वापर करुन आमचे हक्क व अधिकार मिळवुन घेवु;

यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली हाेती;

सदर पत्रकार परिषदेला मा.आत्माराम चव्हाण नायक,डॉ आर डी जाधव,सुदाम राठाेड, संजुभाऊ राठाेड, सा बंजारा पुकार जिल्हा प्रतिनिधी ज्याेतीताई जाधव,नलिनीताई पवार,  अर्चनाताई राठाेड, राजश्रीताई राठाेड,बेदसिंग राठाेड,राजुभाऊ चव्हाण,विजय पवार,गाेंविदा पवार,पिरुसिंग राठाेड,पंजाब जाधव,प्रविण पवार ,विजु राठाेड,श्रीकांत राठाेड उपस्थित हाेते;

धन्यवाद जै सेवालाल

Post a Comment

0 Comments