Subscribe Us

गहुली ते दिल्ली ‘बंजारा लदेणी’ ची पूर्वनियोजन बैठक वाशीममध्ये संपन्न


गहुली ते दिल्ली ‘बंजारा लदेणी’ ची पूर्वनियोजन बैठक वाशीममध्ये संपन्न

वाशीम - आपली वेगळी बोली, पोशाख, संस्कृती जोपसणारा बंजारा समाज देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशात विभागाला गेला आहे. मात्र, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे ओलांडल्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. या विखुरलेल्या समाजाला एकसंघ करण्यासाठी ‘बंजारा डेव्हलपमेंट मुव्हमेंट’च्या माध्यमातून गहुली ते दिल्ली बंजारा लदेणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून वाशीम येथे दि.  १५ ॲाक्टोबर २०२३ रोजी पूर्वनियोजन बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्यातील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय बंजारा तत्सम समाजाला सामाजिक न्याय, सांस्कृतिक ऐक्य पुनर्स्थापन करण्यासाठी गहुली ते दिल्ली यात्रा काढण्यात येणार आहे.  या ‘बंजारा लदेणी’ ची सुरुवात बंजारा गौरव दिन, ५ डिसेंबर २०२३ रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांची जन्मभूमी गहुली येथून प्रारंभ होणार असून पुढे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या प्रदेशातून ही लदेणी जाणार आहे. तर यात्रेचे समारोप महायोद्धा लखिशाह बंजारा यांची कर्मभूमी दिल्ली येथे ५ जानेवारी २०२४ रोजी ‘बंजारा महाअधिवेशन’ घेवून करण्यात येणार असल्याची माहिती ‘बंजारा लदेणी’ समन्वयक यांनी दिली आहे.

लादेणी समिती
विलास रामावत

Post a Comment

0 Comments