Subscribe Us

टांढो लदेणी गहुलीसे दिल्ली


 

टांढो लदेणी ( गहुली से दिल्ली )

बंजारा महाधिवेशन दिल्ली 2023-24

हा समाजाचा, समाजातील प्रत्येक घटकांचा एक महोत्सव आहे, यज्ञ आहे.

विविधतेतून एकता दर्शवणारी, निसर्गपूजक, जात-धर्म भेद न मानणारी, सर्वांना सामावून घेणारी, मानवता मानणारी भारतातील एक महान बंजारा संस्कृती आहे.

टांढो लदेणी ( गहुली से दिल्ली ) च्या

माध्यमातून संत सेवालाल महाराज(समाजकारण), लखिशा बंजारा(अर्थकारण) व महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक साहेब(राजकारण) यांच्या महान व आदर्श कार्याचा उजाळा करणे व भारतातील सर्व बंजारा समाजाला संघटित करणे हा यामागील उद्देश आहे..

अशी बंजारा समाजाची महान परंपरा दाखवणारी सांस्कृतिक यात्रा इतिहासात कधी झालेली नाही..

एक यज्ञ ,महोत्सव समजून बंजारा समाजातील सर्वांनी यात योगदान द्यायचे हवं..

5 डिसेंबर (गौरवदिन ज्या दिवशी वंदनीय महापुरुष वसंतराव नाईक साहेबांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून  पहिल्यांदा शपथ घेतली) नाईक साहेबांचें जन्मस्थान गहुली येथून निघणारी ही लदेणी यात्रा

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश मधून जाऊन,

 5 जानेवारी 2024 दिल्ली येथे  न भूतो न भविष्यती असे एक महाधिवेशन दिल्ली येथे होणार आहे..

या महोत्सवात भारतातील 22 राज्यातील बंजारा समाज सहभागी होऊन बंजारा समाजाच्या महान सांस्कृतिचे प्रदर्शन दाखवणार आहे..

बंजारा समाजाच्या सर्व घटकांनी या टांढो लदेणी  यात्रेत सहभागी होऊन एका ऐतिहासिक महोत्सवाचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती.


सुभाष तंवर

Post a Comment

0 Comments