Subscribe Us

पांढरे वादळ, महामोर्चा



 जय सेवालाल 

काल झालेल्या पांढरे वादळ महामोर्चेमध्ये बंजारा समाजातील सर्व संघटनांनी एकत्र येऊन एकजूट दाखवली त्याबद्दल सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय पातळी वरील अध्यक्षांचे  खूप खूप अभिनंदन

व सर्व संघटनेच्या विभाग,जिल्हा, तालुका ,पदाधिकाऱ्यांचेही खूप खूप अभिनंदन पण त्यापेक्षाही जास्त अभिनंदन करावे लागेल ती बंजारा बांधवांची ज्यांनी एकदाच दिलेल्या शब्दाचा मान ठेवून  पांढरे वादळ महामोर्चा मध्ये सहभागी झाले व आपली ताकद दाखवली ही संघटनेची ताकद नसून सर्व बंजारा बांधवांची ताकद आहे हे संघटनेने पण लक्षात ठेवायला पाहिजे या पांढरे वादळ महामोर्चामध्ये जे ग्राउंड लेव्हलवर काम करत होते असे खूप पदाधिकारी आलेल् होते त्यात त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तांडा तांड्यात जाऊन लोकांना जन जागृत करून लागेल त्या गाडीमध्ये घेऊन तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पण आपण या मोर्चामध्ये आलेले बंजारा बांधवांचे जन समूहाचाही विचार करायला पाहिजे होता .

आपण स्टेजवर राहून आपले बोलणे चालू असताना खाली आपल्या वर  खूप काही बंजारा बांधव यांची नाराजी व्यक्त होत होती 

काही वाईट प्रतिक्रिया ही उमटत होत्या ते आपण तेव्हा समजून घेतलेली नाही जो तो ज्या त्या संघटनेचं महत्त्व पटवण्याचे काम तेथे करत होते हे काही लग्न समारंभ नव्हते ,त्याने लग्नात चांगली वाढ केली हा  वाघ तो सिंह सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे .की वेळेचे बंधन असल्यामुळे बोलण्यासाठी कोणालाही आपण तीन ते चार मिनिटांचा वेळ दिला पण बाकीच्या पदाधिकाऱ्याला पण वेळ मिळाला असता पण आपण त्यामध्ये टाईमपास करत बसल्याचेही खाली बसलेल्या समाजामध्ये नाराजी व्यक्त होत होती आपल्याला जर सर्वांचे नाव घेणे शक्य नव्हते तर आपण कोणाचेही नाव न घेता सगळ्या समाज बांधवाबद्दलच बोलायला हवे  होते कालच्या महामोर्चा मध्ये जितके बंजारा समाज बांधव नाराज झालेले होते. दुसऱ्या वेळेस आपण कोणतेही किती काही मोठे आंदोलन केले मोर्चे काढले तरी तुम्हाला सपोर्ट करणार नाही ,हे तुम्ही लक्षात ठेवायला हवे दिवसभरामध्ये आपण नेत्यांना दोन मिनिट तीन मिनिटे बोलायला देता व दिवसभर आपण गप्पा मारत बसतात याबद्दल खूप वाईट प्रतिक्रिया उमठत आहे काही तर खूपच वाईट वाईट बोलत आहे तुमच्याही नजरेसमोर लवकरच येईल लोकांच्या काय काय भावना आहे. त्या आम्ही जनसमुदायांमध्ये होतो म्हणून आम्हाला या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या कडू आहे .पण सत्य आहे . काही बंजारा बांधव दबक्या आवाजात बोलत आहे. या माझ्या भावना  नसून हे  जनतेच्या भावना होत्या त्या समितीसमोर मांडल्या तुम्ही हि समजून घ्या धन्यवाद.



Post a Comment

0 Comments