Subscribe Us

विमुक्त महामोरचा



 🏳️ *पांढरे वादळ महामोर्चा, औरंगाबाद*🏳️          

        _______________________


महाराष्ट्रातल्या तमाम विमुक्त भटक्या आणि बंजारा बांधवांनो, उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे "पांढरे वादळ महामोर्चा" निघत आहेत. हा नुसता मोर्चा नाहीये तर बंजारा समाजाच्या सामाजिक, संवैधानिक हक्क अधिकाराच्या अस्मितेचा हा मोर्चा आहे. बंजारा समाजासह महाराष्ट्रातल्या तमाम भटक्या विमुक्तांच्या न्याय, हक्क-अधिकार आणि आपल्या संविधानिक हक्क अधिकारासाठीचा हा मोर्चा आहे. बंजारा समाजाच्या संवैधानिक आणि विधायक आरक्षणाच्या विषयावर हा मोर्चा निघत आहे. 

   फक्त बंजारा समाजच नव्हे तर समस्त आदिवासी, विमुक्त भटक्या बांधवांच्या सामाजिक अस्मितेचा हा प्रश्न आहे. स्वातंत्र्याला आज 75 वर्ष पूर्ण होऊन देखील आमच्या आदिवासी, भटक्या- विमुक्त बंजारा समाजाच्या दारी स्वातंत्र्याची किरणे पोहोचली नाहीत. उलटपक्षी आमच्या आरक्षणाच्या अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे. महाराष्ट्र शासन फक्त बघ्याची भूमिका घेऊन पाहत आहे. आदिवासी बंजारा समाजासह भटक्या विमुक्त बांधवांचे समाजमन, समाजभान जागृत करण्यासाठीचा हा महामोर्चा आहे. आम्हाला आमच्या न्यायासाठी सामाजिक चेतनेसह एक सुदृढ, संवेदनशील समाजमन निर्माण करायचे आहे. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलोत त्या समाजासाठी काही देणे लागतो यासाठीचा हा मोर्चा आहे. आमच्या संवैधानिक हक्क अधिकारावर गंडांतर आले म्हणून पांढऱ्या ध्वजाचे वादळ घेऊन सत्ताधाऱ्यांना जागी करायचे आहे.

   भारतीय म्हणून या देशामध्ये संवैधानिक नैतिकता आणि संवैधानिक मूल्ये जतन राहावी. ती संवैधानिक मूल्ये जतन ठेवण्यासाठी विमुक्त भटक्या बांधवांना सोबत घेऊन बंजारा समाज पांढऱ्या वादळासह आपल्या संवैधानिक हक्क अधिकारासाठी उभा होता याची इतिहासात कायम नोंद राहिल.

   यासाठी म्हणून समाजातल्या तमाम आदिवासी विमुक्त भटक्या आणि बंजारा बांधवांना विनंती आहे उद्या स्वेच्छेने, स्वखर्चाने आणि स्वयंप्रेरणेने या पांढऱ्या वादळाचे साक्षीदार व्हा!


आयोजक:

*बंजारा, मुळ राजपूत भामटा, विमुक्त भटके समाज, महाराष्ट्र राज्य.*

Post a Comment

0 Comments