Subscribe Us

हाम गोर क कोर


 गोद्री ला हिंदू धर्म सभा अर्थात कुंभ मध्ये गेलेल्या बंजारा बांधवानी यापुढे स्वतःला गोर माटी समजू नये.

मागील काहीं दिवसापासून RSS ची एक प्रमुख विंग धर्म जागरण समन्वय समिती* तर्फ आयोजित *हिंदू गोर बंजारा नायकडा, लबाना कुंभ*  च्या आयोजना संदर्भात समाजामध्ये तर्क वितर्क सुरु आहे.

भट लोकांची लाळ चाटणारे,पद, पैसा, प्रसिद्धी साठी...आंधळे, बहिरे, लुळे लंगडे, दलाल झालेले आपल्या समाजातील अनेक *फितूर* समाजाची लक्तरे वेशीवर टांगताना, समाजाला हिंदूधर्माच्या ठेकेदारांना विकताना दिसले.

या असल्या *फितूरांनी* यापुढे स्वतःला *गोर* समजू नये. त्यांनी वर्ण व्यवस्था स्वीकारून आपले *शूद्र जाती* म्हणून स्थान आनंदाने स्वीकारावे.वा आमचे कोणते स्थान राहील हे जाहीर करावे. जे स्थान मिळेल त्यानुसारच धार्मिक रीती -रिवाज पूर्ण पाडावे.

*यानंतर आमच्या गोर धाटीची नक्कल अजिबात करू नये.*सर्व धार्मिक संस्कार.. मुंज, उपनयन, यज्ञ, होम हवन,33 कोटी देवता, ॐ, सोम, जप, तप..यांचे अंगीकार करावे.

स्वतःला अजिबात तुम्ही गोर समजू नये तुम्ही आता सनातनी, विषमता वादी, वैदिक संस्कृतीचे घटक झाले आहात हे लक्षात ठेवा.

तुम्हा सर्वाना गोर समाजातून बहिषकृत का करण्यात येवू नये?

*ज्या ज्या गोर बांधवानी आपली निसर्गवादी, विज्ञानवादी, मानवतावादी,धाटी सोडून स्व ईच्छेने, बौद्ध धर्म, ख्रिसचन धर्म, हिंदू धर्म, सिख धर्म वा ईतर कोणताही धर्म स्वीकारले आहे, त्यांनीं यापुढे स्वतःला गोर माटी समजण्याची चूक करू नये*

समाजाचे असंख्य प्रश्न, समस्या प्रलंबित असून मध्येच असे *गोद्री* सारखे फालतू चे *धसकट* उभे करण्याची अक्कल यांना कशी काय सुचते?

अनेक लोकांनीं आपली अक्कल गहाण ठेवली की काय? समाजाचा सौदा करण्याचा अधिकार या भामट्याना कोणी दिला?

विषमता वादी, वर्ण व्यवस्थेने, स्पृश्य -अस्पृश्यतेने, नाना अंधश्रद्धा याने माखलेला, रक्तरंजित इतिहास असलेला वैदिक -सनातन म्हणजेच सध्याचा हिंदू धर्म आमचा कसा असू शकतो?*

वाचा विचार करा... शिक्षणानेच समाज प्रगती करू शकतो यावर विश्वास ठेवा.

*गोद्री येथील धर्म सभेत समाज विषयक कोणत्या बाबी वा समाजाचे कोणते प्रश्न सोडविण्यात आलेत याविषयी माहिती लवकरच कळेल. जर कोणतेही निर्णय समजहिताचे झाले नाही तर हा एक सामूहिक धर्मान्तराचा कुटील षडयंत्र समजण्यात का येवू नये?*

येणाऱ्या जनगणना मध्ये आमचा धर्म :गोर /गोर माटी

भाषा :गोरमाटी असेच लिहा. सनातन लोकांचे डाव हाणून पाडा.सुज्ञ, विचारी गोर लोकांनी हे कुटील डाव उधळून लावले ते बरेच झाले,हे तेथील उपस्थिती वरून कळून येते.

10 लाख लोकांचे 2000 रुपये प्रत्येकी वरून जवळपास 200 कोटी रुपये वाचले.ते बरेच झाले.

शेवटी धाटी टिकावं... धाटी बचाव... हरप्रकारेरं धर्मांतरण भगावं

जय गोर!!जय सेवालाल!!

होमसिंग पवार

     *नागपूर*

महासचिव, गोर आर्मी

Post a Comment

0 Comments