Subscribe Us

गोरमाटी बोलीभाषा आणि भाषाविज्ञान


 *वाते मुंगा मोलारी*

             my swan song


*गोरमाटी बोलीभाषा आणि भाषाविज्ञान*


*भा ss-*


गोर धाटी ही प्रामुख्याने वाङ्मयीन धाटी असून,ही वाङ्मयीन धाटी जगणारा गोरमाटी हा प्राचीनकाळी प्रतिभावंत म्हणून गणला जात होता;गोरमाटी बोलीभाषा व्यवहारात प्रचलित असलेला "भा s!" हे स्वनविनासात्मक चिन्ह त्याचे निर्देशक होय. 

            प्राचीनकाळी वाङ्मयीन धाटी जगणाऱ्या गोरगणांचा प्रतिभा प्रांत किती विकसित होता याची ग्वाही देणारा 'भा s' हा स्वनविनासात्मक चिन्ह असल्याचे मानता येईल. 

           

*सामळो रे भा s ! > ऐका प्रतिभावंतांनो!*


        अशा संकेत अर्थाने 'भा!' हा चिन्ह सिद्ध होतो.

              आम्रवृक्षाच्या गार सावलीतील गोरमाटी गण समाजाची 'मळाव'नावाची गण सभा म्हणजे गोरमाटी बोलीभाषेची साहित्य यात्राच..! 

           गणसभेची सुरूवातच साहित्याच्या अंगाने होत असे.साकी,साकतर,चोटे (कोपरखळी) आदि गुणांनी ही गण सभा नटलेली असते,साहित्य हे या गण सभेचे मुखपत्रच जणू..! 

             साहित्याच्या अंगाने नटलेल्या या गण सभेला महाकवी कालिदास (काळदास),राजा भरतरी आणि राजा भोजचीही उपस्थिती लाभलेली होती.'सौंदर्य लहरी'या संस्कृत काव्याचा कर्ता राजा भरतरी हा तर लमाण गणाचा आश्रीत होता याला कारण गोरमाटी बोलीभाषा आणि मौखिक वाङ्मय..! 

            प्राचीन काळी गोरमाटी बोलीभाषा आणि मौखिक वाङ्मय किती प्रगल्भ आणि श्रीमंत होते याची आपणास कल्पना येईल. 

           गोरमाटी बोलीभाषक गण समाजाच्या 'मळाव'या वर्तुळाकार गणसभेतील अभिव्यक्ती/भाषा आविष्कार हे आशयानुरूप दीर्घ उच्चाराची असते.ध्वनी संकेताचे दळणवळण हे खऱ्या अर्थासह व्हावे याची ही घेतलेली काळजी होय. 

          भाषा वैज्ञानिकांच्या मते  "भा,भडा" हे ध्वनी उच्चार स्वनविनासात्मक चिन्ह ठरतात. 

               "प्राचीन संस्कृतात 'bho भो'हे चिन्ह ज्याला हाक मारावयाची आहे,त्याचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून वापरले जाई.हे चिन्ह इंग्रजीतील 'hey (हे)( ए/अरे) या चिन्हाशी साम्य पावते.या 'भो'चिन्हातील 'ओ'हा स्वर किती लांबवायचा ते ऐकणाऱ्याविषयी (बोलणाऱ्याला) किती आदर आहे यावर अवलंबून असते.या प्रकारे 'भो'हा लांबलेला स्वर अत्यादर व्यक्त करतो,तर कमी काळ उचारला गेलेला (कमी लांबलेला) 'ओ'हा अत्यादर किंवा अनादर आणि बऱ्याच वेळा अपमान समजला जातो."( सामाजिक भाषाविज्ञान - कक्षा आणि अभ्यास,संपादन- डॉ. जयश्री पाठणकर)

            गोरमाटी गण समाजाच्या "मळाव" या वर्तुळाकार सभेतील *सामळो रे भा ss!* या दीर्घ उच्चाराचे ध्वनी संकेत *ऐका प्रतिभावंतांनो!* याच संकेतार्थाने रूढ झालेले असून गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील 'भा'या ध्वनी संकेताला संस्कृत भाषेतील 'भो'या ध्वनी संकेताची उसनवारी मानणे हे अज्ञानपणाचे लक्षण ठरेल. 

            "सामळो रे भा ss!" हा ध्वनी उच्चार फक्त गणसभेतच दीर्घ स्वरूपात अभिव्यक्त होतो,तर "भडा,भा!" हे ध्वनी उच्चार एकमेकांशी बोलताना अभिव्यक्त होतात. 

           प्राचीन संस्कृत भाषेतील "भो" हा ध्वनीविनासात्मक चिन्ह गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील "भा" या ध्वनी संकेताचे उत्तर रूप होय. ही उसनवारी म्हणजे आर्यांच्या भाषिक व्यवहाराच्या पद्धतीवर गोरमाटी बोलीभाषा व्यवहाराचा हा पडलेला प्रभाव होय. 

           या संदर्भात जगप्रसिद्ध इतिहासकार प्र.रा.देशमुख यांचे मत या ठिकाणी लक्षात घेतल्यास याची आपणास खात्री पटेल.त्यांचे मत असे की,"संस्कृत भाषेत मूळातच शब्द संग्रह अत्यल्प होता (नव्हताच) म्हणून संस्कृतने अनेक भाषातील शब्द स्विकारलेत,आणि आता ज्या ज्या भाषातील शब्द संस्कृतमध्ये आहेत त्या-त्या सर्वच भाषांची जननी संस्कृत होय असे सांगण्याचा कृतघ्नपणा संस्कृत पंडितांनी केला आहे."(संस्कृत भाषे बद्दल कोण काय म्हणतात? - महावीर सांगलीकर) 

          ७०℅ संस्कृत शब्दाच्या उत्पत्तीचे मूळ गोरमाटी बोलीभाषा शब्दात दडलेले असल्याचे आढळून येईल.गोरमाटी बोलीभाषेचे समृद्ध मौखिक वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मय प्रसवण्याची प्रवृत्ती व शब्द संपत्ती ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यास गोरमाटी बोलीभाषा हीच संस्कृत भाषेची जननी असल्याचे सिद्ध होते.

            एकंदरीत प्राकृत गोरमाटी बोलीभाषेचे संस्कारित झालेले रूप म्हणजे संस्कृत.इतरापासून आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी संस्कृत भाषिकांनी गोरमाटी बोलीभाषेतील शब्दाची मोडतोड करून संस्कृत भाषा समृद्ध केली असे म्हणणे हे संयुक्तिक ठरेल.

          संस्कृत भाषेच्या संदर्भात प्र.रा.देशमुख यांच्या संदर्भाचा हवाला देत प्रा.अशोक राणा म्हणतात की,"भाषेतील शब्दावर संस्कार करून संस्कृत निर्माण झाली व मूळ प्रकृती भाषा या नावाने संबोधल्या जात होती या बद्दल अत्यंत प्रबळ पुरावा ऋग्वेदात आहे".(खोटंच खोटं पण किती मोठं? - प्रा.अशोक राणा) 

        प्राकृत गोरमाटी बोलीभाषेतील शब्दाचे संस्कृतीकरण झालेले असे कित्येक शब्द आजही ऋग्वेदात,वैदिक वाङ्मयात आढळतात.उदाहरणार्थ "निऋती < नेरती,कितव < कीतूं,पश्च < पच्,सीता < सीतळा,मेलुहा < मेलीया इ. 

             ७०℅ संस्कृत शब्दाच्या उत्पत्तीचे मूळ गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील शब्दात शोधता येईल.

          गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील *केटो* (एका तळहाताच्या पसरट बोटाची ओंजळ)या धातूपासून संस्कृत *कितव* हा शब्द निघाला.सामुहिक शिकारीतून मिळविलेल्या उत्पादीत मांसाचे म्हणजे गण संपतीचे समान हिस्से पाडून,केटो पद्धतीने पडताळणी करून सर्वांना वाटणाऱ्या व्यक्तीस गोरमाटी बोलीभाषेत "कीतूं" म्हणतात,याच कीतूं पासून संस्कृत "कितव"हा शब्द सिद्ध झाला हे उघड आहे. 

        यावरून प्राकृत गोरमाटी बोलीभाषा हीच संस्कृतची जनक भाषा ठरते हे स्पष्ट आहे. 

           "संस्कृत या शब्दाचा अर्थच मूळी संस्कार केलेली भाषा असा होतो,अर्थात कोणत्या तरी भाषेवर संस्कार करून ती तयार झाली",प्रा.अशोक राणाचे हे मत प्राकृत गोरमाटी बोलीभाषेला तंतोतंत लागू पडते. 

          प्राचीन संस्कृत भाषेतील "भो" हा स्वनविनासात्मक चिन्ह मूळात गोरमाटी बोलीभाषा व्यवहारातील "भा" या ध्वनी उच्चाराचेच संस्कारित संस्कृत रूप होय.

             ही सारी उसनवारी व्याकरणकार पाणिनीच्या काळात झालेली दिसते. 

        "इतिभाषाया" असे म्हणून पाणिनीने वारंवार प्राकृतातून घेतलेल्या शब्दाचा उल्लेख करतो".(खोटंच खोटं पण किती मोठं? - प्रा.अशोक राणा) 

          अशा या मूळ आदिम गोरमाटी बोलीभाषेचे स्वतंत्र अस्तित्व आज धोक्यात आले आहे. गोरमाटी बोलीभाषेवर आक्रमण म्हणजे धाटीवर आक्रमण हे प्रस्थापितांचे कावेबाज नीतिशास्त्र आमच्या लक्षात का येऊ नये? 

          हे षडयंत्र जर आमच्या लक्षात आले असते तर २०११ च्या जनगणनेत प्रस्थापितांना गोरमाटी बोलीभाषेला *केराची टोपली* दाखवण्याची हिंमत झालीच नसती. 

         स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या वयात किती आमचे वैचारिक दारिद्र्य? 

          आमच्या गुलामी आणि अज्ञानीवृतीनेच आपल्या याडी भाषेची पार वाट लावली.... 

*अरे थु:! अशा गुलामीवृतीवर...!!*


*संदर्भ-*


१, गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन

भीमणीपुत्र

संपादन- प्रा.भारती अ.मुडे,कोल्हापूर

२, खोटंच खोटं पण किती मोठं? 

प्रा.अशोक राणा


           *भीमणीपुत्र*

    *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments