Subscribe Us

राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्कार जाहीर


 राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने विलास रामावत सन्माणित**


दिग्रस/(हिंदूसम्राट प्रतिनिधी अनिल राठोड यांजकडून)



                        गोरशिकवाडीचे राष्ट्रीय संयोजक विलास रामावत यांना राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व त्यांच्या आजवरच्या समाजकार्याची दखल घेऊन समाज रत्न पुरस्कार देण्यात आले. विलास रामावत हे गोरसिकवाडी या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांनी त्यांच्या जीवनाचा बंजारा समाजासाठी स्वतःचा जीवनाचा त्याग अर्पण करून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा दिला व संपूर्ण महाराष्ट्र तेलंगणा नव्हे तर भारतभर फिरून त्यांनी समाज संघटित कसे होईल आणि समाजावर होत असलेल्या अत्याचारा ला लढा कसा देता येईल हाच प्रयत्न त्यांनी त्यांच्या संघटनेमार्फत केला. वयाच्या 23 वर्षापासून त्यांनी समाजासाठी त्याग करून समाज जागृत कसे करता येईल या गोष्टीकडे त्यांनी अहोरात्र गावोगाव फिरून समाज संघटित केला स्वतः वयाच्या 23 व्या वर्षी आपले शिक्षण atd.Gdart.animation.foundation . मराठी स्टोरी बोर्ड आर्टिस्ट व सेवालाल महाराज यांचे चित्र बनवून नॅशनल आर्टिस्ट चित्रकार असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक समाज सेवक म्हणून समाजासाठी न्याय व अधिकाराला लढा देणारा एक समाज सुधारक निर्माण झाला . आज त्यांच्या ह्या सगळ्या कार्याची दखल घेऊन त्यांना बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांच्या हाताने राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन विलास रामावत यांच्या समाज कार्याची दखल पोहरादेवी येथे सन्मानपत्र देण्यात आले . या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मपिठाधिश्वर महंत बाबूसिंग महाराज महंत संत तीर्थक्षेत्र पोहरादेवी उमरीगड. मा.प्रभुजी चव्हाण मंत्री पशुसंगोपन कर्नाटक . मा. उमेशजी जाधव खासदार गुलबर्गा कर्नाटक. हरिभाऊ राठोड माजी खासदार.तुषार राठोड आमदार मुखेड .प्रदिप राठोड माजी आमदार किनवट. अँड निलय नाईक आमदार विधानपरिषद. इंद्रनिल नाईक आमदार पुसद विधानसभा . राजेश नाईक (NSDA) नॅशनल सेवा डॉक्टर असोसिएशन पुसद.या मान्यवरांच्या हस्ते धर्मगुरू तपस्वी डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत आयोजित दिनानिमित्त बंजारा समाजाचे 11 समाजसेवकांना राष्ट्रीय बंजारा रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सर्व बंजारा समाजामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .


Post a Comment

0 Comments