Subscribe Us

धर्म आणि धाटी चे स्वरूप


 *धर्म आणि धाटीचे स्वरूप.*


*धर्म व धाटी बाबत गोर विचारवंतांमध्ये खूप चर्चा चालू आहे म्हणून याबाबत मी माझे विचार मांडत आहे.केवळ चिंतनार्थ हे विचार आहेत.*


*1) धर्म हा विशिष्ट जन समूहांचा, समूहाचे,हक्क,अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण झालेला आहे.*


*2) हिंदू धर्मातील वर्ण व्यवस्थाही इतर वर्णातील समूहाचे शोषण करण्यासाठीच आहे.*


*3) कोणत्या धर्माचा निर्माता धर्मगुरू,धर्मग्रंथ व धर्मक्षेत्र ठरलेले असतात.*


*4) हिंदू धर्मात श्रेष्ठ-कनिष्ठ,महिला, पुरुष भेद,शिवाशिवीची भावना, महिलांवरील अन्याय,खोट्या देवाची व मूर्तीची पूजा, कर्मकांडाद्वारे लुट,बहुजनांचे शोषण या सर्व समाज घातक परंपरा आहेत.*


*5) एक धर्मवादी दुसऱ्या धर्मवाद्यांचा द्वेष व अन्याय करतो.*


*6) धर्मामध्ये कनिष्ठ वर्गाला सामावून घेण्याची व्यवस्था नाही.*


*7) धर्मातील विविध श्रद्धास्थानाच्या वादामुळे व पक्षपातामुळे जनतेचे व देशाचे अतोनात नुकसान होते.*


*8) धर्मातील धार्मिक कर्मकांडामुळे मानवी शक्ती,वेळ व धनाचा अपव्यय होतो.*


*9) धर्माधारे अनेक परोपजीवी भट,पुरोहित,भोंदू,साधुसंत,बुवा, महाराज,साधव्या,भगत-भोपे, मांत्रिक,गंडादोरी करणारे तयार होतात व ते देवधर्म भोळ्या व कष्टकरी लोकांचे शोषण करतात.*


*10) वेगवेगळ्या धर्माचे मंदिर,मठ, मजिदा,गुरुद्वारा,चर्च,विहार, तीर्थक्षेत्रे यावर अनावश्यक खर्च केला जातो व नागरी सुख-सोयी कडे दुर्लक्ष केले जाते या नागरी सुखसोई अभावी कोरोनासम अनेक संकटाची वाईट फळे भोगावी लागतात.*


*11) धर्मव्यवस्था ही अपरिवर्तनीय अर्थात सनातन असल्यामुळे बदलत्या परिस्थितीत ठराविक समूहाचा फायदा व बाकी समूहाचा सत्यानाश होतो.*


*12) धर्मात निर्जीव वस्तूची पूजा/ सेवा केली जाते*


                    *याउलट*

                    --------------


*1) धाटी ही विशिष्ट समूहाची नसून सर्वासाठी असून सर्वांचे हक्क सुरक्षित ठेवले जातात.*


*2) धाटीमध्ये वर्ण व्यवस्था नसल्यामुळे कोणाचेही शोषण होण्याची शक्यता नसते.*


*3) धाटीचा निर्माता समाज असतो व त्याची अंमलबजावणी नायका मार्फत अथवा गण प्रमुखा मार्फत केली जाते.*


*4) धाटीमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असले तरी समतेची व मानवतेची वागणूक दिली जाते.संधी देऊन समाजात समावून घेतले जाते.महिलावर अन्याय केला जात नाही.खोट्या देवा ऐवजी निसर्गपूजक पशु वंदना केली जाते शोषणा ऐवजी सहकार्य केले जाते.*


*5) धाटीमध्ये कोणताही समूह दुसऱ्या समूहाचा द्वेष करीत नाही.*


*6) धाटीमध्ये कनिष्ठ वर्गाला सामावून घेण्याची व्यवस्था आहे.*


*7) धाटीवादिचे कोणतेही ठराविक ठिकाणी श्रद्धास्थाने नसल्यामुळे वाद व पक्षपात होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही व त्यामुळे कोणाचे नुकसानही होत नाही.*


*8) धाटीमध्ये मध्ये कोणते निरर्थक शोषक-कर्मकांडे नसल्यामुळे वेळ, शक्ती व धनाचा सुद्धा अपव्यय होत नाही.*


*9) धाटीमध्ये मूर्तिपूजा नव्हे केवळ वंदना होत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे परोपजीवी,आयातखाऊ, शोषक,लुटारू तयार होतच नाही.*


*10) धाटीमध्ये मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च केला जात नाही व यामुळे नागरी सुख-सोयी कडे दुर्लक्ष होण्याचे कारणच उरत नाही.*


*11) धाटी ही सनातन नाही ती काळ,गरजा,परिस्थितीनुसार बदलत जाते तेव्हा कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नसते.*


*12) धाटी मध्ये जीवाची सेवा केली जाते*


*वरील सर्व बाबी लक्षात घेता धर्मा ऐवजी धाटी ही लाखो पटीने श्रेष्ठ व सर्वोत्तम आहे यात कोणीही शंका घेणार नाही.धर्म ही संकल्पना बहुजनांची नसून विदेशी लोकांची शोषणयुक्त संकल्पना आहे.म्हणून धर्म या संकल्पनेचा त्याग करून धाटी संकल्पना अद्यावत करणे यातच सर्व गोर व मानवसमूहाचे कल्याण आहे असे मला वाटते.*


*जय भारत जय जगत जय संविधान*


*टीप:संविधान हे धाटीचेच प्रतिरूप आहे असे मला वाटते कारण संविधान हे धाटी प्रमाणे न्याय देणारे तत्त्वज्ञान आहे.*


*राजपालसिंह गबरूसिंह राठोड,ऑल इंडिया बंजारा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.*


Post a Comment

0 Comments