Subscribe Us

*वाते मुंगा मोलारी My swan song


 

*वाते मुंगा मोलारी*

              My swan song


*गोरमाटी बोलीभाषिक समुह हा एक भाषिक स्वतंत्र आदिम गण समाजी लोकजीवन - Not OBC!*

    

     इंग्रजी Tribe हा शब्द गणवाचक अर्थानेही सिद्ध होतो."जगातील इतर देशाप्रमाणे भारतात इतिहासपूर्व काळात गण समाज होता".असे प्रतिपादन काॅ.शरद पाटील करतात.यामुळेच इंग्रजी Tribe  हा शब्द गणवाचक असल्याचे मानण्यास शंका घेण्याचे कारण नाही. 

          गणसमाजी लोकजीवनाचे अनेक पैलू आजही गोरमाटी संस्कृतीत जीवंत असल्याचे आढळतात. गणसमाजात वैयक्तिक मालकी हक्काची भावना नसते.याचा एकमेव उत्कृष्ट पुरावा म्हणजे गोरमाटी संस्कृतीत अस्तित्वात असलेल्या "ओरी-बकरी,समनक,गेर" प्रथेतील गणसंपतीचे

(मासाचे) समान हिस्से वाटणीची आदिम पद्धत! 

       ओरी-बकरी,समनक,गेर प्रथेतील केटो पद्धतीने समान हिस्से पाडून वाटण्याची ही प्रथा म्हणजे सामुहिक रीत्या शिकारीतून मिळविलेल्या उत्पादित मासाचे (गण संपती) समान हिस्से पाडून वाटण्याच्या  आदिम काळातील प्रथेचे हे अवशेष होय.

              उत्पादित मांसाचे म्हणजे गणसंपतीचे समान हिस्से पाडून केटो पद्धतीने वाटणाऱ्यास गोरमाटी भाषेत *कीतूं* म्हणतात.आर्यांनी बळीराजास *कितव* म्हणून हिणवले आहे.गोरमाटी भाषेतील *केटो* या धातू पासून "कीतूं" हा शब्द प्रचलित झाला हे उघड आहे.संस्कृत "कितव" हा शब्द गोरमाटी भाषेतील "कीतूं" या शब्दाचा उत्तरररुप असल्याचा निर्विवाद सिद्ध होतो. 

          गणसमाजी लोकजीवनाचा आणखी एक पुरावा म्हणजे गोरमाटी भाषेतील *वीर/वीरेणा* या शब्दाचा देता येईल.गोरमाटी भाषेतील "वीरेणा" हा शब्द "भाऊवाचक"नसून *गणबंधू* या अर्थाने सिद्ध होत असल्याचे  काॅ.शरद् पाटील,निरज साळुंखे या संशोधकांनी मान्य केलेला आहे.स्त्री सत्ताक गणसमाजी संस्कृतीत स्त्रीयांच्या संरक्षणाची जबाबदारी तरूण गणसदस्याकडे असल्यामुळे " वीर/वीरेणा हा शब्द "गणबंधू" या अर्थाने प्रचलित झाला.

         गोरमाटी भाषेतील "वीर/वीरेणा" हा एक शब्दनीधी असून या शब्दनीधीत स्त्री संरक्षणास पात्र असलेले गणसदस्य येतात.काॅ.शरद पाटील,निरज साळुंखे यांनाही हाच अर्थ अभिप्रेत आहे.गोरमाटी भाषेतील या शब्दाकडे निरज साळुंखे यांनी 'गणबंधू'याच अर्थाने पाहिलेले आहे. 

          सामूहिकरीत्या शिकारीतून मिळविलेल्या उत्पादित मांसाचे/गणधनाचे समान हिस्से पाडण्यासाठी हे लोक मोहाची पाने जमिनीवर अंथरतात.यास *येडसादरी* म्हणतात.केटो पद्धतीने समान हिस्से पाडून वाटून झाल्या नंतर येडप्रमुख कीतूं आपल्या हातात कु-हाड घेऊन कु-हाड सह आपले दोन्ही हात उंचाऊन येडसादरीचे कापून दोन तुकडे करण्याच्या अविर्भावात *आजेर जून सवारेर नव; आवोरे येडीया सादरी काटा!* असे म्हणत सर्वांची संमती घेतो.उपस्थित असलेल्या सर्व येडीयांनी *काट! काट!* म्हणत आपली संमती दर्शवितात. 

         अशी आहे गोरमाटी गणसमाजातील लोकशाही पद्धतीची शासन व्यवस्था.याला काॅ.शरद् पाटलांच्या भाषेत *शासन समय करार* म्हणता येईल. "आदिम समीया माईरो गणसंस्थारो शासन करार"!. 

          " प्राकृत भाषा संस्कृतोद्भव असल्याचा सिद्धान्त खंडित झाल्याने त्या संस्कृतपूर्व असल्याचे सिद्ध झाले आहे.प्राकृत हा शब्दच प्रकृती या स्त्री सत्ताक विश्वाच्या आदिमातेचा वाचक आहे.... भारताची मूळ संस्कृती मानायची तर स्त्री सत्ताक गणसमाजाची मानायला पाहिजे.या आद्य गणसमाजाची गणमाता सिंधूची निऋती होती".(अब्राह्मणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र/शरद् पाटील) 

        "महाकाव्ये राक्षसादी अनार्य गणांना 'नेऋत'म्हणत".(शरद् पाटील) गोरमाटी गणसमाज हा निऋती पूजक असल्यामुळे नेऋत म्हणजे अनार्य मूलनिवासी गण असल्याचा सहज सिद्ध होतो. 

        गोरमाटी भाषा मौखिक वाङमयात निऋती संदर्भात " नेरती,नीरूडी,नेरतळी" असे उल्लेख वारंवार येतात.गोरमाटी गणसमाज हा "निऋती/प्रकृती" पूजक गोरमाटी भाषा ही संस्कृतपूर्व प्राकृत भाषा असल्याचे निर्विवाद स्पष्ट होते.उद:- *केटो > कीतूं > कितव!*

            गोरमाटी भाषा आणि संस्कृती ही प्रकृती धर्मावर आधारलेली आहे.गोरमाटी संस्कृतीतील "नसाब,हासाब आणि मळाव" या गण सभेतील डायसाण पुरुषांची बसण्याची वर्तुळाकार पद्धत आणि नातरो प्रसंगी डायीसाणी स्त्रीयांची ऊभे राहण्याची अर्ध वर्तुळ पद्धत हे मधमाशांच्या चित्रलिपीचे अनुकरण होय. 

         यास भाषावैज्ञानिक भाषिक उत्पादन प्रयोजन (भाषा प्राॅडक्षण) म्हणतात.

        मात प्रधान गोरमाटी संस्कृतीतील देवता संघ हा मात प्रधान आहे.उद:- गणमाता नेरती (निऋती/पृथ्वी),मऱ्यामा, सीतळा,हींगळा,मतराल, कंकाळी,तळजा"इ.आणि या मातृसत्ताक देवतांची कृतज्ञता "नातरो,ओळंग,आरत" अशा Ovral invocation म्हणजे मौखिक परंपरेने व्यक्त केली जाते. 

           मातृसत्ताक गोरमाटी गणसमाजी संस्कृतीतील प्रचलित "पितृपूजा" Ancestors worship "धपकार,भोग" Offering ह्या प्रथा मावळती स्त्री सत्ताक संस्कृती आणि उगवती पुरुष प्रधान संस्कृती या दोहोंतील संघर्षाचे हे प्रतिक होय. 

            मातृसत्ताक गोरमाटी गणसमाजी संस्कृतीतील *धपकार,भोग,गोट* हे उपचार पद्धती मातृसत्ताक गोरमाटी गणसमाजी संस्कृतीत रूढ असण्याचे कारण काय? याचे उत्तर डॉ.अब्राहाम ग्रिअर्सन यांचे संशोधन प्रबंध वाचल्यास सहज मिळू शकेल. 

         गोरमाटी गणसमाजी संस्कृती ही मातृसत्ताक असल्याचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे पण्णो (लग्न) संस्कारातील *घुंगटो होटो पाडेरो* ही प्रथा होय. गोरमाटी गणसमाजी संस्कृतीतील लग्नात अस्तित्वात असलेली नवरेवाचे घुंगटो होटो पाडेरो ही प्रथा एकेकाळच्या स्त्री वर्चस्वाचे निदेशक होय. 


         तात्पर्य येवढेच की,गोरमाटी गणसमाज हा आदिम असून ओबीसी प्रवर्गापासून कोसो दूर आहे...! 

     गोरमाटी बोलीभाषिक गणसमाजी लोकगणांनी आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या संविधानिक ओळख या लढ्यासाठी सिद्ध व्हावे..!! 


संदर्भ-


१, अब्राम्हणी साहित्य व कलांचे सौंदर्यशास्त्र

    - शरद् पाटील

२,दैत्यबळी कुंतल देश महाराष्ट्र

     - निरज साळुंखे

३, गोरमाटी बोलीभाषेचे सामाजिक आविष्कार आणि लोकजीवन

     - भीमणीपुत्र

संपादन- प्रा.भारती अनिल मुडे


                *भीमणीपुत्र*

         *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments