Subscribe Us

बिन पगारी मास्तर



 

*बिन पगारी मास्तर*




फुलांच्या कळीसारख उगवलं, संगतीला काटे देठंच,शिकवन मोठ दिले नाही,शिकवून दिले स्वप्न,शैक्षणीक संस्थातेत मास्तर पद दिले,लग्न जोडुन सासुरवाडीला नेलं,बिन पगारी मास्तर म्हणून बा दखल घेतला नंतर..‌‌....!!


दलदलीच्या मातीच चेतना,वाळवंटात ले झाडांना पाण्याच्या वेदनादायी आवाजावर जगतो.सकाळी माझ्या चेतनातील किरण उगवतो,शाळेच्या वातावरणात पोराचं आवाज कानापर्यंत फिरतो, अधिकारीच्या वेदना घरा पर्यंत शिरतो,सासुरवाडी समोर बिन पगारी मास्तर म्हणून झूरता झूरता जगतो.....!



सण उत्सव आले की, झाडांचं पान-फुल बदलते,पिका घरी येथात,निवडणूक आली,पक्ष- संघटना येथे, शेजारच बोलन बदलते ,शाळेत नव सत्राला शिक्षण परिषद मध्ये मिटिंग घेतात -विज्ञान प्रदर्शनात समारंभ करतात, कामाचं मोबदला बिन पगारी मास्तरांच्या घरी कधी देता....!


दसराच सण आले की, त्या धुरीयातून चिखलामधुन त्या धुरीयाकडे धावतो, धावताना म्हातारा झालो आस तेव्हा कळतो,बोलायचं, वाचायचे,हात घेऊन लिहण्याचं पोरांना शिकवतो,पेपर तपासणीच्या वेळी पेनची शाही सरळी कळतो,पण बिन पगारी मास्तर म्हणून निकाल तयार करतो....!


वडाच्या झाडासारख जगतो,वेदना लपवून फिरतो,कडूलिंबाच्या सारख दशा ठरवितो,करतो काम त्यांना राहते मान,स्वाभिमानी शिकवतो या देशांत, हसत खेळत राहतोय गोरमाटी समाजात, शेवटी बिन पगारी मास्तर म्हणून आंदोलनाला जातो.....!



*कवी- गणेश करमठोट,चंद्रपूर*

 

Post a Comment

0 Comments