Subscribe Us

बहुजणांचे उद्धारकः महात्मा ज्योतीराव फुले.* लेखणः- ताधों चव्हाण,औरंगाबाद.



   *बहुजणांचे उद्धारकः महात्मा ज्योतीराव फुले.*

लेखणः- ताधों चव्हाण,औरंगाबाद.

*******************************

         महाराष्ट्राला थोर संतांची महान परंपरा आहे. आणि या सर्व समाज सुधारकांच्या माळेतील मुकुटमनी म्हणून शोभणारे व्यक्तीत्व म्हणजे अर्थातच क्रांतीकारी महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांचे नाव घेतल्या जाते.

     स्वतःच्या घरादाराचा, संसाराचा विचार न करता संपूर्ण आयुष्यात शेतकरी, कष्टकरी, वंचित, दुर्बल, बहुजणांच्या समस्या सोडविण्यात आयुष्य खर्च करणारे, सर्व सामान्यांचे उद्धार कर्ते म्हणून सर्वप्रथम महात्मा ज्योतीराव फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते.

      स्त्री शिकली तरच समाज सुधारणेच्या कामाला वेग येईल, या विश्वासावर, तत्कालीन कर्मठविचारावर मात करत. स्वतः  प्रथम पत्नी मायी सावित्रीबाईला शिकविले. शिक्षिका करुन स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

     अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या, अठरा विश्व दारीद्र्यात असलेल्या अशा हरीजण, गिरीजण, अडलेल्या-नडलेल्या, दीन-दलित, तसेच वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पिचलेल्या बांधवांचा ज्या महापुरुषांनी उद्धार केला. असे बहुजणांचे उद्धारक क्रांतीज्योती महात्मा ज्योतीराव फुले होय.

       महात्मा ज्योतीराव फुले एकदा दलित वस्तीतुन जात होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, 

या वस्तीत राहणारा नानु नावाचा मुलगा खूप हुशार व चाणाक्ष आणि मेहनती आहे. मात्र तो शिक्षणापासून वंचित आहे. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली. तेव्हा त्यांनी आफल्या जवळचे असलेले स्नेही, मिचलसाहेबांना पत्राद्वारे कळवले. त्यांना सांगितले की, "एक नानु नावाचा मुलगा आहे. दलित वस्तीतला आहे. हुशार असुनही शिक्षणापासून वंचित आहे. त्याला तुमच्या शाळेमध्ये बसवून घ्या. शिक्षण द्या. त्याला चारदोन अक्ष राची ओळख होऊ द्या."

तेव्हा मिचल साहेबांना होकार दिला. होकार आल्या बरोबर तो नानु नावाचा मुलगा शाळेच्या दिशेने चालत येऊ लागला. तो आता शाळेच्या जवळ पोहोचला होता. शाळेच्या दाराजवळ आला. शाळेत पाऊल टाकणार तोच!

वर्गातली मुलं वर्गातुन बाहेर येऊ लागली. आणि वर्गाच्या बाहेर आल्यावर मिचल साहेबांना समजेना. 

हे असे का होत आहे. तेव्हा त्यांनी विचारले. 

तेव्हा एका मोठ्या मुलाने धिटाईने सांगितले की,

"सर,

हा दलित कुटुंबातील व वस्तीतील आहे.  दलित वस्तीतील दलित मुलगा जर आमच्या वर्गात बसणार असेल, तर आम्ही वर्गात बसणार नाही." 

तेव्हा मिचल साहेब म्हणाले,

"हा मुलगा बाकडावर बसणार नाही. तो चटईवर बसेल."

तेवढयात दुसरा मुलगा पुढे येऊन म्हणु लागला.

"सर,

चटई जमिनीवरच आहे. तेव्हा चटईचा विटाळ जमिनीला होईल. आणि जमिनीचा विटाळ आम्हाला होईल.  तेव्हा आम्हाला रोज रोज घरी गेल्यावर आंघोळ करावी लागणार."

असा प्रसंग नानुने डोळ्यादेखत बघितला होता. 

तेव्हा नानु केव्हाचाच शाळा परीसर सोडून निघुन गेलेला होता. त्यानंतर तो कधीचत्या शाळेकडे परत आला नाही.

ही बातमी जेव्हा महात्मा ज्योतीराव फुले यांना समजली. तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांना इंगळ्या डसल्यागत वेदना होऊ लागल्या. 

ते म्हणाले,

"अरे आजपर्यंत या सूर्याची किरणे आमच्या डोक्यावरुन राज्याभिषेक घालावा तसा वर्षाव करतात. या सूर्याच्या किरणांना कधी विटाळ झाला नाही. 

आजपर्यंत या मातीवरुन अथकपणे चालत आलेलो आहे. मात्र या जमिनीला कधीही विटाळ झाला नाही. 

कधी कधी थकल्या भागल्यावर कोणत्याही झाडाखाली विश्रांतीसाठी थांबतो. त्या झाडांना सुद्धा कधी विटाळ झाला नाही. 

बंधुंनों, एखाद्या ओढ्यातुन, नदीतुन वाहते पाणी ओजळीत घेतो. तर कधी कधी तोंड लावून पितो. त्या ओढे-नद्यांना कधीच आमचा विटाळ झालेला नाही. 

एवढंच काय? चांभाराने बणवलेली चप्पल आम्ही वापरतो. कुंभाराने बनवलेल्या माठातलं गारं गारं पाणी आनंदाने पितो. तेव्हा कधीच आम्हाला विटाळ होत नाही. 

या सगळ्यामागे जे कोणते कारण असेल, तर ते म्हणजे अज्ञान आहे. 

म्हणून अज्ञान दूर करण्यासाठीचे विचार त्यांच्या मनात घोळु लागले. तेव्हा डोक्यात एकच प्रकाश पडला की, शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही. 

ते सावित्रीबाई फुलेंना म्हणाले,

"या समाजाला जर या अज्ञानाच्या गुलामगिरीतुन बाहेर काढायचे असेल,

यातुन सुटका करायची असेल तर,

समाजाला शिक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. शिक्षण नावाचे शस्त्र समाजाच्या हातामध्ये द्यावे लागणार आहे. ही काळाची गरज आहे." 

तेव्हा मायी सावित्रीबाई फुले म्हणाल्या,

"अहो, तुम्ही म्हणता हे खरं आहे, पण येथील मुला-मुलींना कोण शिकविल ?"

तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले गालातल्या गालातच हसत म्हणाले.

" येथील मुलींना तुम्ही शिकवणार आहात.

सावित्रीबाई फुले म्हणाल्या,

पण, मला मात्र शिकवता येणार नाही. कारण मीच अडाणी आहे. मग मला कोण शिकवील?

तेव्हा महात्मा ज्योतीराव फुले म्हणाले,

"तुम्ही समाजातील मुलींना शिक्षण देणार आहात. सज्ञान करणार आहात. पहिले तुम्ही साक्षर होणार आहात."

असे म्हणून महात्मा ज्योतीराव फुले यांनी त्याच ठिकाणी तिची शाळा सुरु केली. या शाळेला चार भिंतीच्या खोलीची गरज भासली नाही. त्यांनी निसर्गाच्या सानिध्यातच शिक्षण सुरु केले. 


     या काळ्या मातीतच, निसर्गातील साधनाने शिक्षणाला सुरुवात झाली. सावित्रीमायी मातीतच अक्षरे गिरवु लागल्या. काळी आईच्या मातीत मुक्तपणे शिक्षण सुरु झाले. आजुबाजुच्या गवताच्या काड्या तिच्या हातातील पेंन्सील झाली. झाडेवेली, पशुपक्षी, निसर्गचित्रे रंगवु लागल्या. दिवसेंदिवस होत जाणारी प्रगती बघुन त्यांचा आनंद द्विगुणीत होऊ लागला. तसेच निसर्गातील दगड-गोटे जमा करायच्या. या दगड-गोट्याच्या साहाय्याने त्या गणितीय क्रिया जसे की, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकु लागल्या. अशाप्रकारे मायी सावित्रीबाई जीवनाचे तत्त्वज्ञान शिकु लागल्या. स्वतः शिकुन, अखंड भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून नावारुपाला आल्या. 

         १ जानेवारी १८४८ रोजी  महात्मा ज्योतीराव फुले यांनी पुण्याच्या भिडे वाड्यात पहिली शाळा सुरु केली. एके दिवशी ज्योतीराव फुले, मायी सावित्रीबाईंना म्हणाले,

"तुम्ही घरातली कामे लवकर आटोपून, भिडे वाड्याकडे या. मी भिडेवाड्याकडे जातो. तुम्ही येईपर्यंत तिथल्या चारदोन मुली गोळा करतो." 

महात्मा ज्योतीराव फुले चालत चालत भिडे वाड्याच्या दिशेने निघाले. सावित्रीमायीने देखिल घरातली कामे पटापट उरकली.  त्या सुद्धा भिडेवाड्याच्या दिशेने निघाल्या. चालत जात असतांनाच रस्त्यावरची टवाळ मुले तिला शिव्या देऊ लागली. त्यांच्यातील एका टारगट मुलगा, मायी सावित्रीबाईंना भांडु लागला.

"टवाळकी कुठली?" 

"धर्म बुडवायला निघाली आहेस. इथल्या मुलींना आता ही शिक्षण देणार आहे."

असे खोडसाळपणे बोलुन हिणवु लागला. 

तेव्हा सावित्रीबाईंनी त्या टवाळक्या मुलाकडे दुर्लक्ष केले. 

त्या तसेच पुढे-पुढे भिडे वाड्याच्या दिशेने जाऊ लागल्या,

एवढ्यात कोणीतरी तिच्या दिशेने शेणगोळे भिरकावले. तरीही मायी काहीच बोलल्या नाही. त्या तशाच पुढे भिडे वाड्याच्या दिशेने जाऊ लागल्या. 

तेवढ्यात आणखी कोणीतरी टवाळखोराने, बादलीभर पाणी फेकुन ओलीचिंब केले. 

आता मायी सावित्रीबाई पूर्ण भिजुन ओल्याचिंब झालेल्या होत्या. 

तरीही त्या एक शब्दही न बोलता पुढेच पुढे जाऊ लागल्या. 

तेवढ्यात आणाखी कोणीतरी माथेफिरुने मायी सावित्रीबाईच्या दिशेने दगड भिरकावला. भर्रर्रर्रकन येऊन तो दगड मायीच्या कानावर लागला. 

कानातुन भळांभळा रक्त वाहु लागले. तिने डोक्यावरचा पदर तसाच पुढे ओढून घेतला. एक चकार शब्दही बोलल्या नाही. आणि भिडे वाड्याच्या दिशेनेच जाऊ लागल्या.

तरीही मायी जराही डगमगल्या नाही. या वरुन त्या किती दृढ निश्चयी आणि संयमी होत्या. हे दिसून येते. 

   आता भिडेवाडा पावला-पावलाने जवळ-जवळ येत होता. त्यांना समोर महात्मा ज्योतीराव फुले दिसले. त्यांच्या भोवती चार-सहा मुलींचा घोळका दिसला. ते पाहून सावित्रीबाई झालेला प्रसंग विसरुन गेल्या. त्या भिडेवाड्यात पोहोचल्या. भिडे वाड्यात मुलींना बसवणे सुरु झाले. तेव्हा मुलींच्या हातात पाटी-पेन्सिल दिल्या. मुली एक-एक अक्षर पाटीवर गिरवू लागल्या. ते पाहून सावित्रीमायींना खूप आनंद झाला. त्या आनंदाने मायीच्या डोळ्यातुन आनंदाने अश्रु येऊ लागले. 

तेवढयात बाजुला बसलेल्या एका मुलीला मायी रडत असल्याचे दिसून आले. 

ती म्हणाली,

" मायी तुम्ही का रडत आहात?"

सावित्रीमायी म्हणाल्या,

" नाही गं असंच"

त्याच बरोबर दुसऱ्या एका मुलीचे लक्ष सावित्रीबाईंच्या कानाकडे गेले.

ती म्हणाली,

"मायी तुमच्या कानातुन रक्त येत आहे. म्हणून तर तुम्ही रडत नाही, ना."

त्यावर सावित्रीमायी म्हणाल्या,

"माझ्या कानातुन रक्त येत आहे. म्हणून मी रडत नाही."

       "तर आज ख-या अर्थाने तुम्ही तुमच्या हाताने अक्षरे गिरवतांना पाहून, मला आनंद होत आहे. मी आज खरेच स्त्री जातीचा उद्धार करण्याचे काम केलेले आहे. म्हणून हे आनंदाचे अश्रु माझ्या डोळ्यातुन येत आहे."

असे मायीने सर्वांना समजावून सांगितले. 

म्हणून सांगतो.

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने, त्यांच्या कार्याचा अल्पसा आढावा घेण्याचा हा इवलासा प्रयत्न आहे.

*"विचार करा बंधुंनों,"*

या मातीत ज्या ज्या माणसाने देवाचे पाय धरले. ती ती माणसे  देवदासी झालीत. ज्या ज्या माणसाने खंडोबाचे पाय धरले. ती ती माणसे वाघ्या-मुरळी झाले. तसेच ज्या ज्या माणसाने पांडुरंगाचे पाय धरले. ती ती माणसे वारकरी झालेत. 

       मात्र याच मातीत ज्या ज्या माणसांनी महात्मा ज्योतीराव फुले, मायी सावित्रीबाई फुले यांचे पाय धरले. ती ती माणसे, किमान ग्राम पंचायत सदस्य, किंवा सरपंच तसेच पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परीषद सदस्य अथवा जिल्हा समिती सभापती किंवा जिल्हा अध्यक्ष पदावर पोहोचले आहे. शिवाय देशाच्या राष्ट्रपती पदावर देखिल महिलांनी उत्कृष्टपणे सांभाळले आहे. 

 हीच या उभयतांच्या विचारांची खरी ताकद आहे. 

       कधी तरी नक्की विचार करा. महात्मा ज्योतीराव फुले जन्माला आले नसते, तर...

आपल्या देशाची आज काय अवस्था झाली असती. 

*थोडी कल्पना करा.*

      ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आपणा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या शिवरायांच्या समाधीचा शोध घेऊन, पहिली शिवजयंती साजरी करुन, महात्मा फुले यांनी शिवरायांचे समतावादी विचार आम्हाला समजावला आहे.

विचार करा, 

महात्मा फुले यांनी आमच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे समतावादी विचार पोहोचवले नसते. तर एवढ्या महान पुरुषांकडून मिळणाऱ्या  स्फूर्ती, प्रेरणेपासून मुकलो असतो. 

    एकदा कंपनीत काम करणाऱ्यांची जेवणाची सुट्टी झाली होती. सगळे जेवण करत होते. त्यांच्या सोबतच गंगाराम कांबळे नावाचा कामगार होता. त्याच्या दुपाराच्या जेवणाच्या डब्यात मिरचीची चटणी होती. जेवतांना त्यांच्या तोंडाला खूप तिखट लागले. म्हणून 

ते पाणी पिण्यासाठी नळावर गेले. नळाला हात लावून पाणी पिणार होते. तोच एकच गहजब झाला. एकच गलका, गंगारामने नळाला हात लावला.  पाणी बाटले. नळाला हात का लावला. म्हणून लोकांनी त्याची पाठ फोडून काढली. बिचारा खूप रडला. तो प्रसंग खूप अवघड होता.

म्हणून,  छत्रपती शाहू महाराजांनी, एका दलित समाजातल्या गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला चहाचे हाॕटेल टाकून दिले. ते दररोज आपल्या टमटमीवर हाॕटेलवर थांबत असे. तेथे चहा घेत असे. तेव्हा त्यांच्या बरोबरच्या लोकांनाही चहा घ्यावा लागत असे. अशा प्रकारे आपल्या कृतीतुन अस्पृश्यतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न या महापुरुषांच्या कार्यामुळे समतावादी विचारांची पेरणी होऊ शकली आहे.

    भारतरत्न, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरु मानले. आपल्या विद्वत्तेवर, स्वतःच्या लेखणीतुन देशाला संविधान दिले. 

मेरे भिमने कलम ऊठायी! और संविधान बन गया। और ऊसी संविधानसे हमारा देश चल रहा है।

या संविधानामुळेच आज चहाची हाॕटेल चालवणारा देशाचा पंतप्रधान झाला आहे.

हीच त्यांच्या समतावादी विचारांची ताकद आहे.

      या शिवाय अस्पृश्यांसाठी घरातील पाण्याचा हौद खुला केला. बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी खूप प्रयत्न केले. विधवांच्या विवाहास उत्तेजन दिले. रात्रशाळा, दारुबंदीसाठी आंदोलने अशा एक ना अनेक समाजहितोपयोगी कामे त्यांनी केलेली आहेत.

      राष्ट्रपिता, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कार्याची बरोबरी कोणीच करु शकणार नाही. म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आज २८ नोव्हेंबर २२ रोजी वसंतराव नाईक मानव विकास प्रतिष्ठाण औरंगाबादच्या वतीने व अध्यक्ष नात्याने या महापुरुषांना विनम्र अभिवादन!

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*लेखणः- ताधों चव्हाण,औरंगाबाद. (मो.नंबर- 9921562223)*


 

Post a Comment

0 Comments