Subscribe Us

संविधान हे सम्राट अशोक,शाहू ,फुले , सयाजीराव,आंबेडकर यांच्या विचाराचा आत्मा आहे.डॉ अशोक पवार*



 

_*संविधान हे सम्राट अशोक,शाहू ,फुले , सयाजीराव,आंबेडकर यांच्या विचाराचा आत्मा आहे.* 

 *-डॉ अशोक पवार* 

 *स्वर्णिम बंजारा इतिहासकार.*

~~~~~~~~~~~~~~

बदनापूर (दि.२६). डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान चे निर्माण करत असताना, गौतम बुद्ध, सम्राट अशोक , छत्रपती शिवाजी महाराज,शाहू ,फुले आंबेडकर व सयाजीराव गायकवाड यांच्या आचार विचार व सदाचारा ला एकत्रित करून बनविलेले स्वर्णिम सत्य आहे.

जगातील सर्वात मोठे संविधान बनविण्याचा व त्याला आकार उकार देण्याचा अधिकार, *सिम्बॉल ऑफ नॉलेज* डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच जाते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बनविलेले संविधान त्यांच्या मनाप्रमाणे झाले असे देखील आपल्याला म्हणता येत नाही. संविधान सभेचे अकरा अधिवेशनाच्या शेकडो बैठका व वाद प्रतिपाद व संवादातून त्याने काढलेला हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

त्यामुळे त्यांनी 1953 च्या राज्यसभेच्या अभिभाषणात हे स्पष्ट केले होते की, मला जर कोणी परवानगी दिली तर मी बनवलेले संविधान मला जळायला आवडेल. 

प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही चुकीच्या पद्धतीने अर्थ काढतो. अर्थात त्यांना हिंदू कोड बिल ओबीसी व इतर विषयांवर सदरील संविधानामध्ये न्याय मिळवून देण्याबाबत अडचणी निर्माण होत असल्यामुळे, त्यांनी केलेले विधान हे नागरिकाच्या सदसद्वविवेक बुद्धीच्या कसोटीवर व दृष्टिकोनातून तपासून पाहणे अपेक्षित आहे .

बाबासाहेब यांच्या मते,'जगातील संविधान कितीही मोठे असले तरी, त्याचे पालन करणारे देशातील राज्यकर्ते व नागरिक जर सक्षम निघाले नाही तर, त्या संविधानाला काहीच अर्थ उरणार नाही .

तसेच जगातील संविधान किती छोटे असो त्या देशातील नागरिकांमध्ये आम्ही मानवी गुंतवणूक करू शकलो तर देशात सामाजिक न्याय प्रस्थापित करता येईल.

संविधान करत त्यांच्या अपेक्षेला भारतीय राज्यकर्ते अमलबजावणीच्या पातळीवर खुजे ठरत होते. त्यामुळे त्यांनी संदर्भीय विधान केलेले आहे.हे आपण लक्षात घ्यायला हवे.

राज्यकर्त्यांनी संविधानामध्ये शेकडो वेळेस बदल केले तरीही, उद्देशिका हा संविधानाचा आत्मा आहे .त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. असे महत्त्वपूर्ण विधान स्वर्णिम बंजारा इतिहासकार,तथा शाहू फुले ,आंबेडकर विचारधारा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील पीएचडी संशोधक मार्गदर्शक, प्राध्यापक डॉ.अशोक पवार यांनी बदनापूर येथील श्री रावसाहेब दानवे फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी महत्वपूर्ण विधान केले आहे.

भारतीय संविधान सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्याचवेळी सक्षम होईल, ज्यावेळेस मानवी गुंतवणूक सर्वसमावेशक व  सहिष्णू दृष्टिकोनातून शासन कार्य करेल.

असे संस्थेचे अध्यक्ष श्री देविदास कुंचे यांनी व्यक्त केले.

प्राध्यापक डॉ. वैशाली साळुंके यांनी आभार व्यक्त केले. तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या प्राचार्य, श्रीमती डॉ.ललिता भगुरे, डॉ.अक्षय योगेश , डॉ.योगेश, प्राध्यापक अविनाश चव्हाण पत्रकार श्री.अर्जुन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केला व कार्यक्रमाचे संचलन विद्यार्थीनी केले.

संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेने कार्यक्रमाचे सुरुवात झाले व राष्ट्रगीताने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ अशोक पवार यांनी स्वर्णिम बंजारा इतिहासाचे चार खंड संस्थेच्या ग्रंथालयाला भेट म्हणून दिली.

_

Post a Comment

0 Comments