Subscribe Us

गराशा गोधन सेवा,गोरक्षना चे आज ऐतिहासिक उदघाटन


 जै गोर जै सेवालाल जै वसंत जै लाखा बंजारा

   आज दि 25/10/2022 मंगळवार,पारखेड (जुनो तांडो) ता मेहकर जिल्हा बुलढाणा येथे गोर सिकवाडी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लढाऊवा विलास रामावत राष्ट्रीय संयोजक यांच्या पुढाकाराने तसेच सर्व पारखेड वासियांच्या आणि ग्रामपंचयत पारखेड यांच्या सहकार्याने परिसरातील गायीचे होणारे हाल लक्षात घेता,गायीचे संरक्षण, व सवर्धन करण्यासाठी 

     💐गाराशा गोधन सेवा💐

या नावाने गौशाला चे समस्त गावकरी यांचे उपस्थिती मध्ये उदघाटन करण्यात आले.लदेणी, बेपार करणारे, सतगरू सेवालाल महाराज, लाखा बंजारा मुळातच बंजारा समाज गो पालन करणारा आहे .म्हणून या प्रेरणेने कार्य करण्याचे ठरविले,यासाठी

उपस्तीत मा श्री मोतीचंद राठोड (खरेदी विक्री संघ मेहकर)यांनी मार्गदर्शन करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे अश्वाशन दिले,आणि मा श्री मुलचंद जधाव यांनी पण गो पालनाचे महत्व पटवून सहकार्याची भावना व्यक्त केली,तसेच मा प्रेमाचंद राठोड (आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त 2019) यांनी मोलाचे मारदर्शन केले.

संचलन कर्ते प्रा विशाल जाधव यांनी सुदधा गावच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेळ्या पैलूंना हात घालत शिक्षण फार महत्वाचे आहे व त्या साठी विध्यार्थी करीता एक अभ्यायसिका फार महत्वाची आहे हा प्रस्ताव एक वर्षापासून प्रलंबित असून तो कार्यनवीत करण्यासाठी आव्हान केले. की जेणे करून जे विदयार्थी शहरा मध्ये जाऊन आर्थिक परिस्तिथी कमकुवत असल्यामुळे जाऊ शकत नाही,म्हणून गावातील सर्व कर्मचारी आणि गावकरी यांच्या सहकार्याने अभ्यासिक लगेच काही दिवसात चालू करण्याचे आव्हान केले.आणि त्या आव्हानाला प्रतिसद म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ,आणि विध्यार्थीचे हिताच्या विचार करून आभार प्रदर्शन करत असताना श्री सुभाष देवसिंग राठोड (शिक्षक) यांनी 5000₹ मदत अभ्यासिकासाठी जाहीर केले .आशा प्रकारे कार्यक्रम पार पडला त्या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सहकार्याची भावना व्यक्त केली ,त्या मध्ये 

मा श्री तेजराव जाधव जि प सदस्य बुलढाणा,

मा श्री ताराचंद जाधव माजी पो पाटील ,मा रंगलाल राठोड,म श्री श्रीचंद राठोड,मा श्री विनोद चव्हाण, श्री धोंडीराम जाधव,डॉ जानकिरम चव्हाण ,श्री संजय पवार 

श्री समाधान जाधव,श्री काळूसिंग राठोड,एम बी जाधव,श्री शांताराम जाधव,जे डी राठोड, प्रकाश राठोड,प्रा महेंद्र चव्हाण,ब्रिजीलाल जाधव,नवल राठोड, विनायक राठोड,संतोष राठोड,अर्जुन जाधव,लखन राठोड,सागर राठोड,बाळा राठोड,संजय राठोड,राजू चव्हाण,वसुदेव जाधव,माणिक राठोड, रावजी जाधव, करवसिग जाधव,अशोक राठोड,कैलास जाधव,

सोबतच आई बहिणी  सौ चंद्रकला बाई, सौ सेजी बाई, सौ जोती बाई सौ वैशाली राठोड, सौ बेबी बाई, सौ शुभा बाई,सौ संगीता बाई, आई बहिणीची सुध्दा सहकार्य लाभले


Post a Comment

0 Comments