Subscribe Us

पोरीयागड,संग्रहालय


 *170 कोटी निधीतून साकारतोय पोहरादेवीतील संग्रहालय!*


 12 गॅलरीची निर्मिती, आनंदपुर साहिब " विरासत- ए- खालसा" च्या धरतीवर होणार विकास!


 लोकमत स्पेशल रिपोर्ट-9/10/22


 लोकमत न्यूज नेटवर्क......

 *अमरावती-* बंजारा समाजाची काशी श्री क्षेत्र पोहरादेवीचा 170 कोटीच्या आनंदपुर साहेब "विरासत एक खालसा" च्या धरतीवर विकास करण्यात येणार असून संग्रहालयाच्या रूपाने बंजारा समाजाची संस्कृती, इतिहासाच्या पाऊल खुणा जपल्या जाणार आहेत .येथे आतापर्यंत शंभर कोटीच्या निधीतून 12 गॅलरीचे निर्मिती होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम अमरावती विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी लोकमतची बोलताना दिली. देशात 14 कोटी बंजारा समाजबांधव 16 राज्यांमध्ये विखुरला आहे. बंजारा समाजाची भाषा, वैशभूषा, संस्कृती आगळीवेगळी आहे. या संस्कृतीला काही शतकांचा इतिहास आहे. बंजारा आणि शिख समाज समकालीन असल्याने आनंदपुर साहिबच्या धरतीवर पोहरादेवीच्या विकासाची मुहूर्तमेढ  रोवली गेली. राज्य शासनाने बंजारा समाजाच्या संस्कृतीचे जतन व्हावे .या दृष्टीने वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवीचा विकास आराखडा तयार केला. एकूण 170 कोटीतून या तीर्थक्षेत्र विकास पूर्णत्वास येणार आहे. *विशेष म्हणजे पालकमंत्री संजय राठोड* यांनी सुरुवातीपासूनच या निर्माण कार्याच्या सातत्याने पाठपुरावा केला. असून जानेवारी 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे मुख्य अभियंता जोशी यांनी सांगितले.


 *महाराष्ट्राचे लँन्डमार्क*

 पोहरादेवी तीर्थक्षेत्रांच्या समग्र विकासात अद्धितीय अशा वस्तू संग्रहालयामध्ये *संत सेवालाल महाराज* यांचा जीवनपट, बंजारा समाजाचा इतिहास संस्कृतचे दर्शन घडेल दोन वर्षांपूर्वी निधन झालेले स्वर्गीय *संत डॉ. रामराव महाराज* यांची माहिती गॅलरीत राहणार आहे. येथे स्वतंत्र विश्रामगृह, एक हजार लोकांना सामावून घेऊ शकणारे डोम वजा सभागृह तसेच पोहरादेवी ते सिंगल मार्गाचे सात मीटर उंदरी रुंदीकरण केले जाणार आहे. ही वास्तु भविष्यात महाराष्ट्राचे "लँन्डमार्क" ठरेल असा विश्वास मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी व्यक्त केला.

 ■ पोहरादेवी येथे 105 फूट उंच नगाराच्या आकाराची वास्तू तयार होत आहे. येथे बंजारा समाजाच्या संस्कृती चे जतन करताना इतिहासाच्या वाटचालीचा बोलका आलेख असणार आहे. संत सेवालाल महाराज यांचा जन्म, मृत्यू कार्यबाबत माहिती ठळकपणे असणार आहे.

 ■ समाजसुधारकाचे जिवंत भासणारे पुतळे हे आकर्षण राहील. एकंदरीत बंजारा व्हिलेज साकारले जात आहे. ही वास्तू सौरऊर्जाचलीत राहणार आहे. शिवाय वातानुकूलनाचे नवे परिमान जोडले जाणार आहे. तसेच यात भाविकांसाठी पंधरा व्यक्तींसाठी एक अशा चार लिफ्टचे नियोजन आहे.

■ बंजारा समाजाची काशी पोहरादेवी ही उभ्या महाराष्ट्रात वास्तुशास्त्राचा आदर्श नमुना ठरेल. बंजारा समाजाची संस्कृती, इतिहासाचे जतन येथे होणार आहे. अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन संत सेवालाल महाराजांचे कार्य, विचार नव्या पिढीपर्यंत नेले जाणार आहेत. गिरीश जोशी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती!

■ *आठ एकर जागेत साकारतोय काशी!*

 1) बंजारा समाजाची काशी म्हणून सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या पोहरा देवीचा विकास आठ एकर जागेत होत आहे. ही भव्य दिव्य वास्तू साकारताना अध्यात्मिक ऐतिहासिक आणि संस्कृतीची जोड दिली जात आहे.

 2) संग्रहालय माहिती अचूकपणे मिळावी यासाठी बंजारा, मराठी, हिंदी सह सात भाषांमध्ये या एअरोफोन असणार आहे. त्यामुळे भाविक भक्तासह पर्यटकांना या वस्तू नेमके काय आहे. हे सहजतेने कळू शकेल.

........धन्यवाद लोकमत न्यूज नेटवर्क



 *माहिती करीता जारी!*


 *संकलन याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -94 21 77 43 72*

Post a Comment

0 Comments