Subscribe Us

अमरावती गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार, अन कवी संमेलन


 

*गुणवंत गोर बंजारा विद्यार्थी सत्कार मेळावा व गोर बंजारा कवी संमेलन संपन्न* 


      दिनांक 17 जुलै 2022 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त *गोर सिकवाडी, गोर सेना  सामाजिक संघटना व भारतीय बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था जिल्हा शाखा अमरावती* च्या वतीने  गोर बंजारा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गोर बंजारा मायबोलीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने गोरबंजारा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

        नियोजित कार्यक्रमांमध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील  वर्ग 10 वी मधील 25, वर्ग 12 वी मधील 20, विविध कला क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करनारे 15  विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेमध्ये नव्यानेच रुजू झालेल्या 7 अधिकाऱ्यांचा सत्कार उपस्थित प्रमूख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमांमधे प्रमुख मार्गदर्शक म्हणून परळी येथील प्रसिद्ध वक्ते तथा कवी प्रा. डॉ. अरुण पवार  यांनी विद्यार्थ्यांना करीअर निवडी बद्दल मौलिक मार्गदर्शन केले.

       याप्रसंगी मराठी तसेच गोर बंजारा साहित्य क्षेत्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत माजी प्राचार्य डॉ. अमरसिंग राठोड यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या ' _मुळनिवासी बंजारा  व भटके विमूक्त'_ या पुस्तकाचे प्रकाशन माजी जिल्हाधिकारी उदय राठोड, माजी शिक्षण उपसंचालक राम पवार, जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते हिरालाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

        त्यानंतर गोरबंजारा कवी संमेलनाला सुरुवात झाली यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रेमचंद राठोड- बुलढाणा, प्रा. डॉ. अरुण पवार- परळी,  प्रा. शंकर राठोड- नांदेड, प्रा. जय चव्हाण - वाशिम, सुरेश राठोड- काटोल, रुंदन राठोड- अमरावती यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मने जिंकली. रसिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे कवी संमेलनाला अधिकच रंगत आली.

      या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण उपसंचालक चंदनसिंग राठोड, विभागीय जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, अॅड. राम आडे, सेवानिवृत्त पीएसआय मनोहर चव्हाण, माजी वाहतूक अधीक्षक उदय पवार, प्रा. डॉ. मनोज राठोड वरुड,  मुख्याध्यापक देवचंद राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्रावण जाधव,  वसंत राठोड सर धामणगाव रेल्वे, केंद्रप्रमुख विलास राठोड हे उपस्थित होते.

      महाराष्ट्र राज्य गोर सिकवाडी चे सह संयोजक प्रा. विशाल जाधव यांनी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून संघटन व सामाजिक चळवळीची भूमिका मांडून संघटन वाढविण्याबाबत आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अविनाश राठोड यांनी तर आभार प्रा. अमरपाल चव्हाण यांनी मानले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रा. डॉ. शंकर चव्हाण, राजकुमार जाधव, कैलास राठोड, उमेश राठोड, देवानंद राठोड बोडना, मनोज चव्हाण भिवापूर, विलास राठोड तिवसा, श्रीराम जाधव चांदुर रेल्वे, मुकेश चव्हाण परतवाडा, प्रा. विजय आडे वरुड, प्रा चेतन जाधव, इंजि. निरंजन राठोड, प्रवीण राठोड तसेच संघटनेच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच रायसीना स्टडी सेंटर अमरावतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

       याप्रसंगी अमरावती शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य बंजारा बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments