Subscribe Us

संवैधानिक व्यवस्था कायम राहिल्यासच अधिकार


 *Press note.*

बल्लारपूर दि.3/7/22

     *संवैधानिक व्यवस्था कायम राहिल्यासच अधिकार:-सुग्रिव राठोड़*


 भारतीय संविधाना मळे अम्हाला अधिकार मिळाले, तर सरकारी उद्योगांचे खाजगिकरण झाल्याने आमचे प्रतिनिधित्व संपुष्टात आल्याने देशाच्या राष्ट्रीय संपत्ती मध्ये आमच्या प्रतिनिधित्वाचा वाटा मिळणार नाही.या साठी भारतीय संविधानाची सुरक्षा व संवर्धना साठी आपली भुमिका बजावण्याचे आह्वान मा.सुग्रिव राठोड यांनी केले.ते बल्लारपूर येथिल फुलसिंग नाईक वार्डातील वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सदर कार्यक्रम माजी मुख्यमंत्री मा.वसंतराव नाईक व क्रांतीविर ठाणु नाईक जयंती निमित्ताने मुख्यअतिथी मा.एम.टी.साव, मूलनिवासी संघ  म्हणाले की भारतीय संविधाना मुळे अधिकार मिळाले.यापुढे आम्ही आपली ओळख मूलनिवासी म्हणुन स्विकारावी तोच एक बहुसंख्य होण्यासाठी पर्याय आहे त्यासाठी भारतीय संविधानाची सुरक्षा, सन्मान व संवर्धन करण्याची गरज सांगितले.तर अतिथी मा.जि.के. उपरे माजी मानद सचिव सिडिसिसी बॅंक चंद्रपूर यांनी वाचनालयाला पुस्तके देणार असल्याचे व मानसिक गुलामी व अंधश्रध्दा यावर विचार ठेवले.

   संचलन मा.गणेश राठोड, करमठोट दमाळ प्रकाशन चंद्रपूर यांनी केले.आभार बालाजी जाधव गोरसेना यांनी मानले.कार्यक्रमात आंमकूबाई चंदुलाल भूकीया माजी नगरसेविका न.प.बल्लारपूर, मा.इंदल राठोड, जिल्हा संयोजक गोरसीकवाडी, अशोक जाधव, बालाजी राठोड तथा अन्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments