Subscribe Us

मेहकर, लोणार,सिंदखेडराजा येथे गोर सेना कर्मचाऱ्यांनि दिले निवेदन


 निवेदन

                   ता.12/10/2021

प्रति,

 तहसीलदार/ जिल्हाधिकारी साहेब 

निवेदक : गोर सेना तालुका/जिल्हा..........


 विषय : VJNT प्रवर्गातील कर्मचारी/अधिकारी यांचे पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवणे बाबत. 


महोदय,

          उपरोक्त विषयान्वये आम्ही गोर सेना तालुका/ जिल्हा ..........सही करणार विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र शासनाने ता.29 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून VJNT प्रवर्गातील पदोन्नती आरक्षणावर गदा आणली आहे.सन 1965 पासून भटक्या-विमुक्तांना संविधानाच्या 16 अ  या तरतुदींनुसार आरक्षण मिळाले आहे. एखाद्या राज्याला आपल्या राज्यातील काही जाती किंवा जमाती मागास आहेत असे वाटल्यास ते राज्य शासन या जाती किंवा जमातींना आपल्या राज्यात आरक्षण देऊ शकते. संविधानातील 16 अ या कलमाचा आधार घेऊन राज्य शासनाने विमुक्त भटके प्रवर्ग निर्माण करून त्यांना वेगळे आरक्षण दिले. परंतु 25 मे 2004 तत्कालीन सरकारने एक चुकीचा आदेश काढला. त्या शासन आदेशाला  न्यायालयात आव्हान देण्यात आले. तेव्हापासून हा खटला न्यायालयात सुरू आहे. हा खटला मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेलं. ज्या महाराष्ट्र सरकारने या जाती-जमातींना आरक्षण दिलं त्याच सरकारांनी पदोन्नतीमध्ये आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला.ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे आज पदोन्नतीमध्ये VJNT प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे.व याला महाराष्ट्र शासनच जबाबदार आहे.तरी महाराष्ट्र शासनाने हा चुकीचा आदेश मागे घेवुन या प्रवर्गातील कर्मचारी/ अधिकारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम ठेवण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये गोर सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील  याची दखल घ्यावी.


                          गोर सेना कर्मचारी संघटना


Post a Comment

0 Comments