Subscribe Us

अहमदपूर तालुका कॅम्प

गोर सेना कार्यकर्ता मेळावा प्रशिक्षण शिबीर संपन्न.


अहमदपूर 

सांगवी तांडा येथे 

आज दि 10/10/2021 ला गोर सेने चे प्रदेश अध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला.


या बैठकीत समाज हित, सतगरु सेवालाल महाराज विचार,गोर धाटी,गोर संघटना, आणि सामाजिक अन्याय अत्याचार वर आणी समाजावर होणारे इमोशनल भावनिक बलात्कार, या पासून समाजाला सावध राहावे आसे सांगण्यात आले,


       आज मिळणारे शिक्षण, आणि बेरोजगारी, आणि भविष्यात येणाऱ्या समस्या यावर कसे मात करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आले


आणि गोर सिकवाडी,गोर सेना नवनियुक्त तरुण,आणि सामाजिक नेत्याला सोबत घेऊन समाज हिताचे काम करून घेण्याचे आव्हान करण्यात आले


गोर सेनेत तरुण पत्रकार विचारवंत सोबत घेऊन गोर सेना सामाजिक संघटना मजबूत करून समाजावर होणारे अन्यायाला सामोरे जाऊन प्रन्न कसे सोडवता येईल,या साठी तरुणाना मार्गदर्शन करण्यात आले,

या कर्यक्रमाचे आभार वसंतराव नाईक फाउंडेशन चे अध्यक्ष बंडू राठोड सर यांनी मानले..

या कार्यक्रमास उपस्थित तालुक्यातील बंजारा बांधावासह महाराष्ट्र राज्य सह-हसाबी राजसंग राठोड सर, गोर सेना महाराष्ट्र राज्य सह सचिव बब्रुवान पवार, गोर सेना महिला प्रदेश अध्यक्षा साधना ताई जाधव,   तालुका अध्यक्ष संतोष राठोड, तालुका उपाध्यक्ष, लाक्षिमी जाधव गुरुजी, अहमदपूर शहर अध्यक्ष किरण राठोड, तालुका प्रसिद्धी प्रमुख कृष्णा राठोड, अहमदपूर तालुका संयोजक रवीकुमार राठोड, तालुका सचिव विलास राठोड, तालुका कोषअध्यक्ष राजा भाऊ राठोड,  चाकूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,

या प्रशिक्षण कार्यक्रमा साठी तालुका अध्यक्ष संतोष राठोड,शहर अध्यक्ष किरण राठोड यांच्या समवेत सांगवी तांडा येथील तरुणांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली...


 

Post a Comment

0 Comments