Subscribe Us

पोरीयागड आत घडो इतिहास, भुकेन बाटी,


 

 
भुकेन बााटी,तरसेंन पाणी,

 शुभारंभ

        तीर्थक्षेत्र बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे *श्री देवी सेवादास महाराज संस्थान ट्रस्ट* च्या वतीने सुरू असलेले श्री श्री श्री संत रामरावजी बापू स्वप्नपूर्ती अभियानाअंतर्गत 

आज दि.१०ऑक्टोबर२०२१रोज रविवार ला श्री सेवालाल महाराज मंदिर परिसरात *अन्नछत्र* अविरतपणे सुरू राहणार आहे त्यांचे *श्री ययाती नाईक* यांच्या हस्ते *उद्घाटन* करण्यात आले.

        या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ययाती नाईक माजी उपाध्यक्ष जि प यवतमाळ प्रमुख उपस्थिती श्री रामसिंग जाधव माजी सभापती जि प अकोला, श्री जयकीसन भाऊ माजी सभापती जि प वाशिम, हिरासिंग राठोड उपाध्यक्ष जि प अकोला. श्री मिठाराम राठोड माजी अध्यक्ष जि प लातूर, पंकज पाल महाराज, बळवंत महाराज, महंत रायसिंग महाराज श्री गुलाबराव जाधव, नामदेवराव राठोड, लोकिया नायक इंजिनिअर व आर्किटेक्ट श्री भावराव जाधव, वसंत राठोड, विष्णू आडे,इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

        श्री महंत रायसिंग महाराज यांनी प्रास्ताविक व विलास राठोड यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. श्री जयकीसन भाऊ राठोड यांनी मंदिर विकासाला भरीव मदत करण्याचे आवाहन केले तर श्री रामसिंग जाधव यांनी या मंदिर बांधकामाला सढळ हाताने देणगी देऊन मंदिर विकासाला गती देऊ असे जाहीर केले करून देविभक्त कबिरदास महाराज आणि त्यांचे टीमचे कौतुक केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ययाती नाईक यांनी मंदिर प्रशासनाने अन्नछत्र अविरतपणे सुरू करून भाविकांची सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दल कबिरदास महाराजांचे कौतुक केले आणि श्री जगदंबा देवी मंदिराच्या बांधकामास सर्व समाज मदत करेन अशी ग्वाही दिली.

         *अन्नछत्र कक्षाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून अन्नदान व महाप्रसाला सुरुवात झाली*.

       या कार्यक्रमाला पुसद, कारंजा, आर्णी, दारव्हा, यवतमाळ, अकोला पातूर,पांढरकवडा, नागपूर, वाशिम मानोरा मेहकर, राजगड, मंगरुळपिर या तालुक्यातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

      अन्नछत्र कक्षाचे रीतसर उद्घाटन झाल्यानंतर हजारो भाविकांनी येथेच्छ भोजन करून समाधान व्यक्त केले आणि अन्नछत्र या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि अन्नछत्रला आर्थिक व अन्नधान्याची कमतरता पडू देणार नाही असे अनेक दानशूर व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले आहे.

      कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री श्री संत रामरावजी बापू स्वप्नपूर्ती अभियानाचे सर्वेसर्वा महंत रायसिंग महाराज राजगड, इसवी तांड्याचे अनेक दानशूर भक्त मंडळी, के बी राठोड, विलास राठोड, प्रा प्रकाश राठोड, देवराव महाराज, राजुदास महाराज, कुंडलिक राठोड मधुकर नागोराव राठोड, मधुकर नाईक, प्रा जगदीश राठोड, सुरेश राठोड, अविनाश राठोड, अशोक महाराज,बाजीराव महाराज, खुशाल महाराज, गणेश जाधव सरपंच वसंत नगर, भिकुसिंग चव्हाण ठेकेदार, आदींनी परिश्रम घेतले......

      ......जय सेवालाल.....

Post a Comment

0 Comments