Subscribe Us

साहित्यातील कोहिनूर, 23 मे 2021 तांडा कार आत्माराम कनिराम राठोड यांचा 17 वा स्मृती दिन भावपूर्ण आदरांजली

 

*23 मे 2021 तांडा कार आत्माराम कनिराम राठोड यांचा  17 वा स्मृती दिन भावपूर्ण आदरांजली👏👏*💐💐💐💐💐💐💐

*साहित्यातील कोहिनूर*
📚📚📚📚📚📚📚📚
----------------------------------------------------------
✍ *याडीकार,पुसद📞 9552302797* 
============================
 *तांडा या आत्मचरित्राने साहित्य विश्वात खळबळ उडवून देणारे प्रसिद्ध साहित्यिक आत्माराम कनीराम राठोड* यांचा जन्म पुसद तालुक्यातील मोहा ईजारा येथे 13 जानेवारी 1948 रोजी झाला. गहुली येथे प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण पुसद येथे केले. त्यांनी बंजारा समाज संघटनेत सुद्धा काम केले. त्याच दरम्यान त्यांची लेखणी सुरू होती. बंजारा समाजाची स्थिती व सामाजिक चळवळीतील अनुभव त्यांनी *तांडा* मध्ये शब्दबद्ध केले तांडा मध्ये त्यांनी जळजळीत शब्दात अनेक मान्यवरांचे बुरखे फाडले .तांडा ज्या रोख-ठोक शैलीत लिहिले गेले .त्याची साहित्यविश्वात चांगलीच वाखाणणी झाली. *ज्ञानपीठ व मॅगसेस पुरस्कार प्राप्त महास्वेता देवी यांनी तांडा चे बंगाली भाषांतर केले आहे .तसेच तांडा चे इंग्रजीतही भाषांतर झाले आहे* तांडा व्यतिरिक्त आत्माराम राठोड यांच्या नावावर अनेक साहित्यकृती आहेत. गोरबंजारा ज्ञानकोश, आत्माराम राठोड यांच्या कविता ,बायबल मधील सामाजिक संदर्भ आणि भारतीय भटके ,आदी पुस्तके लिहिली तसेच बंजारा संस्कृती वरील संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी लिहिला आहे . *तांडा या आत्मचरित्रा बद्दल त्यांना अस्मितादर्श पुरस्कार मिळाला होता* विदर्भ साहित्य संघाच्या वतीने कुरखेडा येथे घेण्यात आलेल्या पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते .नंदुरबार येथे झालेले विद्रोही साहित्य संमेलन, केळझर येथील आंबेडकरी साहित्य संमेलन व गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांच्यामागे एक मुली व एक मुलगा आहे . आत्माराम राठोड यांनी बंजारा संत सेवादास महाराज यांचे चरित्र पद्यात लिहिले त्यांचा बंजारा *नेते महानायक वसंतराव नाईक, जलनायक सुधाकरराव नाईक, मनोहरराव नाईक, प्रतापसिंग आडे यांच्याशी घनिष्ठ संबध होता* आत्माराम राठोड यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारून *डॅनियल राणा* असे नाव धारण केले होते .ते काही दिवस वर्धेत  राहिले .विद्रोही साहित्याची मशाल अशी त्यांची ओळख होती. नंदुरबार येथील विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते फुले-आंबेडकर चळवळीतील धगधगता निखारा म्हणून आपल्या साहित्यातून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते कमी शिकले असले तरी अखंडपणे लिहीत होते परांगदा अवस्थेत जीवनात एक क्षण वेचत ते परिवर्तनाचे स्वप्न उरात बाळगून होते. *एक ना एक दिवस समाजात परिवर्तन घडेल हा त्यांचा दांडगा आत्मविश्वास होता* पुजारी आणि पुढाऱ्यांनी समाजाची खुंटलेली प्रगती ते केवळ लेखणीच्या बळावर गतिमान करू इच्छित होते .तांडा या आत्मचरित्रांने साहित्यविश्वात खळबळ उडवून दिली होती आत्माराम कनीराम राठोड हे बंजारा लोक जीवन इतिहास व लोकसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक होते. त्यांच्या *श्री संत सेवादास लीला चरित्र या ओवीबद्ध ग्रंथला  पुणे विद्यापीठ चा पुरस्कार मिळाला* तर तांडा या आत्मकथनाला अस्मितादर्श पुरस्कार मिळाला .गोर बंजारा इतिहास व लोकजीवन या पुस्तकाला पहिला लाखा बंजारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .आत्माराम कनीराम राठोड महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य होते. तसेच ते अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे कार्यकारिणीचे सदस्य होते. काही दिवस त्यांनी पद्श्री रामसिंगजी भानावत सोबत शुद्धा काम केले होते. बायबल मधील सामाजिक संदर्भ आणि भारतीय भटके या ग्रंथातून त्यांनी भटक्यांच्या लोक जीवनाचे संदर्भ बायबलच्या आधारे संशोधन करून समाजशास्त्रीय अभ्यासका साठी नवे दालन खुले करून दिले आहे . *धरतीचे धनी*  हा त्यांचा पहिला लेख संग्रह *लदेणी* हा पहिला कवितासंग्रह  त्यांनी 2003 साली प्रकाशित केला. *अज्ञानकोश, नसाब नीती हा त्यांचा शेवटचा लेख संग्रह*  बंजारा गणाच्या न्याय पंचायतीला नसाब म्हणतात. याचा न्यायनिवाडा करताना आपल्या अशिलाच्या बाजूने बिनतोड गोष्टी सांगण्याची परंपरा आहे .ती निती अजूनही अस्तित्वात असल्याने तशाच गोष्टीचा खजिना म्हणजे *अज्ञान कोश* ऑक्टोंबर 19 94 मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून त्यांनी *डँनियल राणा* हे नाव धारण केले होते .भटक्या विमुक्तांचा कैवारी अल्प शिक्षणातून त्यांनी साहित्य क्षेत्रात घेतलेली भरारी लक्षणीय आहे. त्यांच्या कविता बऱ्याच गाजल्या. मराठी साहित्यात दर्जेदार वाचनीय काव्यसंग्रह म्हणून त्यांचा लदेणी प्रसिद्ध आहे तुमचा तो वसंत आमचा उन्हाळा ,साप आणि मुंगसाची लढाई ,यासारख्या विद्रोही कवितांनी तत्कालीन तरुण पिढीचे प्रतिनिधित्व केले होते. महाराष्ट्रभर विविध काव्य संमेलनातून त्यांच्या कविता चांगल्या गाजल्या. दलित साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन आदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान आत्माराम राठोड यांना लाभला होता. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आत्माराम राठोड यांना बालपणी संत साहित्याची आवड होती. त्यांनी शालेय जीवनात संत नामदेव, तुकारामाच्या गाथा वाचून काढल्या. वाचनाच्या छंदातून ते पुढे रचनेकडे वळले. जन्मतात त्यांना प्रतिभा शक्तीचे वरदान लाभले होते. बंजारा समाजाचे प्रेषित संत सेवालाल यांचे ओवीबद्ध चरित्र त्यांनी तरुण वयातच लिहिले. मराठीचे प्राध्यापक ग.वा. करंदीकर सर यांचे मार्गदर्शन यासाठी त्यांना लाभले होते .महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने या पुस्तकाला अनुदान देऊन *संत सेवादास लीळाचरित्र या नावाने प्रसिद्ध केले* तांडा कार आत्माराम कनीराम राठोड यांचे शिक्षण शालांत परीक्षेपर्यंत झाले असले तरी त्यांच्या प्रतिभेची झेप उत्तुंग होती. बंजारा संस्कृतीवर आधारित बंजारा बोली भाषेतील काव्य गीताची  लदेणी  हे पुस्तक त्यांच्या प्रतिभा शक्तीची ओळख देते. त्यांनी लिहीलेल्या तांडा या आत्मचरित्राने ते संपूर्ण महाराष्ट्राला  परिचित होते. तांडा या पुस्तकाची पहिली आवृत्ती 10 नोव्हेंबर 1989 रोजी प्रकाशित झाली. त्यांचे हे आत्मचरित्र एक दर्जेदार कलाकृती म्हणून साहित्यविश्वात ओळखली गेली .त्यांनी लिहिलेली तांडा ही आत्मकथनपर कादंबरी मराठी साहित्यात मानदंड ठरली. या आत्मकथनाला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत . सुरुवातीच्या काळात  त्यांनी पुसद येथे  शब्दलोक  मुद्रणालय सुरू केले  .व अक्षर चळवळीला  येथूनच स्वरूप आले . कविमनाचे परंतु  बेदरकार वृत्तीच्या  आत्माराम कनीराम राठोड यांनी  आपल्या काव्यातून सामाजिक  राजकीय व्यंगावर  कठोर प्रहार केले.  काही दिवस त्यांनी  डंका हे दैनिक चालवले . *मात्र  शब्द लोक  आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर  त्यांनी पुसद वरून यवतमाळ मुक्काम हलविला* अनेक कवी संमेलनातून त्यांनी प्रखर  काव्याने अग्नी फुले फुलवली रंजल्या-गांजल्या भटक्या-विमुक्तांच्या व्यथांना  विचारपीठ मिळवून दिले छोट्या-मोठ्या दलित चळवळीतून त्यांनी सातत्याने भाग घेतला त्यांच्या कवितांमधून ते सांगतात.

 *आम्ही मागतो एक झोपडी* *जी कोणी माईचा लाल जाळणार नाही -पाडणार नाही* *आम्हाला हवेत कपडे अंगाला*
*बाया-बापड्या च्या जे कोणी उन्मत्त नराधम फेडणार नाही*

 *दोनच काय*
 *कितीही मिळाली स्वातंत्र तरी* 
*हा प्रश्न कायमच आहे*
*ते कोणत्या गाढवीचे नाव आहे?*
*कुलरच्या गारव्यात*
*कुहु$ कुहु$  बोलेरे कोयल याची* 
*ऐल्पी ऐकताना*
* *जाणवेल कशी*
 *फुटाण्याप्रमाणे फुटत चाललेल्या*
*नांगरटीच्या ढेकळात होणारी अनवाणी पावलांची काहिली निर्वासितांच्या छावणीत*
 *संगरास सिद्ध   आम्ही*
*युद्ध व्हावे भारती*
 *सेनापती बुद्ध हवा कृष्ण नको सारथी*

आत्माराम कनीराम राठोड यांनी 1985 मध्ये विधानसभेची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. बंजारा  संस्कृतीचे  ते गाढे अभ्यासक होते. अनेक बंजारा गीते त्यांना  मुक्तोगत होती .बंजारा संस्कृतीच्या सखोल अध्ययनासाठी  त्यांनी भरपूर पर्यटन केले . प्रतिभासंपन्न कवी संत वाड;मयाचा अभ्यासक व एक  समीक्षक  या नात्याने  परिचित असलेल्या  आत्माराम कनीराम राठोड हे स्वभावाने  बेदरकार वृत्तीचे होते .प्रसिद्ध साहित्यिक आत्माराम कनीराम राठोड यांची आणि माझी भेट यवतमाळ येथील रेस्ट हाऊसवर एम आर राठोड इंजिनीयर पांढरकवडा यांच्यासोबत झाली. आणि आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत गोर बंजारा साहित्य आणि समाज या विषयावर सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेतून त्यांचे गोर बंजारा समाजाविषयी असलेले अफाट ज्ञान समाजा विषयी असलेली कणव आणि तळमळ दिसून आली. दुसरी भेट मुंबई येथील महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्था संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये झाली. त्यावेळी त्यांनी डॅनियल राणा  हे नाव धारण केले होते *आत्माराम राठोड यांच्या कविता* हा कवितासंग्रह घेऊन ते कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. परंतु त्यावेळेस त्यांचा तो कवितासंग्रह कोणीही विकत  घेतला नाही. त्यानंतर त्यांनी दहा पुस्तकांचा संच घेण्याबाबत मला सूचना केली. मी माननीय सुभाषभाऊ राठोड सरचिटणीस महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्था यांच्याकडे देऊन सदर पुस्तकाची शंभर रुपये प्रमाणे दहा पुस्तकाचे एक हजार रुपये देऊन त्यांची त्यावेळी तिकिटाची सोय करून दिली होती .त्यावेळेस ते स्वतः हजर असताना त्यांची पुस्तके न घेणारा हा  गोरबंजारा समाज आज त्यांच्या  पुस्तकासाठी वन वन भटकतो आहे .त्यांच्या एक एक पुस्तकाची बोली हजारात काय दोन दोन हजार बोली लावतो आहे .तरी त्याची पुस्तके आज रोजी मिळत नाही. प्रचंड ताकतीने ,निर्भीड, रोखठोक त्यांनी लेखन केलेले असून त्यांच्या लेखनातून गोरबंजारा समाजाचे जीवन आणि इतिहास प्रत्येक पाना पानावर दिसून येतो. त्यांच्या नावावर आज अनेक लोक पीएच .डी. करत असून. त्यांची पुस्तके आज दुर्मिळ झालेली आहे. बंजारा समाजातील नव्हे तर मराठी साहित्यविश्वातील हा कोहिनूर पुन्हा होणे नाही. 23 मे 2005 रोजी आयुष्याची झालेली परवड यामुळे विद्रोही साहित्यिक आत्माराम कनीराम राठोड आमच्यातून निघून गेले. त्यांचा साहित्यिक सुगंध मात्र सर्वत्र दरवळतो आहे .त्यांना भावभीनी आदरांजली👏👏💐💐💐💐
 *तांडा कार यांची ग्रंथसंपदा*

 **कथासंग्रह* 
1)धरतीचे धनी 1969 
2)अज्ञान कोश अर्थात  नसाब नीती 2001
3) हामार गोरूर  बाल बचार साकी 2001 

*कवितासंग्रह*
1)काटे आणि कळ्या 1978
2) लदेणी 1983 
3)आत्माराम कनीराम राठोड यांच्या कविता 2003

 *स्वकथन*
1 )तांडा 1989 व 2002 दुसरी आवृत्ती

* *चरित्रग्रंथ*
1) श्री संत सेवादास लीलाचरित्र 1973

*इतर ग्रंथसंपदा*
1) गोर बंजारा इतिहास व लोकजीवन 1994
2) बायबल मधील सामाजिक संदर्भ आणि भारतीय भटके 2000

*✍याडीकार,पुसद*
📚📚📚📚📚📚📚📚


Post a Comment

0 Comments