Subscribe Us

गोरमाटी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला*


 

गोरमाटी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला

_____________________

किनवट -

 दि.2 एप्रिलला सारखणी,ता.किनवट,जि.नांदेड येथे सोना गार्डन मध्ये ज्येष्ठ साहित्यिक बापू भिमणीपुत्र मोहन गणुजी नायक यांचा 74 वा जन्म दिवस 'गोरमाटी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात आला.देशावर 15 कोटीच्या आसपास विखुरलेल्या गोरमाटी बंजारा लोकगणाची वैशिष्ट्यपूर्ण धाटी व बोलीभाषा जतन आणि संवर्धन करण्याचे महत्वाचे कार्य बापू भिमणीपुत्र मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत.त्यांच्याच प्रेरणेने आज कित्येक कवी-लेखक गोरमाटी भाषेत लिहिते झाले आहेत.त्यामूळे अलिकडच्या काळात या भाषेतही विपुल ग्रंथसंपदा निर्माण झाली आहे.आदीम गणाची भाषा म्हणून मराठी, हिंदी,संस्कृत सारख्या भाषांना समृद्ध करण्यात गोरमाटी भाषेचा सिंहांचा वाटा आहे.ही भाषा टिकली पाहिजे.तिला भाषिक दर्जा मिळाला पाहिजे.यासाठी बापू भिमणीपुत्र  असह्य बिमारीने जर्जर असुनही अविरतपणे लिहित आहेत.नव कवी लेखकांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत.त्यांच्या या महान कार्याची दखल घेत गोरगणातील समाजधुरीनांनी व साहित्यिकांनी मागील सहा वर्षांपासून त्यांचा जन्मदिवस हा 'गोरमाटी भाषा गौरव दिन ' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

  काल झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गणेश चव्हाण नागपूर, उद्घाटक माजी आमदार श्री प्रदीप नायक, स्वागताध्यक्ष श्री बंडुसिंग नायक,चिंचखेड, प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त संघर्ष समितीचे संयोजक प्रा.मोहन चव्हाण, शिक्षण मंडळाचे निवृत्त सहसचिव मा.श्रीराम चव्हाण, श्री टि. एन. चव्हाण, श्री अशोक पवार, श्री मोरेश्वर राठोड (नागपूर)श्री सुधाकर जाधव काटोल, इंजिनिअर गोपाळराव चव्हाण, जेष्ठ कवी एन.डी.राठोड,श्रावण राठोड (लातूर) हे आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी सत्कारमूर्ती बापू भिमणीपुत्र-मोहन गणुजी नायक यांचा सपत्नीक सारखणी व हिरानायक तांड्याचे नायक व कारभारी यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . बंजारा गोरबोली भाषा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल बंजारा साहित्यिक भीमणीपुत्र मोहन गणुजी नायक यांना गोरबोली रेडिओ - स्वच्छंदी भरारी तर्फे २० २४ या वर्षासाठी ' जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 

गोरबोली बंजारा भाषेच्या उन्नतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या साहित्यिकाला सन्मानित करण्याचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे बंजारा भाषेच्या जतन व संवर्धनासाठी आणि मूल्याधिष्ठीत साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न होतील .या विचाराने गोरबोली रेडिओ स्वच्छंदी भरारी तर्फे 2024 पासून दर तीन वर्षांनी बंजारा भाषेसाठी काम करणाऱ्या साहित्य कलावंतांना गौरवण्याचा ठरविले आहे . याचाच एक भाग म्हणून पहिला जीवनगौरव पुरस्कार स्मृतीचिन्ह मानपत्र व 5000 रुपये रोख शाल व पुष्पगुच्छ देऊन गोरबोली रेडिओ चे संचालक एकनाथ गोफणे आणि जाहिरात प्रमुख गोरख गोफणे यांच्या हस्ते सन्मानिक करण्यात आले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी सुरेश मंगुजी राठोड काटोल-नागपूर, प्रास्ताविक प्रा रवींद्र राठोड नागपूर,तर आभार प्रा वसंत राठोड किनवट यांनी केले.या कार्यक्रमांतर्गत कवी संमेलन झाले.प्रसिध्द गीतकार कवी अरुण पवार परळी हे अध्यक्ष तर प्रसिद्ध कवी शंकर राठोड मुखेड यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.जवळपास २० कवींनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कविता सादर केल्या.कवी अमोल नायक, सुग्रीव राठोड, गणेश करमठोट,अॅड.चेतन नायक, सुरेश राठोड, देविदास राठोड, धिरज नायक, डॉ नयन नायक, विकास चव्हाण, सुरेश पवार, रविंद्र चव्हाण व मित्रमंडळीनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.

घेतली.

Post a Comment

0 Comments