Subscribe Us

समाज परिवर्तन काळाची गरज


 मयताचे पाचवी तेरवीला फाटा तर तिसरा दिवसच समाज उन्नतीचा पर्याय.समाज परिवर्तण काळाची गरज.                                          मी काल जे होतो ते आज नाही व आज आहे तो उदया असणार नाही.हाच परिवर्तनाचा भाग आहे.परिवर्तण कधी पुस्तकातून तर कधी दुसर्‍याचे विचार पटल्याने होत असते.मला दुसर्‍याचे विचार पटले म्हणून तिसर्‍याला सांगणे माझे कर्तव्य आहे.पटले तर स्विकारायचं असतं.नाही पटले तर कोण आपल्याला सक्ती करतो.एकवेळ धुंदी घाटोडी येथील मयताचे तिसरे दिवशीचे संस्काराला जावून बघा.एका घरात तिन तिन मुले नोकरिला आहेत.तेथे गरिब असो कि श्रीमंत तिसरा दिवसच करतात.ना मंडप,ना भजन ,ना जेवणाचा कार्यक्रम. नुसते आपण समोरच्याचे दुखात सामिल होणे एवडेच काम.चहापाणीवर भागवतात.त्याही गावाला पूर्वी मोठमोठ्या पंगती व्हायच्यात.गाव वाल्यांचे लक्षात आले की मोठी माणसे  करून घेतील पण गरिबाचे काय? गरिब नेहमी मोठयाचे अनुकरण करित आला आहे.गरिबाने जरी कमी बजेटमध्यै करतो म्हटले तरी कमीतकमी 30 हजार रूपये लागतात.पहिलेच घरात माणूस मेलेला असतो .अशावेळेस गरिबाने कोणाजवळ हात पसरावयाचे.आणि पसरलेच तर त्याला शेती गहाण दयावी लागणार किवा सालाने राहावे लागणार.हा खर्च कमी सांगतोय.कुठेकुठे तर अंशी हजारापर्यंत हा खर्च गेलेला आहे.ज्या शेतीवर तुम्ही वर्षभर राबराब राबता.तो वर्षाचा उत्पन्न आपण घालून मोकळे होतो.राहिला प्रश्न अन्नदानाचा.तर अन्नदान हे 1970 ते 1990 चे काळात महत्त्व होते.लोकांना खायला भेटत नव्हते.आज तुम्ही कितीही चांगले करा.दोन तिनशे माणसे तर जेवतही नाही.निघून जातात.काही लोक म्हणतात घरी आलेल्या माणसाला उपाशी कसे पाठवायचे? जूण्याकाळात माणसे पायी,सायकलने,छकडयाने यायचे व त्यांचा संपूर्ण दिवस निघून जायचा .म्हणून उपाशी जावू नये म्हणून बाहेरच जंगलात पोळी व गुळाचा चुरमा करायचे.इतपर्यंत ठिक आहे.परंतु आता दळनवळणाची साधने भरपूर झालेली आहेत.आता कोणीही पायी किवा छकडयाने येत नाही.तर मोटरसायकल किवा ईतर वाहनाने एका तासात पोहचतात व एका तासात आपापल्या घरी जातात.आणि एक तास माणसाला खायला भेटले नाही म्हणून तो उपाशी राहतो असेही होत नाही.आणि मेलेल्या माणसाचे घरी माणूस दुःखात सहभागी होण्यास जात असतो ,जेवायला नाही.मागे कोरोनाकाळात माझा आतेभाउ वारला.जानजवाण होता.लोकलजेसाठी जेवायला केले.परंतु माणसे जेवली नाहीत.कारण घरातला कर्ता पुरूष व जवाण माणूस गेला.कोणाला जेवण जाणार.मग अशावेळी ती माणसे काय उपाशीच मेली.?घरून निघाला कि माणूस रस्त्याने भजे खिचडी ढोसून येतो.मग आपणही धुंदी घाटोडीचे अनुकरण केले तर बंजारा समाजाचे साठ सत्तर हजार रूपये वाचतील,गरिबाची शेती वाचतील व समाजाची आर्थिक उन्नती होईल. हा एक परिवर्तणाचा भाग आहे.आणि परिवर्तण तर आपण करितच आलो आहोत.तिसऱ्या दिवशीची प्रथा बंद करून पाचवी तेरवी करायला लागलो.पाचवी तेरवीला दिलेली उसनवार आजपर्यंत कोणीही सोडलेली नाही.व आईबापाची तेरवी पाचवीचे पैसे बुडवू नये म्हणून गरिब आपली शैती चारपाच वर्षाचे बोलणीने मक्त्याने लावतील,सालाने राहतील परंतु पैसे देतील.हेकाय समाजाची आर्थिक उन्नतीचे लक्षण तर मुळीच नसणार.आणि मी काही भजन बंद करा असे म्हटलेले नाही.फक्त पाचवी तेरवीचे खर्चासोबत भजनाचे खर्च टाळा असे म्हणायचे आहेत.भजनकरी समाजप्रबोधनाचे चांगले माध्यम आहेत.मागील दोन तिन वर्षापूर्वी भजनकरीचे समेलन घेण्यात मी ही पुढाकार घेतलेला आहे. मरणानंतर अवास्तव खर्च करण्यापेक्षा जीवंतपणी सेवा करा.खाउ घाला. मेल्यानंतर त्याची कितीही स्तुती करा तो कुठे ऐकायला येतो.आणि मागे उरलेली मंडळीने कशी सेवा केली कि आम्हीच दारू ढोसून राहतो हे तरी भजनकरिला काय माहीत .अंदाजा अंदाजानेच तो बोलतो.मला धुंदी घाटोडीचे लोकांचे पटले व साविकारले.म्हणून ईतरालाही सांगण्याचा प्रयत्न. पटलं तर स्विकारा नाही तर खर्च करायला मोकळीक आहे.गरिब मात्र लोक लजेलज्जेखातर मोठ्याचे अनुकरण करत असतो.परंतु जो पर्यंत मोठे असा परिवर्तण करणार नाही हे असेच चालत राहणार.मोठा मोठाच होत जाणार व गरिब गरिबच राहणार. प्रत्येक्ष भेटीअंती आणखी सविस्तर बोलूत

Post a Comment

0 Comments