Subscribe Us

बोगस घुसखोरी विरोधात गोर बंजारा विमुक्तांचा मंत्र्यांना घेराव


 बंजारा बांधवांनो,

    *समाज कार्य करणाऱ्या समाज बांधवांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपा!*

           राजपालसिंह राठोड

           'पांढरे वादळ महामोर्चा' याचा मुख्य उद्देश बंजारा समाजाचे आरक्षण वाचविणे हा आहे. अजूनही ही लढाई संपलेली नाही यादरम्यान माझ्यावर अनेक आरोप झाले मी ते सर्व आरोप गिळून गप्प होतो. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाजकार्य करतांना अशा अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. कळत नकळत गैरसमज निर्माण होतात. माझ्या पाठीशी असे अनेक अनुभव मला आहेत. परंतु माझ्या हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणाऱ्या बांधवांकडून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माझ्यासाठी झटणाऱ्या बंजारा बांधवांमुळे मी प्रतिक्रिया दिली. मी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा निर्णय घेतला होता. कोणत्याही बंजारा बांधवांशी माझे वैर नाही. ते सर्व माझे भाऊ आहेत. मी लोकशाही प्रिय आणि संविधाननिष्ठ असणारा एक कार्यकर्ता आहे. यासाठी म्हणून सर्वांना प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेत असे मी मानतो. माझी लढाई सत्ताधाऱ्यांशी आहे. तीन टक्के एवढे तुटपुंजे आरक्षण असताना देखील आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होते. आमचे शिक्षण आणि नोकरीचे अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की दिनांक १६ सप्टेंबर 2023 रोजी महिला घेराव आंदोलनाच्या कामाला लागा.

   बंजारा समाजामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक माझे समाज बांधव आहेत. बंजारा समाजाच्या ज्वलंत विषयावर ही मंडळी रात्रंदिवस झटत असतात. आपल्या कुटुंबाचा सुवर्णकाळ (गोल्डन टाईम) ते समाजाला देत असतात. मग हि मंडळी कोणत्याही वैचारिक पार्श्वभूमीची असेना ते समाजाच्या हितासाठी समाजकार्यासाठी वेळ देत असतात. यासाठी म्हणून त्यांना तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपा. त्यांना त्यांचा आदर, त्यांचा मान, सन्मान हा मिळालाच पाहिजे. या मताचा मी आहे.

    कृपया त्यांचे मनोबल आपण उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे.    

    यासाठी म्हणून माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की, आपण यापुढे कोणताही वादविवाद न करता पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहू या!


   *दि. १६/०९/२०२३ या पांढरे वादळ महिला महामोर्चाच्या कामाला लागा!*

Post a Comment

0 Comments