Subscribe Us

देवेधर्मेरो राजकारण आण ओर दुसपरिणाम


देवधर्मात राजकारणाचा हस्तक्षेप आणि त्याचे दुष्परिणाम.

---------------_------&&&-----------------
  खरे तर देव आणि धर्म ही खाजगी बाब आहे.देव मानवा की मानू नये.धर्म धरावा की सोडावा याचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे.त्यास कुणीच किंवा कोणताच कायदा आड येत नाही.धर्म म्हणजे देवाची उपासना करण्यासाठीच मार्ग किंवा एक प्लॅटफॉर्म किंवा एक क्षेत्र एक विषय असून तो स्वतंत्र आहे.राजकीय क्षेत्र सुधा एक स्वतंत्र क्षेत्र आहे.एकमेकांची सरमिसळ होता कामा नये.ही एक अट किंवा पथ्य सर्वांनी पाळले पाहिजे.देव धर्म ही श्रध्दा विश्वास भक्ती चा विषय आहे.राजकीय किंवा राजकारणाचा मते मागण्याचा विषय नाही.परंतु घटनाकारांनी राजकारण आणि धर्मकारण यांची सरमिसळ होता काम नये.असे एखादे कलम टाकले असते तर न्यायालयाला निकाल देण्यासाठी सोपे गेले असते.
  लोकांची श्रद्धा देव धर्मावर आहे.तिथे सर्वांच्या भावना गुंतलेल्या आहेत हे पाहून याचा फायदा प्रत्येक पक्ष निवडणुकी साठी व्होट बँक साठी करताहेत.हे मी सांगण्याची गरज नाही.सर्वश्रुत आहे.परंतु सर्वसामान्य मतदार हा साधा भोळा आणि राजकीय दृष्ट्या अपरिपक्व आहे.त्यास हे सांगणे जरुरीचे आहे.शिकलेसावरलेले लोक सुध्दा यास बळी पडतात.कारण धर्माचे भूत प्रत्येकाच्या डोक्यात घुसले आहे.प्रत्येकाला आपला धर्म एव्हढा प्रिय झाला आहे की त्यासाठी जीव द्यायला आणि घ्यायला सारेजण तय्यार आहेत.नव्हे धार्मिक दंगली हे राजकारणी लोक घडवून आणत आहेत त्यात कित्येकांचा बळी जातो आहे.हिंसा फैलावत आहे.धर्माचा फायदा राजकारण्यांना मतासाठी होतो आहे.पण देशाची एकसंघ समाजाची अखंडता भंग होत आहे.याचे राजकारण्यांना सुख ना दुःख.आपली मताची पोळी धर्माच्या तव्यावर भाजणे एव्हढेच ते पाहतात.
       खरे तर देव मानणे धर्म पाळणे म्हणजे देव जवळ जाणे किंवा त्याचे सानिध्यात राहणे आहे.परोपकार त्याग प्रेम दया क्षमा शांती निर्विकरी बनणे.सर्वभुती परमेश्वर मानून सारी मानवजात एक समजणे दूजाभाव द्वेत भाव न पाळणे समतेचा भाव सर्वासाठी असणे हे धर्माचे तत्व आहे.म्हणून सामाजिक आर्थिक राजकीय या क्षेत्रापासून धर्म क्षेत्र अलग आहे.स्वतंत्र आहे.असे असताना राजकारणीच काय पण महाराज मठाधिपती पण मठात राहून राजकारण करतात.नेते पुढाऱ्यांना मतासाठी मदत करतात.राजकारणी व मठाधिपती गुरुं महाराज हे एकमेकांच्या हातात हात देतात.यांचे साटेलोटे असते.अजून कहर म्हणजे त्यागाचे प्रतीक असलेले महाराज पद व भगवे कपडे यांचा त्याग न करता त्यासहित राजकारणात सक्रिय भाग घेतात.निवडून येतात.मंत्री पण होतात.मग मला सांगा राजकारण आणि धर्म यात फरक काय राहिला ,? खरे तर धर्माचे पुजरीपण गुरू पद सोडून भगवे कपड्याचा त्याग करूनच राजकारणात यायला हवे.पण तसे हे राजकारणी महाराज करीत नाहीत.कारण लोकांच्या भावना गुरुत व भगव्यात गुंतलेल्या आहेत.हे त्यांना पक्के माहीत आहे.याचा फायदा ते घेतात.याचा अर्थ एक तर ते राजकारणात समर्थ नाहीत दुर्बल आहेत.किंवा त्यांना या गोष्टीचा आडोसा घ्यायचा आहे.जसा फासी पारधी गायीचा आडोसा घेऊन पक्षी मारतो तसा.
   .  आपण सत्तेवर येऊ शकतं नाही हा पन्नास वर्षाचा अनुभव घेतल्या नंतर या राजकारणी पुढाऱ्यांना कळले.लोकांचे मत मिळवायचे असेल तर राममंदिर आणि हिंदू धर्म धोक्यात आहे असे सांगून मते घेतली आणि सत्तेवर आले.हा धोका झाला हे मतदारास आज ना उद्या कळणारच याची जाणीव असल्यामुळे निवडून येण्याचा दुसरा मार्ग शोधला तो म्हणजे evm मशीन चा.आणि बेफिकीर झाले.आता छातीठोकपणे सांगताहेत की यावेळी पण आम्हीच निवडून येणार आणि अजून पंचवीस वर्ष आम्हीच सत्तेवर राहणार.जनतेची मागणी असताना पण हे बायलेट पेपरणी मत घेण्यासाठी तय्यार नाहीत याचे कारणच हे की यांना खात्री आहेकी हे त्यामुळे निवडून येऊ शकतं नाहीत.आणि सत्ता जो पर्यन्त हाती आहे तो पर्यन्त निवडणूक पेपरनी घ्यायची की मशशिना नी हे यांच्या हाती आहे.अजून पंचिस वर्ष तरी आम्हीच निवडणार असे म्हणतात याचा अर्थ पंचवीस वर्ष लोक वात पाहून चिडणार मग क्रांती करून मशीन फेकून देणार.त्यावेळी हे हुकूमशहा बनून evm मशीन चे बंड मोडणार.असे भविष्य आहे.संविधान पण बदलणार.कारण लोकशाहीचं नसणार.खाजगीकरण होणार.हुकूमशाही येणार.पुन्हा भारतीय जनता गुलामीत जगणार.कारण मतदानच नाही होणार.
      हे सारे घडणार कश्यामुळे तर धर्मात राजकारण घुसल्यामुळे.राजकीय मंडळी धर्माचा देवाचा निवडणुकीच्या व सत्ता टिकविण्याच्या कामी वापर करीत असल्या मुळे.हे सर्व जनतेनी लक्षात घेऊन वेळीच सावध झाले पाहिजे.येत असलेल्या हुकुमशाही स रोकले पाहिजे.आणि लाखो स्वातंत्र्याच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य टिकविले पाहिजे.गुलामगिरीला नाकारले पाहिजे.आपण या देशाचे एक नागरिक आणि नागरिकाचे अधिकार हक्क अबाधित सुरक्षित ठेवले पाहिजे.ही आजची या काळाची गरज आहे.म्हणून देव धर्म याचे जे कुणी राजकारण करतील त्यांना ठोकर मारा.निर्भय बना.न्याय प्रस्थापित करा.
          लेखक : दत्ता तुम वाड.९४२०९१२२०९.

Post a Comment

0 Comments