Subscribe Us

सतगरू सेवालाल 284 वो जलम दन


 क्रांतीकारी सतगरू सेवालाल महाराज यांच्या १५ फेब्रुवारी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

( विद्यार्थी व शिक्षक बांधवांसाठी भाषणाचा नमुना )

मंचकावर उपस्थित असलेले --आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष......

प्रमुख पाहुणे ........

आणि उपस्थित माझे गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्रानो ...

आज आपण क्रांतीकारी सतगरू सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने सर्वजन जमलो आहोत.सर्वप्रथम सतगरू सेवालाल महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो.आपल्या 

महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष ,थोर संत ,महान योद्धा,क्रांतिकारी होऊन गेले.अश्या पावन भूमीला,थोर संताची भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.आपल्या महाराष्ट्राची जि जडण 

घडण झाली टी फक्त आणि फक्त थोर संताच्या ,विचार वंतांच्या विचारधारेतूनच.समाजातील वाईट चालीरीती,अज्ञान,अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यांचे कामच जर कोणी केले असेल 

तर या थोर महापुरुषांनीच केले आहे.त्यांनी जे विचार पेरले ते आज आपल्याला ग्रंथा प्रमाणे मार्गदर्शक ठरतात.म्हणून आज आपण थोर महापुरुषांचे विचार समाजात पेरण्याची गरज 

आहे.म्हणूनच आज आपण १५ फेब्रुवारी सतगरू सेवालाल महार्जांची जयंती सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयात साजरी करून त्यांचे महान विचार समाजात पेरण्यासाठी व 

सर्व समाजबांधवांना माहिती होण्यासाठी महाराष्ट्रशासनाने परिपत्रक काढून मोलाचे काम केले आहे.म्हणून महाराष्ट्रशासनाचे सर्वांच्या वतीने जाहीर आभार. सर्व बंधू-भगिनी व विद्यार्थी 

मित्रहो समाज सुधारक,संत महात्मा,क्रांतीकारी योद्धा हे कोणत्या जातीचे,धर्माचे आहेत हे महत्वाचे नसून त्यांनी समाजाला कोणते मोलाचे विचार दिले हे महत्वाचे ठरते.त्यांचे कार्य 

कोणत्याही एका जातीसाठी मर्यादित नसून सर्व मानवांच्या कल्याणासाठी,देशाच्या हितासाठी ,राष्ट्राच्या ऐक्यासाठी दिशादर्शक ठरत असतात.सर्वाना प्रेरणादायी ठरतात.आणि 

प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी उपयुक्त सुद्धा ठरतात.म्हणूनच आज आपण अश्याच एका महान क्रांतीकारी थोर महापुरुषांचे विचार मांडणार आहोत,ते म्हणजे क्रांतीकारी सतगरू

सेवालाल महाराज. ब्रिटीश काळी लदेणीचा व्यवसाय करणाऱ्या १८७१ मध्ये क्रिमिनल ट्राइब मध्ये गिनती झालेल्या ,हजारो वर्षापासून अंधारात राहलेल्या,आपल्या पोटाची खळगी

भरण्यासाठी रानावनात भटकंती करणाऱ्या गावकुसापासून दूरवर वसलेल्या बंजारा ( गोरमाटी )समाजात १८ व्या शतकात १५ फेब्रुवारी १७३९ मध्ये क्रांतीकारी सतगरू सेवालाल 

महाराज यांचा जन्म झाला.त्यांच्या आईचे नाव धर्मणी आणि वडिलांचे नाव भिमानायक होते.त्यांना हापा ,बदू ,पुरा ,भाणा चार भाऊ होते.आज आपण पाहतो कि बंजारा समाज हा 

रानावनात भटकताना भारताच्या विविध राज्यामध्ये विखुरलेला आहे.अठराव्या शतकात बंजारा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकंती करीत असल्यामिले 

शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेला.आणि त्यामुळेच कि काय सतगरू सेवालाल महाराजांचे विचार पुस्तकांच्या रूपातून बाहेर येण्यास उशीर झाला.आसे वाटते.

सतगरू सेवालाल महाराज यांचे विचार विज्ञानवादी,समता,बंधुता व वास्तववादी होते.महाराज यांनी अन्याय कधीच सहन केला नाही,उलट अन्याय करणाऱ्या विरुद्ध बंड पुकारून 

वठणीवर आणण्याचे कार्य केले.आणि धैर्याने मुलाबला केला.त्यापैकी समतावादी विचार म्हणजे.....१) "वाडी वसतीन सांयी वेस" किडी मुंगीन सांयी वेस." कोरु गोरून सांयी वेस " 

म्हणजे निसर्गातील सर्व प्राणीमात्रांवर दया करा.निसर्गातील सर्व मुंगी पासून तर डायनासोर पर्यंतच्या प्राण्यांवर दया करा.हिंसा करू नका.तसेच बंजारा सोडून इतर कोणत्याही 

जाती धर्मांना नाव न ठेवता "कोर " या शब्दाने संबोधल्या जाते.आणि म्हणून त्यांच्या विचारामध्ये " कोर आणि गोर " यांच्या कल्याणाचा विचार व्यक्त करण्यात आलेला आहे.म्हणजे 

असे समतावादी विचार पेरण्याचे काम सेवालाल महाराजांनी केलेला आहे.२) विज्ञानवादी विचार --- तम सोता तमार जीवनेम दिवो लगा सकोचो.कोयी केणी भजो पूजो मत,सोतार

वळख सोता करलीजो.भजेपुजेम वेळा घालेरबजा करणी करेर सिको.मारे सीकवाडीप धेन दीजो.जाणजो ,छाणजो पचच मानंजो. हा वास्तववाद विचार सेवालाल महाराजांनी 

मांडून स्वतः सक्षम कसे बणाल,व अंधश्रद्धेपासून दूर कसे राहाल याची प्रत्येकाला जाणीव करून दिलेली आहे.माणसातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी अनमोल विचार पेरलेले 

आहेत.स्वत:चा स्वत:वर विशास असला पाहिजे.स्व कर्तुत्वावर आपणच आपली ओळख निर्माण करू शकतो.कुणी कुणाच भल करत नसून स्वत: स्वत:च ठरवावे लगाते.आणि फालतू 

गोष्टीवर विस्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या कर्तुत्वावर भर द्या.कार्यावर भर द्या. कोणी कोणापेक्षा लहान नाही आणि मोठाही नाही.त्याच प्रमाणे कोणावर विशास ठेवण्याअगोदर,कृती 

करण्याअगोदर दहा वेळां विचार करा.चिकित्सा करा.नंतरच आचार-विचार स्वीकारा.म्हणजे शब्दप्रामाण्यवादी न बनता बुद्धीप्रामाण्यवादी बणा असा मोलाचा विज्ञानवादी विचार 

समाजामध्ये पेरण्याचे अनमोल कार्य सतगरू सेवालाल महाराज यांनी केलेले आहे.याच विचाराची प्रेरणा घेऊन आपणही स्वत:च्या जीवनात महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचा उपयोग 

करून आपल्या जीवनात आनंद मिळवाल. व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूया.अशी अपेक्षा ठेवून पुन्हा एकदा सतगरू सेवालाल महाराज यांना वंदन करून थांबतो.

जै सेवालाल जै महाराष्ट्र 

लेखन -सुभाष देवसिंग राठोड ( माध्यमिक शिक्षक )

महात्मा फुले हायस्कूल निमगाव ( बुलडाणा )9011759332

2) सतगरू सेवालाल महाराज जयंती निमित्त 

सतगरू सेवालाल महाराज यांचा जन्म अतिशय विद्वान ,शूरवीर ,इंग्रजांच्या सत्ते विरुद्ध बंड करणाऱ्या “ भीमा नायक “आणि धर्मणी मातेच्या पोटी झाला.असंख्य भटक्या असणाऱ्या जातीपैकी “ बंजारा “ या जातीमध्ये जन्म झाला.त्याकाळातील मानवाच्या समस्या बघून आणि जुलमी राजवट बघून आजन्म अविवाहित राहून त्यांनी मानव कल्याणासाठी काम केले.

“ कोर गोर कच मन भाया 

म केती करू वाया”

समाज बांधवच नाही तर इतर लोक मला भाया म्हणतात.भाया याचा अर्थ सांभाळणारा सांभाळून घेणाराआसा होतो.मग अश्या सर्वांच्या कल्याणासाठी मी का लग्न करावे ? म्हणून सेवालाल महाराजांनी लग्न केल नाही.

इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध बंड पुकारलेआणि इंग्रजांच्या विरुद्ध करण्यासाठी समाजमन तयार करण्याचा प्रयत्न केला.ते बंडाची भाषा करतात टी अशी.

डील्ली देशेरो कंबल फरेंगी 

आडो आये तांडो घेरेन 

मासूल डिया तो ..तांडेरी बदनामी जाये 

डल्ली =दिल्ली ,कंबल=इंग्रज ,मासूल=महसूल .सेवालाल महाराज हे उकृष्ट समाज संघटक,वाईट विचाराना थारा न देणारे,लढाऊ वृत्ती,वैज्ञानिक दृष्टीकोन,निसर्गाचे महत्व आणि माहिती असणारे,विविध प्रांतापर्यंत व्यापारी ज्ञान आणि मार्ग ज्ञान असणारे होत. अश्या मानव हितासाठी कार्य करणाऱ्या व तत्ववेता महामानवाला प्रणाम.

मा.अनिल रामसिंग राठोड 

मो.नं.९५२७५२८८११( अधिक माहितीसाठीवरील नंबरवर आवश्यक संपर्क करु शकता 

3) सतगरू सेवालाल जीवन परिचय 

जालामदाडो - १५ फेब्रुवारी १७३९ 

जलमठाणो-  भायागड कर्नाटक

बापेरो नाम - भिमानायक रामजिनायक राठोड रामावत 

याडीरो नाम - धरमणीयाडी 

भायीर नाम - हापानायक ,बदुनायक ,पुरानायक,भाणाभायी 

भरोसेर स्वयंपाकी –घेरीवाळो

लाडेरो भतीजो- जेतालाल बदुनायक राठोड रामावत

घोडेर नाम - तोळाराम( धोळो घोडो )

बळद ( सांड )- गराशा 

कतरीर नाम - लाडकी

टोपण नावे -१) तोडावाळो-सतगरू सेवालाल महाराज घुगु टोप परिधान करीत असत .या भरजरी टोपवर ते तोडा लावत असत.म्हणून त्यांना तोडावाळो या टोपणनावानेही गोरबंजारा समाजओळखत असत.

२) मोतीवाळो- मोत्यांची माळ सतगरू सेवालाल महाराज परिधान करत असत म्हणून त्यांना मोतीवाळो हे संबोधनं गोर बंजारा समाजाने आदराने दिले होते.

३) गाडीवळो – राठोड रामावत या घराण्यात जन्मलेले आणि दिनूबल्य्नांचे कैवारी म्हणून सर्व सामान्य जनतेचे आधार स्तंभ बनले म्हणून गोर बंजारा समाज त्यांना “ गादीवाळो “ म्हणू लागला.

४) पोरीयातारा – पोरीया तार म्हणजे ध्रुव तार / शुक्र तार. होकायंत्राचा शोध लागण्याअगोदर खगोलशास्त्रज्ञ या तारयास दिशादर्शक ,कालदर्शक समजून वाटचाल करीत असत. गोर बंजारा समाज या तार्याच्या दिशेनुसार व वेळेनुसार लदेणी आणि आपला नित्य दिनक्रम ठरवीत असत. गोर बंजारा समजाचे मार्गदर्शक, दिशादर्शक समाज प्रबोधनकार म्हणून त्यांना पोरीयातारा हे संबोधन मिळाले,

-सर्वसामान्याचे नेतृत्व – ३७५५ गायी गुरांचे मालक,सोबत ५२ तांड्याना लदेणी करीत भारतभार व्यापार करीत असत. गायीच्या पाठीवर सामान भरून व्यापार करण्याच्या पद्धतीला लदेणी म्हणतात.

सतगरू सेवालाल महाराज यांच्या लदेणी मार्गांपैकी एक मार्ग-

मध्यभारतेती निकळी, पुनार दांडी,

सुरतेर तकत गडी रहाळ गुजरात,

बऱ्हाणपूरेरो चौक, डली लाहोरेरो घेरो.

महाराष्ट्रहातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सेवा नावाचे गाव आज सुद्धा आहे. येथे सतगरु सेवालाल महाराज यांचे सेवा पोर्ट हे बंदरगह होते. येथून सतगरु सेवालाल महाराज परदेशातून व्यापार करीत असत. आत येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आहे.

-तत्त्वज्ञाणी समाजशास्त्रज्ञ- सतगरू सेवालाल महाराज यांचे ५१ अमर बोल आहेत. किमान २७५ वर्षपूर्वी त्यांनी सांगितले हे ५१ अमर बोल आज तंतोतंत खरे ठरलेले दिसतात. त्या काळची प्रोप्त नैसर्गिक व सामाजीक परिस्थिती, वाढती लोकसंख्या यांचा अभ्यास करून संभाव्य परिस्थितीचा वेध घेत त्यांनी काढलेले अनुमान,तर्क आज खरे ठरलेले दिसत आहेत उदा.

a)रपिया कटोरो पाणी वाकजाय:- एक रुपयात एक वाटीभर पाणी विकल जाईल.

b)रपियर तेरं चणा वकिय:- एक रुपयात चुमुठ्भर हरभरे विकले जातील.

c) सोनेर सिंग वेजाय:-बैल जोडीची किंमत लाखात होईल.

-समता, स्वातंत्रता,बंधुता :- आपला विश्वासु पुण्यात जेतालाल यांचा विवाह सामका या अतिशय गरीब घरयान्यातील मुलीशी करण्याचा निर्णय घेतला. आईचे छत्र हरवलेली तुकीय पवार यांची काळी सावळी परंतु सर्वगुण संपन्न मेहनती मुलगी सामका आणि राजवैभवात वाढलेला पुतण्या जेतालाल यांचा विवाह सतगरू सेवालाल महाराज यांनी घडवून आणणे म्हणजे गरिबी-श्रीमंतीचा भेद संपविण्याचा हा आदर्श पायंडा होता.

फ्रेंच राज्यक्रांतीणे जगाला समता,स्वंतंत्र्य व बंधुत्व ही जीवन मुल्ये जगाला दिल्याचे जरी भासवत असले तरी फ्रेंच राज्यक्रांतीच्या हजारो वर्षे आगोदर भारतात सिंधू संस्कृतीत ही जीवनमूल्ये अस्तित्वात होती.

कोरे गोरून सायी हियेस 

नंगरी वसतीन सायी हियेस 

जीव जणगानीन सायी हियेस 

किडी मुंगीन सायी हियेस 

खुटा मुंगरीन सायी हियेस.

या जीवनमूल्याची शिकवण देण्यात सतगरू सेवालाल महाराज यांनी आपली उभी ह्यात घालवली. याप्रकारे विश्वशांती आणि विश्वकल्याणाची संकल्पना जगाला देणारे सतगरू सेवालाल महाराज गोर आणि कोर समाजाचे आदर्श ठरतात. 

-क्रांतीकारी सेवालाल महाराज:- दिल्लीचा नवाब गुलाब खान सोबत आपल्या हापा, पुरा, लखू खेतावत, भिला कारभारी या फक्त १३ शिलेदार सहकार्यांसह लढाही लढली आणि विजय मिळविला.

धोळी लगिरी शीतळ छाया, वोम बेठो भाया

हुबी दनिया आरजी करछ, नेम किदो सेवाभाया 

तलवारेरी गंज पडिच, बोल मरीयामा माया 

सेवाभाया यु कर कोतो, युध्येन जाया.

भारताच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सतगरू सेवालाल महाराज यांनी तयार केला होता, त्यावेळी उमाजी नाईक, तंट्या भील यासारखे धुरंधर सेनानी त्यांच्या सोबत होते.

-सतगरू सेवालाल महाराज यांची शिकवण:- 

१)कोयी नानो मोठो छेयी- कुणी उच्च-नीच नही. सर्व समान आहेत.

२)जाळजो, छांळजो, माळजो – बुद्धि प्रमाण्यावाद.

३)मळन भळन रीये बिना कोसा निकलेनी – एकतेचे महत्त्व.

४)हेतेबना जगळू कतो आंगळेमायीर काडीकचरो- निश्चीत उदीष्ट ठरवून वाटचाल करा. दिशाहीन कामात यश येत राही.

५)द्कारो जेर लार कायी जपमेलोछ जको धुंडतो रीजो- वरवर दिसन्याऱ्या परीस्थितीच्या मागे काय गुपित दडलेले आहे ते ओळखा, चीकिस्ता करा.

६) केरी भरोसेपर मत रीजो पनळ दुसरेर भरोसेर बळो-

जो दुसरयावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कुणाच्या भरवश्यावर राहू नका परंतु दुसरयाच्या विश्वासास पात्र बना.

७)सोताचीच सोतारो आचो बला व्हच- तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

८)खरेरी छ जे करनू वाटे थोती वड वड जावच, बदिरो सरतो जाय काळ, नकीरो दन आव छ- सत्यवचन करा.खोट्याची हार आणि सत्यतेचा विजय ठरलेला असतो.

९)भजेपूजेम येळा घालेरबजा आजी करळी करो – कर्मकांडापासून दूर राहा, सत्कर्म करा.

१०)मृत्यू दिनांक व ठिकाण:- ०२ जानेवारी १७७३- रुइगड. ता. मानोरा, जि. वाशीम, महाराष्ट्र.

संकलन - नामदेव पवार अंबड  जै सेवालाल

Post a Comment

0 Comments