Subscribe Us

बंजारा समाज हिंदू नसून स्वतंञ ओळख असलेला एक आदिवासी समाज आहे


 *जाणंजो छाणंजो माणंजो*


*"बंजारा समाज हिंदू नसून स्वतंञ ओळख असलेला एक आदिवासी समाज आहे !"*

 


 बंजारा समाज हा एक आदिवासी समाज आहे. आम्ही आदिवासी आहोत. आम्ही आदिवासी बंजारा समाज ना हिंदू आहोत ना ख्रिश्चन.  आमची स्वतःची एक स्वतंञ जीवनशैली, गोर बोली, वहिवाट, परंपरा, चालीरीती, संस्कृती आणि तांडा जिवनशैली असलेले मानवतावादी विचार आहेत, एवढेच नाही तर आमचे खानपान इतरांपासून वेगळे आहे जे की, इतर कोणत्याही धर्मापेक्षा वेगळे आहेत. एवढेच नाही तर तांड्याची एक स्वतंञ न्यायपालिका असुन तांड्याचे  हासाबी, नसाबी, नायकी यांसह एक स्वतंञ सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय अस्तित्व आहे.

आम्ही भारताचे मुळ भूमीपूञ, मूळ रहिवासी असून आमच्या पूर्वजांच्या दैवतांची पूजा करणाऱ्या प्रत्येकाला एक स्वतंत्र ओळख आहे. आमचे श्रद्धास्थान तथा आराध्यदैवत हे हिंदू धर्मापेक्षा पुर्णतः वेगळे असुन आम्हाला गैर-हिंदू म्हणून एक स्वतंञ नोंदणी करण्याची परवानगी देण्यात यावी.


१) बंजारा समाजाला संवैधानिक अधिकारापासून (आदिवासी बंजारा समाज ) वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे.

२) बंजारा समाज हा हिंदू नसून आदिवासी बंजारा समाज आहे.

३) बंजारा समाजाची मूळ संस्कृती गोरधाटी हिला समूळ नष्ट करण्याचे हे षडयंत्र आहे.

४) बंजारा समाजाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे हे फार मोठे षडयंत्र आहे.

५) बंजारा समाज आणि हिंदू धर्माचा संबंध दाखवत बंजारा समाजाला संवैधानिक अधीकारापासून दुरावत आम्हाला आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचा हा डाव आहे.

६) देशातील 20 कोटी बंजारा समाजाचे आराध्य दैवत "क्रांतिकारी: सेवालाल महाराज" यांचे महत्त्व कमी करुन समाजाला तोडण्याचे हे कट-कारस्थान सुरू आहे.

७) स्वतंत्र बंजारा समाजाच्या संस्कृतीवर गदा आणून त्यांचे ब्राह्मणीकरण करण्याचे हे एक षडयंत्र आहे.

८) बंजारा समाजाला शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान यापासून दुरावून धर्मामध्ये गुंतवून ठेवण्याचा हा यांचा डाव आहे.

९) बंजारा समाजाच्या संस्कृतीमध्ये धर्माला नगण्य स्थान आहे. बंजारा समाज हा एक निसर्गपूजक, पशुपालक, मानवतावादी विचाराचा अर्थात गोरधाटीचे पालन करणारा समाज आहे.

१०) बंजारा समाजाची मूळ जिवनशैली असलेली गोरधाटी यावर हल्ला करून बंजारा समाजाचे आरक्षण हिरावून घेत देशोधडीला लावण्याचा हा एक डाव आहे.

११) धर्माच्या नावावर बंजारा समाजात कलह निर्माण करुन समाजात असलेल्या उपजाती गोर, बंजारा, लभाणा, नायकडा, धाडी यांच्यामध्ये भेदभावाचे विष पेरुन सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आरएसएस करीत आहे.

१२) बंजारा समाजाच्या संस्कृतीला छेदून धार्मिक द्वेष निर्माण करुन समाजाला अस्थिर करून राजकीय फायदा साधण्यासाठी रचलेला हा डाव आहे.

     शिक्षण, रोजगार, एसटी आरक्षण, पदोन्नतीचे आरक्षण हिरावून घेत आम्हाला नॉन क्रिमीलेअर सारखी असंवैधानिक जाचक अट लावलेली आहे

     आमचा बहुसंख्य हिंदूंशी कोणताही थेट रोटी व्यवहार, बेटी व्यवहार नाही. बंजारा समाजाची संस्कृती, भाषा, वहिवाट, परंपरा याचा हिंदूं धर्माशी कोणताच संबंध येत नाही. वा हिंदू धर्माशी साम्य नाही. आमची स्वतंत्र ओळख पुसून आम्हाला संवैधानिक हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे. हिंदूनी म्हणजेच ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या जातीच्या उतरंडीत बंजारा समाजाला अतिशूद्र असे गौण स्थान दिले आहे. बंजारा समाजाच्या सांस्कृतिक जीवनशैलीवर ब्राह्मणी आक्रमणाने ब्राह्मणीकरण करण्याचा एक डाव आहे. आमची संस्कृती आणि स्वतंत्र अस्तित्व समूळपणे मिटवण्याचे हे एक फार मोठे नियोजित षडयंत्र आहे.

   वर्णवादामुळे निर्माण झालेल्या जातीच्या उतरंडीत बंजारा समाज हा शेकडो वर्षापासून होरपळत आलेला आहे. बंजारा समाजाला यात अतिशूद्र म्हणून स्थान आहे. याचमुळे बंजारा समाजाला गावकुसाबाहेर ठेवून पशु प्रमाणे हिन वागणूक दिली गेली. आज आमच्या आदिवासी बंजारा समाजाचे ब्राह्मणीकरण करून बंजारा समाजाला मानसिक गुलाम बनवून समाजाच्या सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक अस्तित्वावर ताबा मिळवणे हा आहे.

   आता वेळ आलेली आहे की, बंजारा समाजाला एक स्वतंत्र ओळख देऊन बंजारा समाजाला न्यायिक रीत्या गैर हिंदू म्हणून घोषित करावे.

   


             आपला

     *राजपाल सिंह राठोड* 

      महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

 ऑल इंडिया बंजारा सेवा संघ

Post a Comment

0 Comments