Subscribe Us

नेणू ती देकरेचा पण ---?


 

*काकडवांदा*


*बुडते हे जन न देखवे डोळा!येतो कळवळा म्हणोनिया!!*

        *या संताच्या भूमीत "बाटी घाल याडी ss!" हा ढालण याडीचा आवाज अजूनही तांड्यात ऐकायला मिळतो..!*

        *गोरमाटी बोलीभाषक बणजारा गण समाज हा 'एक भाषिक'समाज असूनही यांच्यात कमालीची सामाजिक विषमताआढळते... !*

  *ढालीया,ढाडी,जोगी,सिंगाड्या सारख्या घटकातील रोटी-बेटी व्यवहार अजूनही समाज मान्य झालेला नाही,या मुळेच गोरमाटी बोली भाषेचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.*

              *गोरमाटी बोलीभाषक बणजारा गण समाजाला लग्नासाठी गैर गोरमाटी बोलीभाषक मुली चालतात;परंतु गोरमाटी बोलीभाषक गणातील ढालीया,ढाडी,जोगी,सिंगाडे या सारख्या घटकांच्या मुली लग्नासाठी चालत नाही ही खंत आहे.*

         *गोरमाटी बोलीभाषक बणजारा गण समाजाच्या सर्व घटकातील रोटी-बेटी व्यवहार हा समाज मान्य व्हावा हा विषय '५ वे अ.भा.गोर बंजारा साहित्य संमेलन डोंबिवली/मुंबई २०१८ च्या अजेंड्यावर होता.*

          *गोद्री येथे होऊ घातलेल्या संभाव्य "कुंभ मेळाव्याने" गोरमाटी बोलीभाषक बणजारा गणसमातील या सर्व घटकांच्या दबलेल्या आवाजाला भाषा मिळेल काय?गोरमाटी बोलीभाषक बणजारा गणसमात सामाजिक समता नांदेल काय?*

               *गोरमाटी बोलीभाषक बंजारा गण समाजाच्या बोलीभाषेला,त्यांच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अस्तित्वाला, सामाजिक न्यायाने संविधानिक संरक्षणाची हमी मिळेल काय?की पुन्हा हिंदू म्हणून वर्ण आणि समाज व्यवस्थेच्या आगीत अख्खा समाज होरपळला जाणार?*

            *असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे,कारण अजूनही गोरमाटी बोलीभाषक बणजारा गण समाजातील सामाजिक विषमता नष्ट करण्यात आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही..!*

        


            *भीमणीपुत्र*

    *मोहन गणुजी नायक*

Post a Comment

0 Comments