Subscribe Us

जाणजो,छाणजो,पच माणजो


 

*'जाणजो,छाणजो,पच माणजो' हा संत सेवाभायाचा सिद्धांत मानवी प्रगतीचा केंद्रबिंदू आहे*- *रामेश्वर तिरमुखे*.* 


संत सेवाभाया यांची 15 फेब्रुवारी 2022 ला संपूर्ण भारतात जयंती साजरी होत आहे,त्यानिमित्ताने त्यांना या लेखाच्या माध्यमातून अभिवादन. जयंती निमित्त सर्व भारतीय बंधू बहिणी यांना शुभेच्छा.....



लेखक:-रामेश्वर तिरमुखे, 9420705653.


1⃣संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15फेब्रुवारी 1739 ला वडील भीमा नायक आणि आई धरमळी यांच्यापोटी तत्कालीन म्हैसूर प्रांतात गोलार डोडी तांड्यात झाला होता.जो आता आंध्रप्रदेश मधील अंनतपुर जिल्ह्यात आहे. सेवालाल यांना तीन भावंडे होती,त्यांची नावे हापा,बदु,पुरा आहेत.  भीमा नायक यांच्या कडे नेतृत्व असल्याने तसेच लढाऊ असल्याने त्यांचा प्रभाव होता.मोगल कालीन लढाईत भीमा नायक मृत झाले होते.त्यामुळे कुटुंबातील तसेच तांड्याची प्रमुख नायक म्हणून जबाबदारी सेवालाल यांच्या वर आली होती. सेवाभाया यांच्याकडे 3755 गायी होत्या.भटके जीवन जगावे लागत असे.बंजारा जातीचा मुख्य व्यवसाय बैलांच्या पाठीवर ओझे लादून भारतभर व्यापार करणे. जीवन जगत असतांना त्यांनी क्रांतिकारी संत आणि तथागत यांच्या विचारांचा अंगीकार करून त्याचा प्रचार प्रसार केला.सेवा हे नाव आणि भाया म्हणजे भाऊ होय. ते अविवाहित राहून त्यांनी सिंधू संस्कृतीचे जतन केले.कालांतराने सेवाभाया 

"बंजारा हिल्ल हैद्राबाद " येथे जवळपास 14वर्षे स्थायिक झाले होते. त्यानंतर काही काळाने सेवा स्थानिक संघर्षामुळे आपला तांडा घेवून महाराष्ट्रात आले. फिरता फिरता ते यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील रुईगड येथे थांबले.तेथून प्रचार प्रसार करत राहिले.गोरबंजारा गणातील स्त्रियांनी सिंधुघाटी सांस्कृतिचे जतन लोकगीतातून ,वेशभूषा

-पेहराव, सण उत्सव,लोकगीते,सत्यधर्म इत्यादी यातून केलेले

 आढळते. गोर बंजारा याना त्यांची स्वतःची भाषा आहे,तिला गोरभाषा म्हणतात.जी शिकवण दिली तिला गोर बोलीत *शिकवाडी* म्हणतात. तर त्यांचे जे गोरबोलीत जे  बोल आहेत,त्यास *भायार बोल* असे म्हणतात. तसेच ते म्हणतात  *थाळी नंगारारे घोरेम सदा सदा रो*" म्हणजे प्रबोधनाच्या चिंतनात सदैव रहा,ज्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जागृतीचा अग्नी अखंड पेटत ठेवा.

 

 2⃣ *जाणजो,छाणजो पच मानजो*:-  संत सेवाभाया यांनी बंजारा गणातील माणसांना बुद्धिप्रामाण्यवादी व्हायला सांगतात.जाणून घ्या त्याची माहिती घ्या,त्याची सत्यता तपासणी करा म्हणजे छाननी करा.ते खरे खोटे हे ठरवा.जर खरे सत्य आणि सिद्ध होत असेल तरच त्याला मान्यता द्या.स्वीकार करावा. म्हणजे *स्वातंत्र्य* असा विज्ञानवादी विचार संदेश  संत सेवाभाया देतात.जो आजही अत्यावश्यक आहे. तसेच *सोतर ओळख सोता करून दीजो।*स्वतः ची ओळख कर्तृत्व दाखवून निर्माण करावी.कोणावर अवलंबून राहू नका.देवावर भजनात पूजेत वेळ घालू नका


*भजनेम वेळ घालेपेक्षा करणी करेर शिको*


तर *न्याय* तत्व ज्यात

*गोर गरिबेन दांडन मत खाओ*" म्हणजे गोर गरीबावर अन्याय करून त्यांना दंडित करू नका

 **सत्यकाम फत्ते करजो*

सत्याची बाजू घेवून त्याला विवेकी साथ द्यावी.सत्याचा पाठपुरावा करावा.

*कोर गोर कछ मन भाया*

बंधुता हे तत्व यातून सिद्ध होते,जसे गैरबंजार व बंजारा हे सर्वच मला भाऊ आहेत.

 ननंगारा धाळीच्या गजरात प्रचार करायचे. 

बंजारा हे निसर्ग पूजक आहेत.याच बरोबर त्यांनी जातीव्यवस्था, विषमता, मनुवादी व्यवस्था याविरोधात आणि समता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले. समतेची शिकवण देतांना ते म्हणतात, *"केनिबी नानक्या -मोटो मत समजो"* जन्म,जातीवर कोणीही उच्च नीच ठरत नाही.मनुस्मृतीच्या विषमतावादी व्यवस्था नाकारण्याचे काम त्यांनी केले. संत सेवाभाया यांनी मार्गदर्शन करतांना म्हणतात, *छाती करिय ओन साथ मळीय अन हाय नाकीय ओर ठेर पड जाय*  

बहुजन समाजातील लोकांना गुलामीतून मुक्त व्हायचे असेल तर त्यासाठी पुढे होऊन जे धाडस करतात, संघर्ष करायला तयार असतात, समाजात प्रचार प्रसार करतात त्यांना साथ,सहयोग मिळतो.जर धाडस केले नाही तर गुलामीत राहून नक्कीच सत्यनाश होईल.

3⃣भारतात बंजारा समाजाची लोकसंख्या 2कोटी 84 लाख आहे. संविधानात त्यांना 15(4),(5), 16(4),कलम 46,330,332,334,342 नुसार संरक्षण दिलेले आहे. मात्र स्थानिक राज्यातील नेत्यांनी यांना अधिकारवंचित केले आहे.जसे आंध्र कर्नाटक राज्यात भटक्या विमुक्त जाती एस सी मध्ये आहेत तर त्याच जातींना महाराष्ट्र मध्ये एन टी, डी एन टी ची ओळख आहे.वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये टाकणे त्यांना हक्क अधिकारापासून वंचित ठेवणे,प्रतिनिधित्व, सुविधा मिळू न देणे.त्यांच्यात आपसांत भांडणे लावणे हे षड्यंत्र समजून घ्यायला हवे.11कोटी भटक्यासाठी रेणके कमिशन आणि त्यांच्या 76 शिफारशी यांना केराची टोपली दाखविली आहे.जी आजच्या आमच्या वकील,डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर यांनाही माहीत नाही. भटक्या विमुक्त जाती यांना गुन्हेगार जाती म्हणून शिक्का मारला होता,तो कोल्हापूर संस्थानात 1ऑगस्ट 1918 या दिवशी छ शाहू राजांनी आदेश काढून हजेरी पद्धत बंद केली.तर 1924ला इंग्रजांनी पुनर्वसन करण्यासाठी कायदा केला. संत सेवाभाया यांनी आपला इतिहास जाणला होता,त्यामुळे त्यांनी समता,स्वातंत्र्य,बंधुता व न्यायावर आधारित गणव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

हा सर्व इतिहास संत सेवाभाया याना ज्ञात असल्याने त्यांनी तांडा संस्कृती, नसाब (न्यायदान),नायक,कारभारी,डाये-साने,गोरबोली,वेशभूषा, लोकधर्म,स्वतः जबाबदारी घेवून विवाह पद्धतीयासाठी त्यांनी आंदोलन चालविले.  *तम सोता तमारे जीवळेम वजाळो कर सको छो*

तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात प्रकाश पाडू शकतात. जो मूळ विचार अत: दीप भव आहे. अशा या महान प्रचारकाचे 2 जानेवारी 1773 ला रुईगड येथेनिर्वाण झाले.तर त्यांचे दफन पोहरागड ता मनोरा जि वाशीम येथे करण्यात आले आहे.ज्यांना केवळ 35 वर्षाची आयु मिळाली. 

4⃣संत सेवाभाया यांचे कृती विचार अंगीकृत करून प्रचार प्रसार करण्यासाठी आपण सर्व बहुजन बंधूनी भूमिका घेणे आवश्यक आहे.कारण गोर गणाचे भटके जीवन,त्यातील हाल ,अज्ञान, उपासमार,आरोग्य सेवापासून वंचित ,बेकारी,अंधश्रद्धा याचा विचार आपण ही करावा ,त्यासाठी भूमिका घेणे गरजेचे आहे.आज तर देश पातळीवर अस्तिव नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे.कारण भटक्या विमुक्त जमाती यांच्या कडे व्यवस्थने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.ते येथील मूलनिवासी आहेत, त्यांच्याच विरुद्ध अस्तित्व सिद्ध करण्याचा जुलमी असंविधानिक कायदे केले जात आहेत!

यासह देशपातळीवर असणारे एस सी एस टी सह बहुजन बांधवांच्या न्याय हक्क अधिकार यासाठी भूमिका राष्ट्रीय पातळीवर मा .वामन मेश्राम साहेब *भारत मुक्ती मोर्चा* या संघटनेच्या माध्यमातून निभावत आहेत.निरंतर जागृती करीत आहे.ज्यास बळ,बुद्धी,श्रम आणि पैसा देणं आमची जबाबदारी आहे. *शिकच,शिकावच ,शिकेर राज घडावच*

शिका शिकवा शिकल्यानंतर तुम्ही राज्यकर्ती जमात बनाल! 


 ज्याला संत सेवाभाया यांच्या भाषेत

*मार शिकवाडीप ध्यान दीजो* म्हणजे माझ्या शिकवणीवर ध्यान द्या. 


लेखक :-

रामेश्वर तिरमुखे,जालना.

09420705653.

राज्यप्रभारी, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ,महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments