Subscribe Us

कुंडली:-> एक थोतांड,जाणजो छाणजो पछानजो


 सावधान! मुलामुलींचे आयुष्य उध्वस्त करणारी:-

 कुंडली:-> एक थोतांड!


                  जिना हराम करणारी व विवाह इच्छुक्कांच्या मार्गात हमखासपणे काटा बनून 'अवदसा' म्हणजेच ही कुंडली!* 

-----------------^---------------

   एक भयंकर क्रूर प्रथा ! एक भयंकर अनिष्ट रूढी !! बहुजन समाजाला लागलेला एक असाध्य असा महाभयंकर कुष्ठरोग म्हणजेच ही *'कुंडली'* !!! 

    सामान्यजनांना वेठीस धरुन त्यांना नाकदुऱ्या काढायला लावणारी ; शुभविवाहासाठी बोहल्यावर चढू इच्छिणाऱ्यांना या शुभपथावर  पाय टाकण्यापुर्वीच आपल्या सहस्र बाहुंनी करकचून.. विवाह रंगांचा बेरंग करुन टाकणारी आणि पालकांच्या अज्ञानाच्या बळावर त्यांच्याच मानगुटावर बसून लग्नात नित्यनियमाने एक भयंकर 'खोडा' बनून  त्यांचं *'जीणं'* हराम करणारी व विवाह इच्छुकांच्या मार्गात हमखासपणे काटा बनून

 बाहु सरसावून उभी ठाकणारी *'अवदसा'* म्हणजेच ही कुंडली !!! 

     *अंधश्रध्देच्या व क्रूर परंपरेच्या वरवंट्याखाली  सामान्यजनांचे  स्वास्थ्य बिघडवून  टाकणारी महाभयंकर क्रूर प्रथा म्हणजेच  ही कुंडली !!!!*

    विज्ञानाने अनेक शोध लावले. माणूस चंद्रावर जाऊन आला !  चंद्र काय , मंगळ काय,.. आता तर तो सुर्यावरही स्वारी करायला निघालाय ! तरी इकडे मात्र आमच्या देशातील  सामान्यजन अजुनही मंगळ, गुरु , व  साडेसातीच्या फेऱ्यातून बाहेर पडायला तयार नाहीत !! ..

    *केवढी मोठी शोकांतिका आहे ही*!!!

       आतापर्यंत ज्योतिष , कुंडली व कर्मकांडे यासंबंधी संत तुकाराम,गाडगेबाबा,तुकडोजी,... संतांनी आपले परखड विचार मांडून या अंधश्रध्दांवर कठोर शब्दांचे आसूड ओढले आहेत !

    जगत्गुरु संत तुकारामांनी तर ..

*नवस करीता पुत्र होती*

*मग का करावा लागे पति* ll

  असा रोकडा सवाल करुन अंधश्रध्दांवर सणसणीत आसूड ओढला आहे !

संत गाडगेबाबांनी आयुष्यभर लोकसेवा नि प्रबोधनाचे काम केले.

  प्रबोधनकार ठाकरे ..स्व.बाळासाहेब ठाकरेंचे पिताश्री ..यांनी तर या जर्जर रुढीग्रस्त वैदिक धर्मावर व परंपरांवर जबरदस्त टिकेची झोड उठवली !

   जिजाऊ-शिवराय यांनी कधी अशा अंधश्रद्धाना आपल्या जवळ फटकू दिले नाही.

फुले-शाहू-आंबेडकर यांनी तर वैदिक परंपरा,कर्मकांडे व शोषण व्यवस्था या विरोधात मोठा लढा उभारला व सामाजिक समतेचा पाया घातला. मनुवादी शोषणव्यवस्था मोडीत काढली ! (असे काहीसे वाटू लागले होते !)

    

    तरी हे समजून घ्या..

*कुंडली: हे विज्ञान नाही*

    येथे कुंडली किंवा  ज्योतिषशास्र हे खरे शास्र नसून ते लोकांना भुलवून त्यांचे शोषण करण्यासाठी नियोजनबध्दरीत्या या व्यवस्थेने तयार केलेले एक फार मोठे *षडयंत्र* आहे!

एक *व्यवस्थितरित्या तयार केलेले गौडबंगाल आहे !! कुंडली हे छद्मविज्ञान आहे* !!! त्याला कोणताही वैज्ञानिक पाया नाही ! त्यास जगभरातील कोणत्याही शास्त्रज्ञांनी आद्याप पावेतो कधीही मान्यता दिलेली नाही!!

   कुणीही ज्याला थोडी तरी विचार करण्याची सद्सद्विवेकबुध्दी आहे ..त्याने आपल्या तर्कदृष्टीचा थोडा जरी वापर केला तरी त्यामागील *थोतांड* सहज लक्षात येऊ शकते ! परंतु  पारंपारिक भिक्षुकशाहीने व मनुवादी विचारधारेने येथील पिढ्यांपिढ्या  निरक्षर राहिलेल्या बहुजनांना कायमचे अज्ञान-अंधःकारात 

खितपत ठेवल्यामुळे आणि बाल्यावस्थेपासूनच परंपरेचा फार मोठा पगडा असल्यामुळे ..या आधुनिक विज्ञानयुगातही..आता शिक्षणाचा प्रसार झाल्यावर सुध्दा .. सामान्यजन भिक्षुकशाहीने रचून व लिहून ठेवलेले तेच मनुवादी ग्रंथ वाचून त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत आहेत ! किंबहुना अनुकरण करण्यात हुशारी समजत आहेत !! 

येथेच खरी शोषणाची गोम दडलेली आहे !!!

आणि *हीच खरी शोकांतिका आहे* !!!!

     *बहुजनांनी आता विचार करायला शिकले पाहिजे!* 

जन्म-मृत्यू , लग्न , वास्तुशांती ... हे सारे जीवन- व्यापार मनुवादी व्यवस्थेच्या नादाला लागून आपण  या पारंपरिक शोषणव्यवस्थेच्या हवाली करुन स्वतः होऊन आपलाच बळी देत आहोत !!( तसा कोणताही कायदा नसतांना ) हे आता तरी समजून घेण्याची गरज आहे !  

     *कुंडलीच्या आहारी जाण्यापुर्वी जरा एवढा विचार तर कराल* ...???

१) कुंडलीतील जन्म वेळ अचूक असतेच काय ?

२) खरी जन्मवेळ कोणती बरे ?  

- गर्भात गर्भधारणा होते ती ?

की 

- गर्भातून बाळ बाहेर पडते ती ?

  ३) एवढ्या करोडो लोकसंख्येच्या देशात एका वेळी किती बाळे जन्माला येतात ..त्यांची कुंडली जन्मवेळेप्रमाणे एकच आहे..तर मग त्यांची आयुष्य

वा भविष्य सारखेच असायला हवे !

मग ते तसे असते काय ?  

४) जन्मकुंडलीत जे ग्रह मांडले जातात ..ते ग्रह व भूगोलातील/शालेय अभ्यासक्रमातील ग्रह कधी ताडून पाहता काय ?

- *त्यातील  सूर्य हा ग्रह आहे की तारा* ? 

- *चंद्र ग्रह आहे की उपग्रह* ? 

- *राहू /केतू ..हे ग्रह आहेत काय* ? 

   *विज्ञानाचा अंगीकार केलेली राष्ट्रे विकसित झाली ..आणि आपण कोठे आहोत*...???

-------------->

   *अरे देव काय काठीने मारतो काय ? ,.म्हणून आपण रीत सोडायची म्हणजे ....* "

   आता बोला !!!

विचारांची पध्दत जर अशी असेल तर.. *ये रे वाघ्या मला खा...* !

" *भुका नको राहू* "

असाच हा प्रकार नाही काय ?

    आणि आज या घटकेला  समाजात या *कुंडलीग्रस्तांची या कुंडली पायी होत असलेली ही होरपळ* पाहीली की आपलाही जीव तगमगतो ! तुटतो !! 

   *अजुनही आपल्याकडे काही अपवाद वगळता सर्व विवाह हे पालकांच्या  संमतीने म्हणजे arranged marriage च असतात !*

माञ *सर्व गोष्टी जुळतात..अगदी..वय, दिसणे , शिक्षण , स्वभाव आणि विचारही ! माञ कुंडली जुळली नाही* की बस्स् ! 

    

तर याला काय म्हणावे ? 

आणि मग बाप जेव्हा भेटतो तेव्हा टुमणे लावतो .." *स्थळ पहा* " 

माझा इंजिनियर मुलगा , चांगला नोकरीला आहे ! खूप स्थळं येतात !! पण *कुंडलीच जमत नाही!!! मी काय करु ?*

आणि 

*कुंडलीचे खूळ डोक्यातून तर निघत नाही* !!

त्याला मी काय करु ???


  सुज्ञांना आणखी काय सांगणे ...🙏 

ताजा.कलम :- या अवदसेमुळं चांगल्या स्थळांवर पाणी फिरते.... म्हणून  समाज बांधवांनो हात जोडून 🙏🙏 *विनंती करतो की वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा आणि स्वतःला व समाजाला मजबूत करा!*

Post a Comment

0 Comments