Subscribe Us

स्थंलातर आणि शाळाबाहयता* .... *गावातील सुशिक्षित पुढे आल्यास....*शिक्षण हमी कार्ड* इतर


 *स्थंलातर आणि शाळाबाहयता* ....

*     *गावातील सुशिक्षित पुढे आल्यास....*

*शिक्षण हमी कार्ड* इतर


शाळाबाह्यता हा पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला ग्रहणच . मुले शाळाबाहय होण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील महत्वाचे कारण म्हणजे स्थलांतर !

   आक्टोबर च्या पहिल्या सप्ताहात कींवा दिवाळी सुट्टीनंतर पालकाचे कामासाठी स्थलांतर होत असल्याचे आपणास सर्वच जिल्ह्यात पहायला मिळते. स्थलांतर दोन प्रकारचे असतात एक म्हणजे येणारे आणि दुसरे जाणारे. मोठ्या जिल्ह्यात स्थलांतर हा इनकमींगचा असतो तर खेड्यापाड्यातून होणारा स्थलांतर हा आऊटगोईंगचा असतो. स्थलांतर फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी होतो. स्थलांतर कोणत्या कामासाठी होते

१) विटभट्टीवर कामासाठी २) ऊसतोडीसाठी ३ ) सोयाबीन कापणी वा कापूस वेचणीसाठी ४) संत्रा तोड़ीसाठी ५) कोळसा कामासाठी ६) टॉवरचे काम करण्यासाठी ७) मोठ्या बिल्डींगच्या कामासाठी ८) गुरेढोरे चारण्यासाठी ९) रस्त्याच्या कामासाठी १०) अन्य

  महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यात शाळाबाहयतेचं एक कारण पालकाचं होणारं स्थलांतर आहे. वरील दहा व्यतिरिक्त आपणास सिंग्लवर भिक मागण्यासाठी , रेल्वेमध्ये लहान लहान कामे करून पैसे मागण्यासाठी , तसेच शहरात घराघरात जावून काहीतरी मागण्यासाठी , जडीबुट्टी विकण्यासाठी , जोतिष्य पाहण्यासाठी , छोट्या छोट्या लागण्याऱ्या वस्तुही खेड्यावर विकण्यासाठी स्थलांतर होतांना आपणास पाहायला मिळते. पालक स्थलांतरीत झाल्यामुळे पाल्यही त्यांच्यासोबत स्थलांतरीत होतात आणि मुलांचे शिक्षण नकळत खंडीत होते.

       आज आपणास शहरात रस्त्याच्या बाजुला हजारो झोपड्या दिसतात आणि शाळाबाहय मुलेही दिसतात. यावर जरी आपणास उपाय योजता नाही आले तरी पालकांसोबत होणारे मुलांचे स्थलांतर आपण थांबवू शकतो. जिल्ह्यातून होणारा स्थलांतर शक्यतो सर्वानाच माहित असते त्याचबरोबर केव्हा होणार आहे हेसुद्धा गावातील सर्वच यंत्रणेला माहित असते. हे थांबवण्यासाठी सर्वात महत्वाचे उपाय म्हणजे सप्टेंबर महिण्यात तंतोतंत सर्वेक्षण करणे. सत्य आलेल्या संख्यानुसार प्रत्येक गावात त्यामुलांची गावात राहणाऱ्या वरिष्ठ मंडळीकडे कींवा नातेवाईकाकडे थांबण्याची सोय करता येईल त्यांच्या राहण्यासाठीची लागणाऱ्या खर्चाची तरतुद वेळीच केल्याने मुलांचे पालकासोबत होणारा स्थलांतर थांबवता येवू शकतो. पण त्यापुर्वी पालकाचे याविषयावर प्रबोधन वा शाळाबाह्यतेचे दुष्परीणाम विषयावर मार्गदर्शन आणि विश्वास संपादन करणे गरजेचे आहे.

  राज्यातील उत्कृष्ठ काम करणारी बालरक्षक टिमचा राज्य स्तरावर एक मेळावा आयोजित करण्यात आला पाहिजे आणि त्यानंतर लगेच जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यातुन शाळाबाहय साठी उत्कृष्ट काम करणाऱ्या बालरक्षकांची कार्यशाळेचे आयोजन व्हावे. कार्यशाळेला प्रत्येक विभागातील वरिष्ठ अधिकारी महोदयांना आमंत्रीत करावे कारण फक्त शिक्षण विभागने शाळाबाह्यता थांबवणे शक्य नाही. शक्य नसलेल्या ठिकाणी हंगामीवस्तीगृहाची त्वरीत व्यवस्था करून वसतीगृहातील व्यवस्था ह्या उच्च दर्जाच्या असाव्यात त्यामध्ये मुलांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा उत्तम असायला हव्या कारण पालकांचा विश्वास मुलांना येथे ठेवतांना ठाम असला पाहिजे.

        भरत काळेनी वरवंडीत थांबलेले स्थलांतर, जगदिश कुडेनी श्रीराम तांडयाचे थांबलेले स्थलांतर, कीरण गायकवाड नी ठाकरवाडी तांडयाचे थांबवलेले स्थलांतर मार्गदशक ठरते. गजानन जाधव यांनी रायगड मधील थांबवलेले स्थंलातर प्रेरणादायी ठरते.

    जर मुलांचे स्थलांतर थांबवणे शक्य होत नसेल तर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणहमी कार्ड देणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी मुलांचे स्थलांतर झाले असतील तेथील शाळेनी शिक्षण हमीकार्ड नुसार शाळेत दाखल करून पुढील वेळेपर्यत शिक्षणाची सोय करावी म्हणजे मुले जरी स्थलांतरीत झाली तरी ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही.

      स्थलांतरीत होवून येणाऱ्या ठिकाणावर जसे विटभट्टी , मोठी कामे , गिट्टीखदान , ऊसतोडी या मालकांना शासनानी पत्र दयावे तेथे येणाऱ्या सर्वच मुलांची शिक्षणाची सोय मालकांनी करावी वा तेथून जवळ असलेल्या शाळेत येजा करण्याची सोय मालकांनी करावे बंधनकारक असल्याचे पत्र देण्यात यावे व दर महिण्याला त्याचा आढावा घेण्यात यावे. म्हणजे मुले स्थलातरीत होवूनही शिक्षणाच्या प्रवाहात राहतील.

   एका जिल्ह्यातून स्थलांतरीत शेकडो मुले होतात ती थांबवली म्हणजे मुले काही प्रमाणात शाळाबाहय होण्या पासुन रोखता येईल .

            *विनोद राठोड*

         *बालरक्षक टिम महाराष्ट्र*

Post a Comment

0 Comments