Subscribe Us

सर्व गोर बंजारा परभणी जीला महाआक्रोश मोर्चा


 महाआक्रोश मोर्चा परभणी जीला



⭕गोर सेना च्या वतीने सर्व गोरबंजारा सामाजिक संघटनेकडून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा⭕



आज परभणी  ता. 29/09/2021--- डिगोळ ता.सोनपेठ येथील अल्पवयीन मुलीवर तीन नराधमाने पाशवी बलात्कार करून त्याचं चित्रीकरण करून व्हिडिओ तयार केला व त्या मुलीला धमकी दिली की, तु जर या घटनेची माहिती कोणाला दिली तर हे व्हिडिओ वायरल केल्या जाईल.या धमकीला घाबरून त्या मुलीने कोणालाही न सांगता विष प्राशन केलं व आठ दिवस दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज दिली. अखेरीस  20 सप्टेंबर 2021 रोजी तिची प्राणज्योत मावळली. या पीडित मुलीच्या कुटुंबांना न्याय मिळावा व त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवुन त्या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. तेव्हा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या वाढत्या घटना हे सरकार व पोलीस प्रशासनाची निष्क्रियता दर्शविते. सतत अल्पवयीन मुलीवर आणि स्त्रियांवर बलात्कार होत आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.आणि अशा परिस्थितीमध्ये आरोपींना शिक्षा झाली नाही. तर त्यांची हिम्मत वाढते. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सरकारने कायदा करावा. यासाठी सकल गोरबंजारा सामाजिक संघटनेकडून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड महाआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. जर सरकारने या घटनेची दखल घेतली नाही तर भविष्यात गोर सेना व सर्व गोर बंजारा समाजिक संघटने कडुन संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन केल्या जाईल. व काही अनुचित प्रकार घडला तर त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार राहील. असे गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरुणभाऊ चव्हाण यांनी सांगितले.


 

   या मोर्चाला ..अरुण चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष..व हरपणी साधना ताई गोर सेना महिला प्रमुख महाराष्ट्र,,, व गोरसिकवाडी स संयोजक श्रीकांत राठोड महाराष्ट्र .यांनी संबोधित केले.


या मोर्चाला.उपस्थित 

डाव साणो एल डी चव्हाण,विलास राठोड गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजक,अनिल सांगावत गोरसिकवाडी संयोजक महाराष्ट्र, प्रा रमेश गोलानी गोरसिकवाडी स संयोजक महाराष्ट्र, नामदेव पवार गोर सेना अध्यक्ष महाराष्ट्र, ad राहुल राठोड प्रवक्ता गोर सेना महाराष्ट्र, अनिल राठोड गोर सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र,विजय राठोड विदर्भ,बाळू राठोड हिंगोली जीला अध्यक्ष, राजू चव्हाण औरंगाबाद जीला अध्यक्ष, संयोजक,हरिभाऊ राठोड माजी खासदार, देविदास राठोड,ब क दल अध्यक्ष, नंदू भाऊ राठोड, राजपाल राठोड,पी टी चव्हाण ब परिषद, प्रा क्रिसना राठोड,नामा बंजारा नागपूर,दिगंबर  राठोड,ब क संघटना फाऊंडर, जय राठोड ब क दल औरंगाबाद, भगवान राठोड कंधार,प्रकाश राठोड,डॉ बी डी चव्हाण नांदेड,नंदा बाई परभणी,.कैलास जाधव, अशोक जा,विकास भाऊ आंबरवाडीकर, प्रदीप राठोड, बीड,...आणि सर्व,गोर सेना सोबती,, ऑल गोर बंजारा समाज................................हे उपस्थित होते.



हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी...गोर सेना,गोरसिकवाडी,परभणी गोर बांधव........................................... यांनी कठोर परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments