Subscribe Us

गोर आर्णी येथे दिले तहसीलदाराना दिले निवेदन


जै गोर जै सेवालाल जै जै रामराव बापूू


  गोर सेना आर्णी तालुका यांच्या वतीने तहसीलदार आर्णी यांना निवेदन देण्यात आले.

मौजे डिगोळ तांडा ता.सोनपेठ जि.परभणी येथील इयत्ता अकरावी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बळाचा वापर करून सामूहिक बलात्कार करतांना त्याचा व्हिडिओ क्लिप तयार करून याघटनेबद्दल इतरांना काही सांगितले तर हा व्हिडिओ व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी दिली.

या धमकीला घाबरून तिने विष केले.ती अल्पवयीन मुलगी मागील आठ दिवसापासून दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर काल 21/09/2021 ला तिचे निधन झाले. तेव्हा महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या वाढत्या घटना या सरकारच्या नाकर्तेपणाचा व पोलीस प्रशासनाची निष्क्रियता दर्शविते. गुंड, विकृत व सरंजामी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. ऊसतोड कामगार कष्टकरी गोरगरीब तांडा वस्तीवर राहणाऱ्या सामाजिक दृष्ट्या मागास, शोषित, वंचित स्त्री चे,मुलींचे अब्रुची लक्तरे दिवसाढवळ्या सातत्याने काढली जात आहे.

ही अत्यंत शर्मनाक व गंभीर बाब आहे.हे लक्षात घेऊन बलात्कार करून मृत्युस प्रवृत करणे या प्रकरणातील आरोपींना जलद गती न्यायालयाकडून कठोर शिक्षा होईल. या प्रकारे तपास करण्यात यावा व पीडित कुटुंबाला शासन स्तरावरून आर्थिक व इतर सर्वप्रकारची मदत करण्यात यावी. अन्यथा याविरुद्ध गोर सेनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे गोर सेना जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल जाधव यांनी सांगितले.

विलास रामावत गोरसिकवाडी राष्ट्रीय संयोजकयावेळी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल जाधव, विभागीय उपाध्यक्ष मारोती कडावत, संजय पालतिया, गोर सेना महाराष्ट्र,संदिप पवार,प्रेम राठोड, नरेंद्र चव्हाण, भानुदास राठोड, गोपाल जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गोर सेना ,गोरसिकवाडी भारत

Post a Comment

0 Comments