Subscribe Us

गेवराई तालुका जाहीर पाठिंबा


 *गेवराई तालुका* 
गोर सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा, 
माजलगाव येथील धरणाला आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेबांचे नाव द्यावे यासाठी माजलगाव मतदारसंघातील बंजारा समाज बांधव आणि विशेषतःगोर सेना व महानायक ग्रुप चे सर्व तरुण अनेक वर्षांपासून आंदोलने करीत आहे परंतु या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असून या तलावाला दुसरे नाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच न्याय मागणीसाठी माजलगाव  येथील तहसिल कार्यालयासमोर महानायक ग्रुप व समाजातील बांधव आज  पासुन अमरण उपोषण करत  असून यास आमचा जाहिर पाठिंबा आहे एवढेच नव्हे तर आमचा सहभाग आहे, शासनाने व प्रशासनाने या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा बंजारा समाज आणि गोर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात  रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.निवेदन देताना गोर सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल भाऊ राठोड,जातेगाव ग्रामपंचायत उपसरपंच रामेश्वर भाऊ पवार,गेवराई तालुका अध्यक्ष योगेश भाऊ पवार, ऊसतोड कामगार तालुका उपाध्यक्ष बाळाभाऊ पवार,जातेगाव सर्कल अध्यक्ष अंकुश भाऊ पवार,विजय भाऊ राठोड,प्रेम भाऊ राठोड,राजू चव्हाण,संजय जाधव,प्रवीण राठोड, लहू चव्हाण, अमोल चव्हाण आदी..

Post a Comment

0 Comments