Subscribe Us

जातीचे राजकारण जालना


 प्रति, 

मे. उपविभागीय अधिकारी

उपविभागीय अधिकारी कार्यालय, जालना.

        

        विषय : आपल्या कार्यालयातून मोरे, भिडे, मेढकर या आडनावाच्या व्यक्तिना बंजारा म्हणून देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत.


महोदय, 

      वरील विषयी विनंती करण्यात येते की,  आपल्या कार्यालयातून मोरे, भिडे, मेढकर या आडनावाच्या व्यक्तिना विमुक्त जातीच्या प्रवर्गातील  बंजारा  म्हणून देण्यात आलेली कांही  प्रमाणपत्र आम्हाला मिळालेली आहेत. विमुक्त जाती प्रवर्गातील  मुळ बंजारा जातीत मोरे, भिडे , मेढकर अशी आडनावे नाहीत. जर ही आडनावे बंजारा जातीतील पोट जातीपैकी असेल तर ती पोटजात  शासनाच्या विमुक्त जातीची  जी यादी आहे. त्या यादीत संबंधित जातीचा समावेश आहे का ? जर नसेल तर कोणत्या आधारावर या आडनावाच्या लोकांना  बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे ? हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाजाला पडलेला आहे. ज्यांना या कार्यालयातून बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र दिलेली आहेत ती नावे अशी आहेत-


     १. कुमार मोरे विशाल हिंमत (बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र काढल्याची ता. २९/६/२०२०)

२. कुमार किशोर वेंकट भिडे (बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र काढल्याची ता.०८/०७/२०२१)

३. कुमार अमित आशीष मेढकर (बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र काढल्याची ता. ०८/०७/२०२१)

४.बाबूलाल मोफतलाल मोरे     ( बंजारा म्हणून जातीचे प्रमाणपत्र काढल्याची ता.   २०/०१/२०२१)

       ह्या व्यक्ती खरोखर बंजारा  जातीचे आहेत की, इतर जातीचे आहेत, याबाबत आपल्या कार्यालयातून महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाला माहिती हवी आहे.

       सध्या  महाराष्ट्रात जात चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे मुळ  विमुक्त भटका समाज संवैधानिक सोई सवलतीपासून वंचित रहात आहे.  शासकीय कार्यालयातून केवळ जातीचे  खोटे प्रमाणपत्रच दिले जात नाहीत तर  असे बोगस जात प्रमाणपत्र दहा पंधरा हजार रुपये घेऊन  वैध करून सुद्धा  दिले जातात. 

      विमुक्त भटक्या समाजाच्या दुर्बलतेचा गैरफायदा कांही प्रगत जाती घेत आहेत. त्यामुळे वरील विषयाला अनुसरुन योग्य ती चौकशी करुन सहकार्य करावे ही विनंती.


सोबत:  आपल्या कार्यालयातून देण्यात आलेली जात प्रमाणपत्रे.


गोर सेना जालना जीला

            शाम गोलानी जीला प्रमुख

अमोल राठोड जालना तालुका प्रमुख

गोर सैनिक जालना      


Post a Comment

1 Comments

  1. आश्या गोष्टीवर लवकर आळा घातला पाहिजॆ.
    अन्यथा समाजाचॆ खूप मोठॆ नुकसान होणार.

    ReplyDelete