Subscribe Us

गोर सेने कडुन बुलढाणा जीला निवेदन


जै गोर जै सेवालाल जै 

 उपरोक्त बातमी   आपण आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात, प्रिंट मीडिया, वेब मीडिया, इले्ट्रोनिक मीडिया मध्ये बातमी प्रकाशित करण्यात यावे ही विनंती.        

          मुंबई विमानतळास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्या बाबत.*

  आज अधिकृत गोर सेना च्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. 

           नवी मुंबई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतराव नाईक यांचे नांव देण्यात यावे. मा. वसंतराव नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अत्यंत कठोर निर्णय घेऊन नवी मुंबई हे शहर वसविले आहे. शहरामध्ये औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महामंडळाला भरघोस निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिंदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्त्वाचे शहर बनवण्यामध्ये मा. वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाय हरीत क्रांतीचे स्वप्न पाहताना शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी, उजनी,अप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी, पारस, परळी, खापरखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महाराष्ट्राला देशात एक नंबर वर आणले. हे महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडे अकरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणाऱ्या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल. म्हणून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी  मागणी गोर सेना कडून केली आहे.अन्यथा  गोर सेनेच्या वतीने येणाऱ्या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा अध्यक्ष डॉ विजय राठोड ,  यांच्या कडून करण्यात आली आहे  


प्रा अरविंद चव्हाण(महा. गोर सेना उपाध्यक्ष)

सुभाष आडे(गोर सेना विभागीय उपाध्यक्ष)

अनिल पवार(जिल्हा उपाध्यक्ष गोर सेना)

ईश्वर चव्हाण(जिल्हा सचिव )

राजू राठोड(जिल्हा संघटक)

दिगांबर चव्हाण(गोर गावंणिया)

तुकाराम राठोड(सरपंच गुळभेली)

एकनाथ राठोड(तालुका उपाध्यक्ष मोताळा)

दिनकर पवार(गोर सेना मोताळा)

तेजराव जाधव (जि प सदस्य बुलढाणा)

सुरेश आडे (सरपंच मोहना)

संतोष जाधव (सरपंच विश्र्वी)

विठ्ठल चव्हाण (ग्रामसेवक संघटना बुलढाणा)

गजानन चव्हाण (नळकुंड)

पंडित जाधव (नळकुंड)

इंदल राठोड (तालुका सचिव मोताळा)

प्रेम कुमार राठोड (पत्रकार)

रामकृष्ण राठोड (माजी फौजदार)

सचिन राठोड (पळसखेड)

राठोड सरपंच पळसखेड

चंदन चव्हाण (गुळभेली)

बळीराम राठोड (खडकी)

रमेश राठोड (तालुका उपाध्यक्ष मेहकर)

गजानन राठोड (तालुका अध्यक्ष)

प्रकाश राठोड (गोर सेना मेहकर)

सागर चव्हाण (गोर सेना मेहकर)

सचिन चव्हाण (गोर सेना मेहकर)

पवन जाधव (गोर सेना मेहकर)

मंगल राठोड (गोर सेना मेहकर)

विकास राठोड

प्रकाश राठोड (माजी सरपंच पळसखेड)

प्रकाश राठोड (सरपंच पळसखेड नाईक)

चेतन राठोड (पळसखेड)

सुधाकर राठोड ( पळसखेड)

संदीप चव्हाण (वरवंड)

महेश राठोड (वरवंड)

गोकुळ नाईक (मेहकर)

संतोष आडे (पंचायत समिती सदस्य सिंदखेड राजा)

फुल सिंग नायक (पळसखेड)

विनायक राठोड (माजी सभापती सिंदखेड राजा)

प्रमोद जाधव (हरणी)

साहेबराव चव्हाण (सरपंच डोंगर खंडाळा)

अनिल सांगा वत (गोर सिकवाडी संयोजक महाराष्ट्र)

प्रा रमेश गोलाणी (गोर सिकवाडी सहसंयोजक महाराष्ट्र)

सुभाष रामावत ( महाराष्ट्र हसाबी गोर सिकवाडी)

पदाधिकारी   जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments