Subscribe Us

संत सेवालाल महाराजांचे ऐतिहासिक साहित्य व पुरावाचा अनमोल ठेवा*



पूस्तक  समीक्षा*


 दिनांक 3/ 7/ 2019

*संत सेवालाल महाराजांचे ऐतिहासिक साहित्य व पुरावाचा अनमोल ठेवा*


 पुस्तक 📘 *रण  बडा गोर*


 लेखक✍ *श्री.धनजी लालसिंग नाईक रा.साखरा ता.दिग्रस जि.यवतमाळ*

 ------------------------------------------------------

मनोगत✍  *उदय राठोड अपर जिल्हाधिकारी* अमरावती मुक्काम पोस्ट साखरा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ 


 समीक्षक✍ *याडीकार पंजाब चव्हाण पुसद 95 52 30 27 97*

==========================

 मंगळवार दिनांक 29/ 6/ 2019 रोजी पोहरागड येथे भेट दिली *क्रांतीसुर्य सेवालाल महाराज ,जगदंबा देवी ,संत डॉक्टर रामराव बापू समाधी स्थळ, संत बामणलाल महाराज* यांचे दर्शन झाल्यानंतर गोरधर्म पीठाचे महंत जितेंद्र महाराज, महंत सुनील महाराज, महंत कबीर दास महाराज, महंत शेखर महाराज पोहरागड यांची भेट घेऊन गोर बंजारा समाज आणि धर्म याबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली ही सर्व चर्चा मुलाखत रूपाने पुढे सादर करण्यात येईलच. पत्रकार शंकर आडे यांची भेट झाल्यानंतर मी आणि विलास गोस्तावाळो यांनी महंत कबीरदास महाराज यांची पुन्हा भेट घेतली पोहरागड येथील ऐतिहासिक वारसा आणि इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला *महंत कबीरदास महाराज यांनी गोर बंजारा समाज धर्म आणि संत सेवालाल महाराज, संत जेतालाल महाराज ,सामकी याडी बाबत फारच अभ्यास पूर्ण माहिती सांगितली आणि लेखक धनजी लालसिंग नाईक यांनी लिहिलेले पुस्तक रण बडा गोर वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले* सदर पुस्तक वाचले असता अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ऐतिहासिक घटनाचे साक्षीदार ,पुरावे असलेले हे पुस्तक  *लेखक धनजी लालसिंग  नाईक राहणार साखरा यांनी लिहून गोर बंजारा साहित्यक्षेत्रात फार मोलाची भर घातलेली आहे.* गोर बंजारा समाजामध्ये आज रोजी ज्या गोष्टी माहित नाही अशा ऐतिहासिक गोष्टीचा  उहापोह लेखक धनाजी नाईक यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे त्यामुळे धनजी नाईक यांचे हे पुस्तक संशोधनाकरिता पुढच्या पिढीसाठी निश्चितच उपयोगी पडेल श्री धनजी नाईक यांचा जन्म 25/ 8/ 1919 मध्ये झाला असून त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे लहानपणापासूनच सत्संगाची टिपण करण्याची लेखकाला सवय असल्यामुळे त्यांनी हे पुस्तक लिहिल्याचे दिसून येते नाईक साहेबांचा आणि लेखकांचा आपुलकीचा संबंध होता नाईक साहेबांच्या सुधारणावादी विचार धनजी नायकांना पटायचे त्यामुळे धनजी नाईक यांनी धडपड करून आपल्या मुलाला शिकविले आज धनजी नायक यांचा परिवार परिसरात नावारूपाला आलेला आहे गोर बंजारा इतिहास लेखकाला त्यावेळी तोंडपाठ होता त्यामधूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे 

*बंजारा जमातीचा इतिहास व जाती,

 सेवादास महाराजांची वंशावळी व भविष्यकालीन बोल ,संत सेवादास महाराजांची अंतिम इच्छा, संत सेवादास महाराज यांनी लछमा नाईक यांना श्रीफळ नारळ अर्पण केले ,साखरा गावाचा इतिहास व स्थापना, लछमा चत्ररू नाईक राठोड अनावत  राज्य घराण्याची वंशावळी,भारतात बंजारा लोक प्रथम तांडा करणारे घराणे* असे 7 प्रकरण सदर पुस्तकात समाविष्ट केलेले असून सदर पुस्तक कोणत्या वर्षी प्रकाशित झाले याची मात्र या पुस्तकांमध्ये नोंद नाही *सदर पुस्तकाचे मनोगत अत्यंत सुंदर रीतीने अमरावती येथील अप्पर जिल्हाधिकारी श्री उदय राठोड यांनी लिहिलेले आहे* आता या पुस्तकातील आपण इतिहास पाहू या .


*बजारा जातीचा इतिहास व जाती*

बंजारा भारतात सर्वत्र आढळणारी एक भटकी जमात असून आज या लोकांना वंजारी, बंजारी, बंजारा ,पिंजारी ,लमान, लमानी ,लंबाडी ,लंबाडा, लंबाडोडु, सुकलीर.इत्यादी अनेक नावे आहेत आपसात बोलताना हे स्वतःला बाकर म्हणून संबोधतात. महाराष्ट्र म्हैसूर, मद्रास ,राजस्थान व मध्य प्रदेश मध्ये या लोकांची वस्ती बरीच आहे बैलाच्या पाठीवर धान्य, नारळ, खजूर मीठ व इतर सामान  लादून तो भारतात जवळजवळ सर्वत्र पोचविणे हा त्यांचा परम परंपरागत  धंदा होता कधी कधी   त्यांच्या  तांडयात 100000 बैल असायचे ऐतिहासिक पुराव्यावरून असे दिसते की या लोकांनी इसवी सन 13 96 ते1896 या प्रदीर्घ कालखंडात हा धंदा , व्यवसाय खडतर लहान मार्गातून केलेला आहे इसवी सन 13 96 पासून पुढे बारा वर्षे उत्तर भारतात मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी या लोकांनी नेपाळ, चीन, तिबेट, ब्रह्मदेश ,इराण वगैरे भागातून धान्य वाहून आणले व लोकांचे प्राण वाचवले असे इतिहासात आढळते युद्धाच्या काळातही त्यांनी मोगल मराठा व युरोपियन सैन्याला धान्य कापड व इतर आवश्यक वस्तू पुरवल्या *मोगल राजांनी त्यांना त्याबद्दल वंशपरंपरा किताब व जाहागिरी दिले आहेत*  पण पुढे इंग्रजाच्या आमदानीत रेल्वे  व रस्ते ही नवी वाहतुकीची साधने अस्तित्वात आली आणि त्यांचा हा धंदा जवळजवळ बसला त्यामुळे ते शेती पशुपालन मजुरी इत्यादी व्यवसाय करू लागले  मुळात हे लोक राजस्थानी असून मुसलमानाच्या फौजांना रजद पोचविण्याच्या निमित्ताने ते दक्षिणेत आले व मग तेथे स्थायिक झाले या जातीत हिंदू ,शीख ,जैन, मुसलमान धर्माचे लोक असून ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या वर्णनाचा लोकांचाही भरणा आहे *त्यापैकी ब्राह्मणांना मथुरिया वैशाला लमाण राजपुतांना गोर बंजारे आणि भाटांणा चारण धाडी नाव आहेत* गोर बंजारा लोकांचे भुकिया भुकिया भानोत ,चव्हाण, पवार,वडतिया व तुंवर असे सहा पोटभेद आहेत मथुरा वृंदावनातून  ईकडे आल्यामुळे त्यांना मथुरिया असे नाव मिळाले हे लोक मंजू करतात व जानवे घालतात तसेच ते शाकाहारी असून मद्यमांसाला स्पर्शही करीत नाही  भाट की धाडी लोक राजाश्रयाने राहतात राज्याची व वंशावळी ठेवतात त्यांची स्तुतिपर कवने रचुन गातात,,बंजारा तील स्त्रिया व मुलीच्या पाठराखण्यासाठी यांना पाठवण्याची पूर्वी प्रथा होती *पळवून आणलेले किंवा नायकांनी विकत घेतलेले असे जे लोक बंजारात आढळतात त्यांना कोरिया किंवा जांगड म्हणतात तीन  किंवा सात पिढ्या नंतर या लोकांना मुख्य जातीतच घेण्यात येते* याशिवाय प्रांत परत्वे बंजारा चे मराठा कानडी गुजराती असेही लोक भेटतात त्यातही पुन्हा आणखी भेद असून त्यांच्यात परस्पर रोटी-बेटी व्यवहार होत नाही *लेखकाने या पुस्तकात गोर बंजारा समाजांची वेशभूषा ,घरे, भाषा, विवाह प्रथा, यामध्ये काही ठिकाणी लग्न समारंभ संपल्यावर वधूवरांना बैलावर उभे करतात व बैल पळवतात वधूवरांपैकी जो कोणी प्रथम पडेल तो प्रथम मरेल असे समजतात* तसेच प्रस्तुती प्रथा, धार्मिक व इतर गीते यामध्ये लाखा बंजारा नावाचा एक परोपकारी पुरुष राजस्थानात होऊन गेला दुष्काळाच्या वेळी आपल्याकडच्या धान्याचा सर्व साठा त्यांनी दुष्काळ पिडीत लोकांना वाटला व अनेकांचे प्राण वाचवले त्यांच्या औदार्या यासंबंधी काही गीते इतिहासात रचलेली आढळतात बंजारा लोकांना नृत्य आणि संगीताची फार आवड होती नंगारानृत्य ,साप व मोर यांची नुत्ये दोन्ही हाताचे नुत्ये,एक टागरो,उडारा  इत्यादी नृत्य प्रसिद्ध आहेत मर्तीकप्रथा यामधे विवाहीत मुतांना जाळतात व अविवाहित मृतांना कोणताही विधी न करता पुरतात याबाबतची संपूर्ण माहिती लेखकांनी अत्यंत अभ्यास पूर्ण नोंदवलेली आहे त्यामुळे या पुस्तकाची गोर बंजारा समाजाला अत्यंत गरज असल्याचे दिसून येते 

*राठोड ची उत्पत्ती*

 फुलसिंगाचे पुत्र भिका, बाला भिका चे पुत्र मानसिंग,मालटी   मानसिंग ते पुत्र डालु,पेराज,सदारत,रणसोत मालटीचे पुत्र रावणया,बचराणा,डोलवाण,खाटरोत,घेणावत,मोदरेचि,नेणावत,सागावत,रातळ,कुकरेचा. खाटरोतचे पुत्र हाडा, बेगा *हाडा मेघा चे पाढे सहा*अनावत,अडासोत,लकसोत,जुनसोत,भुणसोत,डुगावत 

 *बेगा चे पाडे सात* उडावत,कडावत,पातळोत धनावत, रामावत करमटोत देवसोत.

 *मानसिंग ते पुत्र चार, मालटीचे दहा ,मेघाचे सहा ,बेगाचे सात चार अधिक दहा अधिक सहा अधिक सात एकूण बरोबर 27 पाढे*

 राठोडचे गड जोधपुर ,कनोज गड नागोरगड, चव्‍हाण -आनंद देवचा -अजयपाल -तेजपाल पुथ्वीराज 

*पुथवीराजचे सहा पाढे* पालत्या, करा ,लावड्या सपावट ,केळुत,मुड,

चव्हाणचे गड -चक्रीगड, सागरगड ,अजमेर गड *पवाराचे बारा पाढे* झरपला,विसळावत,आमगोत,गोराम़,वाकडोत,विजरावत,लुणसावत,आयोत,छर्योत,बाणी,तरबाणी,असडावत. *पवाराचेगड* धारा नगरी, उज्जैन गड, अबागड

 *लहान राठोड बानोत आडेची*

भिका+ बाला दो भाई , घर घर मे बनाये सगाई (सोयरीक)बालाचे बाणोत चौथी जात निर्माण केली.

*आडे बाणोत चे पाढे सात* आलोत,बालण(बानोत), मोहन,मुचाळ,जाठरोत,धरमसौत,जागडीवत.  यांचे गड किल्ले नाहीत .कारण हे नंतर झालेले आहेत 

*जाधवची जात निर्माण कशी झाली*

देमा गोसाई कडून बंजारी लोक लवानी व्यापार धंदा करण्याकरिता पैसा वगैरे आणत असत ती वसुली करणे करता एक ब्राह्मणाचा मुलगा दिवानंजी म्हणून ठेवला होता त्याचे पवाराच्या मुलीची गुजरी हिच्याशी प्रेम संबंध जुळले तेव्हा राठोड चव्हाण पवार या तीन जातीने ग्रामपंचायत बसून त्या मुली पासून निर्माण झालेली वंशावळी पाचवी जात वड त्या (जाधव ) म्हणून केली तेव्हापासून पाचवी जात जाधव म्हणून निर्माण झाली. *जाधवचे पाढे* बाधा,बोडा, लखावत ,लूनावत ,धरमसोत, जाठरोत, तेजावत ,दा,लवान अजमेरा ,धा रावत,भूगलोत, माळोद,  अरधी जात पमोडया. प्राचीन काळापासून राठोड पवार व चव्हाण या जातीच्या गड-किल्ले आहेत व नंतर निर्माण झालेल्या जातीमध्ये आडे बाणोण  आणि जाधव वड

ते या जातीचे गड-किल्ले नाही 

*संत सेवादास महाराजांची वंशावळी*

 रामजी नायकाचे पुत्र 3 भीमा, हेमा ,स्वामी .

*भीमा रामजी रामा वत  यांचे पुत्र*

 संत सेवादास ,हापा बदु नाईक, पुरा नाईक,

 *श्री संत सेवादास महाराज हे ब्रह्मचारी होते म्हणून त्यांची वंशावळ नाही* 

*हापा नाईकांची वंशावळ* हापाचे पुत्र --कुचाबाबा ,बुचा बाबा,  सुका लालबाबा, सुकलाल बाबाचा- कसंळ सिंग 

कसं ळसिंगाचा -धनसिंग 

धनुसिंगाचा- हंजारी 

हंजारीचि श्री नामदेव महाराज 

*बदु नायकाची वंशावळ*

 बदुनायकाचे -जेतालाल जेताभायाचा -रामचंद्र नायक रामचंद्र नाईकाचा- सवाईराम, कनीराम 

सवाईरामाचे पुत्र- चरणदास चरणदासचा -प्रल्हाद 

प्रल्हादचा- जमनादास कनीरामचे पुत्र -मोहन, मोहनचा पुत्र-हरिसिंग, रावजी 

*पुरा नाईकाची वंशावळी*

पुरानाईकाचे -बामणलाल महाराज 

बामणलाल महाराजाचे-कसं दास महाराज ,

कसनदासचा- दुर्गादास, अंबादास ,शिवदत्त, ब्रह्मदत्त

कसळसिंग महाराजाला पुत्रसंतती नव्हती म्हणून भाऊ हरलाल चा पुत्र रतनसिंग यास दत्तक घेतले त्यांचे पुत्र परसराम महाराज आला महाराज परसराम महाराजांचे पुत्र रामराव महाराज ब्रह्मचारी भक्त होते दत्तक घेतल्यानंतर कसं ळसिंग महाराज यांना धनु सिंग महाराज पुत्र प्राप्ती झाली.

 *संत सेवादास महाराजांचे महाराजांचे  भविष्यकालीन बोल*

संत सेवादास महाराजांचा जन्म दिनांक 15 फेब्रुवारी 17 39 रोजी मैसूर जिल्ह्यातील बेलारी येथे झाला वयाच्या अकराव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली त्यांनी ध्यानधारणे मध्ये भविष्यवाणी सांगितली अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेच्या दिवशी ब्रह्मनाथ जवळा सोमला भगत राहणार रामगाव डोरली तालुका दिग्रस यांना प्रथम बम्हनाथ जवळा सोमला भक्त आडे यास वदीतीयेस दुसरी माळ,शीतळ बाबा जानू चव्हाण राहणार डोलारी यांना मितीयेस  तिसरीमाळ, पोहरादेवी पंचमीस बामणलाल महाराज पोहरादेवी पाचवी माळ,व सपतमीस संत जेतालाल महाराज उमरी बुद्रुक सातवी माळ , आणि अश्विन शुद्ध नवमी दसऱ्याच्या दिवशी बलीदानाचे दिवशी  साकरा ता.दिग्रस जि.यवतमाळ येथे  श्यामा परसु नाईक यांचे घराण्यात वरवर्षी बलीदान व पुजा-अर्चा करण्यास संत सेवालाल महाराजाने सागिंतले व ती परंपरा वर्षानुवर्षे चालु आहे. रामराव आनंदराव नाईक रा.साकरा यांचे घरी ते नारळ आजतागायत आहे. व दरवर्षी आशिवीन शुद्ध नवमीस पुजा प्रथा चालु आहे.  नवरात्रीतल्या नवमाळे ची वाटणी संत सेवालाल महाराज यांनी त्यांच्या हयातीमध्ये केलेली आहे त्या प्रमाणे दरवर्षी बलिदान व पूजा-अर्चा करण्यास संत सेवालाल महाराज यांनी सांगितलेले आहे व ती परंपरा  आजही वर्षानुवर्षे चालूच आहे 

*संत सेवालाल महाराज यांची अंतिम इच्छा*

संत सेवालाल महाराज भारत भ्रमण करून शेवटी पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा अकोला येथे  छावणी जेवणाचा रसोई मुक्काम झाला. त्या भोजनामध्ये चिंच  टाकल्यामुळे एक दाणे  बी निघाले ते बी संत सेवालाल महाराज यांनी तेथे लावले कालांतराने चिंचेचे झाड झाल्यावर संत सेवालाल महाराज यांनी सर्व मंडळीना बोलावून त्यांचे बंधू हापा नाईक, बदु नाईक, पुरा नाईक त्यांना सांगितले की छावणीतील सर्व लोकांना बोलवा सर्व मंडळी जमा झाल्यावर *संत सेवालाल महाराज यांनी स्वर्गवासी झाल्यानंतर मला पोहरागड येथील या चिंचेच्या झाडाजवळ अग्निकाष्ठ द्यावा अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे रुई गडावरून संत सेवालाल महाराज यांना पोहरागड येथे आणून संजीवन समाधी त्या चिंचेच्या झाडाखाली देण्यात आलेली आहे ऐतिहासिक घटना लेखकांनी या पुस्तकात नमूद केली आहे* त्या नंतर देऊळ बांधण्यात आले घटस्थापनेच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस तेथे मोठी यात्रा भरत होती भारतातील सर्व बंजारा बांधव *काशी तीर्थ* असल्यामुळे येथे येत असत परंतु हे दिवस पावसाळ्याचे असल्यामुळे यात्रेकरूंची फार हेळसांड होत होती ही गैरसोय टाळण्यासाठी  पन्नास ते साठ वर्षापासून चैत्र शुद्ध रामनवमी ला यात्रा भरवण्यात येते तसेच अशीच यात्रा संत जेतालाल महाराज व सामका माता उमरी बुद्रुक तालुका मानोरा जिल्हा अकोला येथे भरवण्यात येते आजही दर मंगळवारी सुद्धा पोहरागड आणि उमरी गड येते भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात .

*संत सेवादास महाराज यांनी श्री लचमा नाईक यांना श्रीफळ (नारळ) अर्पण केल्याची ऐतिहासिक घटना*

या नारळ बाबत लेखक कोमलसिंग आणे च्या सुपुत्री सौ.विद्याताई चव्हाण  मुंबई यांनी कल्पना दिली होती.

श्री.लचमा नाईक यांचा जन्म अंदाजे 1660 मध्ये चतरूना यांचे घराण्यात झाला. प्रवासासाठी पांढरा घोडा वापरत असल्यामुळे त्यांना धोळे घोडेवाळो म्हणत असत.

 संत सेवालाल महाराज यांना अकराव्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली.त्यांच्यासोबत पाचशे ते सहाशे मंडळी बसलेली होती.लचमा नाईक एका बाजूला बसले होते.त्यांना जवळ बोलावून आपल्या ध्यान योगातच संत सेवालाल महाराज यांनी  आजोबा माझी पुजा करा असे लचमा नाईकांना पूजा करा असे सांगितले त्यावर लचमा  नायकांनी नम्रपणे नकार देऊन आम्ही मास मच्छी खाणारे असल्यामुळे आम्ही पूजा करू शकणार नाही असे सांगितले त्यावर संत सेवालाल महाराज यांनी लचमा नाईक यांना तुमच्या पद्धतीने पूजा करण्यास परवानगी दिली एक नारळ.बोलवा घट (चोको) तयार करून व तांब्याचा घडवा कळस गंध लावून त्या समोर दोन बकरे बलिदान द्यावे व तो प्रसाद सगळ्याला वाटून द्यावा व पूजा झाल्यावर ते नारळ एका कापडी थैलीत ठेवावे एकांतात हात बोट लागणार नाही अशा ठिकाणी ते नारळ ठेवावे असेही सांगितले व त्यांची अश्विन शुद्ध नवमी बलिदानाचे दिवशी दरवर्षी पूजा करीत जा ती प्रथा त्यांच्या वंशावळीत आजतागायत चालू आहे.स्वर्गीय लचमा नाईक आस संत सेवालाल महाराज यांनी आशीर्वाद दिला आहे की या नारळाची व जगदंबेची श्रद्धेने भक्तिभावाने पूजा करा सत्याने वागा . तुझ्या भविष्यात तुझ्या वंशपरंपरेला कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला *सध्या हे नारळ रामराव आनंदराव नाईक राहणार साखरा यांच्याकडे आहे* त्यांचे सुपुत्र डॉक्टर मधुकर नाईक यांची काल पुसद येथे भेट घेऊन संत सेवालाल महाराज यांनी त्यांच्या हाताने दिलेल्या नारळाची हकीकत जाणून घेतली डॉक्टर मधुकर नाईक यांनी सांगितलेली संत सेवालाल  आणि लचमा नाईक यांचे फार चांगले संबंध होते त्यामुळे संत सेवालाल महाराज यांनी लचमा नाईक यांना आपल्या हाताने नारळ दिलेला आहे .

तो नारळ लचमा नाईका कडून परसु नाईकाकडे आला परसु नाईका कडून श्यामा नायकाकडे आला श्यामा नाईकाला चार पुत्र  लालसिंग, हेमा, चापा आणि आनंदा. आनंदा लहान असल्यामुळे हे नारळ आनंदा नाईक यांच्याकडे आले.आंनदा नाईका कडून हे नारळ रामराव आंनदराव नाईकाकडे आले रामराव नाईक यांना एकच पुत्र डॉक्टर मधुकर नाईक असल्यामुळे सध्या हे नारळ साखरा येथील डॉक्टर मधुकर राव नाईक यांच्या घरी असून त्यांची दरवर्षी दसऱ्याला नवमीच्या दिवशी पूजा केली जाते नारळाची पूजा साठी बकरा व देवीच्या पूजा करीता पाठ बलिदान देण्यात येते.पोहरागड  येथे दर्शनाकरिता आम्ही गेलो की संत डॉक्टर रामराव महाराज आम्हाला सांगायचे संत सेवालाल बापू नारळ रूपात तुमच्या घरा मध्ये आहे येथे येण्याची आवश्यकता नाही तुम्ही आपल्या घरीच पूजा करा आम्ही नित्यनेमाने दरवर्षी नवमीला पूजा करतो ही प्रथा आजही आमच्या वंशावळीत आजतागायत चालू आहे तो नारळ व्यवस्थित रहावा म्हणून चांदीचा खोका त्या आकाराचा करून त्यात ते ठेवलेले आहे नारळ खराब न व्हावा म्हणून त्याला शेंदूर लावण्यात येते आम्हाला आज पंर्यत  काहीही कमी पडलेले नाही ज्यांना संत सेवालाल महाराज यांनी आपल्या हाताने दिलेले नारळ ही ऐतिहासिक साहित्य पाहावयाचे असेल तर नवरात्र मधील दसरा नवमीला साखरा  गावी येऊन दर्शन घ्यावे असे सांगितले डॉक्टर मधुकरराव नाईक यांनी संत सेवालाल महाराजाची महिमाचे वर्णन  अतिशय सुंदर  पद्धतीने सांगितले .

 *साखरा गाव ची स्थापना व इतिहास* 

भारतातून मुघलाचे राज्य गेल्यावर ब्रिटिश आले 1797 मध्ये   मोगलांचे राज्य गेल्या वर या साखरा गावात पूर्वी फार मोठ्या प्रमाणात डाके पडत असत म्हणून येथील लोक जिकडे तिकडे निघून गेले गाव वसान पडले होते पाटील गाव सोडून गेले होते त्यांच्या वंशावळीतील मुलाचा शोध काढून उत्तर वाढवणा नेरपरसोपंत तालुका दारव्हा  जिल्हा यवतमाळ यांच्या कुळातील एक मुलगा हटकर जातीचा मिळाला त्यास आणून सनदी पाटील म्हणून नेमणूक केली त्यांच्या हाताखाली आबया

म्हारास  कोतवाल म्हणून ठेवण्यात आले गावाची स्थापना केली तितक्यात जवळच असलेले हरसुल गावावरून श्री गोपाल उमाप्पा  बिजमवार पाटील व सामया बिजमवार पाटील हे साखरा येथे येऊन सावकारी धंदा व शेती करू लागले व 18 90 पासून स्थायिक झाले या गावात चार बुरुज गडी त्याचा फार मोठा दरवाजा वाडा होता त्याची लांबी रुंदी दोन हजार × दोन हजार फूट होती ती सध्या ना दृरुस्तीमुळे नष्ट झालेली आहे कैलास वासी लचमा चत्रु नाईक व संत सेवलाल  महाराज भारतात लदेणी  करून गहू, तांदूळ, अन्नधान्य इकडे तिकडे गुराढोरावर  पोहोचण्याच्या धंदा करीत होते ब्रिटिशांचे राज्य आल्यावर रेल्वे लाईन टाकल्यामुळे त्यांचा धंदा बंद पडू लागला व ते इकडे तिकडे भटकू लागले लचमा नाईक यांचे पुत्र परसू नाईक व चोकला नाईक भटकत भटकत सणगाव फहेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे आले ते तेथेच ते मरण पावले तेथून त्यांचे पुत्र श्यामा परसु नाईक चोकला नाईक व त्यांचा पुत्र वसराम नाईक भटकत टिटवा गावी तालुका कारंजा जिल्हा अकोला येथे आले व तेथे राहू लागले बाकीची भावकी  तेजानाईक, मानसिंग नाईक,लखमा नाईक, तुकाराम नाईक शोभा नाईक  हे जिकडेतिकडे उदर पोषणर्थ भारतात भटकत होते त्यांना जमा करण्यात आले टिटवा गावात आल्यावर त्यांच्यासोबत मोठा भाऊ भोजा नाईक, जगु नाईक, शामा नाईक हे होते व नंबर 4 रामा कारभारी हा मागे सणगाव फाळेगाव कडे राहिला वरील भाऊ नंबर 1 एक आणि दोन घेऊन वाई लिंगी तालुका दारव्हा  येथे आले व जवळच असलेले डुमनी  ईजारा व तिवरी  येथील शेती धरली व शेतीचा धंदा करू लागले येथे परसु नाईकाचे भाऊ चोखला यांचे पुत्र वसराम ,जीवा ,खीमा, भासू हेसुद्धा वाईलिगीवर  आले ते तेथेच स्थायिक झाले वाईचे मुसलमानी इजा रदार लिंगाचे दत्तोपंत  कानहे ,ब्राह्मण इजारदार खेकडीचे हसन अली बोहरा कादर अली  बोहरा यांच्या त्रासाला व मदत न दिल्यामुळे साखरा येथे काही जमीन धरून वाईलिंगी वरून वहिती करू लागले तेथून साखरा येथील जमीन दूर पडते म्हणून साखरा येथील कानोबा देवाचे टेकडी जवळ आले सोबत भाऊ भोजा नाईक, जगूनाईक, शामा नाईक,अबऱ्या भोजा चव्हाण , घाशीराम चव्हाण असे चार-पाच झोपड्या येथील जमीन वाहु  लागले शेत सर्वे नंबर 16 व सर्वे नंबर एक असे वीस एकर जमीन घेऊन तांडा बांधण्यात जागा घेतली व साखरा गावात आले व चौथा भाऊ रामा काळू कारभारी संणगाव व फळेगाव येथे मागे राहिलेला त्याचा शोध घेऊन त्या साखरा येथे परत आणले त्याच्यासोबत चंदू चिमण्या पवार, कन्या रोडा पवार, धर्मा वस्या राठोड, रामचंद्र राठोड ,मंग्या हेमला राठोड, वाघ्या हेमला राठोड, सुबे लाल भीमा, बाळा चादया गेला ,सुभे लाल भीमा ,रामसिंग आलोत,हऱ्या आलोत, लगडा दासु, मनसा रामचंद्र हे लोक आले व तांडा वाढीस लागला तसेच बल्लु नाईक यांची बहीण रब्दाल बाणोत यास  देऊन बहीण जावायास जवळ केले. तारू पवार यास पांडू भगना याची बहीण देऊन जवळ केले लालु बुडा जाधव यांच्याशी सोयरे संबंध करून जवळ केले त्यांना राहण्याकरिता घरे बांधण्यास श्री शामा नाईक यांनी स्वतःच्या शेतात जागा मोफत देऊन त्यांना आश्रय दिला व तांडा जमविला आहे श्री श्यामा नाईक यांनी दुष्काळात हरसुल चे दत्तू सावजी  सावकार, वासू सावजी सावकार यांच्याकडून ज्वारी पैसा आणून त्यांचे दुष्काळात पालन-पोषण केलेले आहे तितक्यात वागदा येथून भीमा केळुत चव्हाण, जीवला चव्‍हाण हे केळुत लोक आले गावात हजामत करण्यास माली नसल्यामुळे आमला गावाकडून मेघा मालीला आणण्यात आले सिंग ठोकणारे ढोले डपडे वाजवणारे सोन्यासिंग आडे फूल्यासिंग आडे ,मिन्यासिंग आडे, बंजारी लोकांचे गाणे म्हणणारे भाट लोक  दिना फरिदा ,इमाम फरिदा ,गुलाब फरिदा, धाडी लोक जमा केले बंजारी लोकांचे व स्त्रियांचे दागिने करण्याकरिता मारवाडी सोनार भिका पाडु सोनार, रामसिंग सोनार, अमरसिंग सोनार, भवान सोनार, देमा सोनार, भिकि देना सोनार हे लोक आले तसेच रामसिंग पुना करा ,हरलाल करा,हरसिंग करा चव्हाण यांना जवळ करण्यात आले येम्या भाऊ सिंग राठोड, पांडू भाऊ सिंग राठोड असे लोक या गावात येऊ लागले अशा तऱ्हेने चाळीस-पन्नास घरांचा तांडा तयार झाला धनसिंग सीटु, भासु वडत्या,रत्ना दासू चव्हाण ,रुपला रामजी करा, रामजी करा वरील लोक जंगलात राहणारे यांना शिक्षणाची सोय नव्हती म्हणून श्री बल्लु जगू नाईक यांनी स्वतःच्या खर्चाने शाळेकरिता एक इमारत बांधून शिक्षणाची साखरा येथे सोय केली व नारायण बालाजी येरावार ऊर्फ बाबा मास्तर कोमटी यांना आंध्र प्रदेशाकडून आणून शाळेवर मास्तर म्हणून नेमण्यात आले स्वतः मानधन देऊन व मुलांना योग्य शिक्षणाची सोय करुन देण्यात आली स्वर्गीय बल्लु नाईक यांनी समाजाची इमानेइतबारे सेवा केली कोणत्याही पंचक्रोशीतील तांडयात  तंटे-बखेडे भांडण-तंटा झाल्यास स्वतः पंचायत बसून न्यायनिवाडा करीत असत असे कितीतरी उदाहरणे देता येतील आजही साखरा गाव  बल्लु नायकाच्या नावाने नांदेडपर्यंत ओळखल्या जाते समाजातील कोणत्याही व्यक्तीवर पोलीस केस झाली तर त्याची जमानत  घेऊन त्याला मदत करीत असत यामध्ये त्यांना बरेच आर्थिक नुकसान होत असे दान-धर्मात  ते मागे राहत नसत *नांदेड येथील गुरूद्वाराला दान केल्याचे आजही तेथील स्तंभावर स्पष्ट होते पूर्ण गुरुद्वारात दान करण्याची नावे गुरुमुखीत आहे* परंतु बल्लु नाईक राहणार साखरा हे नाव देवनागरी लिपीत आहे त्यांना शिकारीचा शोक होता त्यावेळी शिकारीला आजच्यासारखी बंधने नव्हती त्यांनी वाघाची शिकार पण खूपदा केली इतर प्राण्यांची शिकार करून ते समाजामध्ये फुकट वाटप करीत असत *1924 मध्ये इंद्गोल ते पठाण गुंड यांना पकडण्यासाठी त्या वेळच्या शासनाने बल्लू नाईक व लालसिंग नाईक यांना परवाना बंदुक दिली होती* त्यांचीच पुण्याई म्हणून त्यांचा *मोठा मुलगा (सिताराम नाईक दत्तकपुत्र दयाराम नाईक यांचा मुलगा) उदय राठोड अप्पर जिल्हाधिकारी या सारख्या उच्चपदावर कार्यरत होते* ग्रामीण भागातील सर्वप्रथम लाईन साखरा गावात आलेली होती तसेच सर्वप्रथम एसटी येण्याचा मान साखरा गावाला जातो  दिग्रस तालुक्यातील एक मोठे गाव असून साखरा गावाचा नावलौकिक संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे.  या पुस्तकात  धेनका पोत लचमा नाईक,परशु नाईक,श्यामा नाईक, रामा कारभारी,चोखला परशु नाईक,कासी रुपा, रुपा नायकाची वंशावळी अभ्यास पुर्ण मांडलेल्या आहेत. शेवटी कासी रूपा भंडारा पैनगंगानदीकडे त्यांच्या गुराढोरावर मानमोडी नावाचा रोग आला.त्यांचे गुरेढोरे मेली त्यांचा धंदा बं पडला ते निराधार झाले. चांदा भंडारा कडे भटकत होते.त्यांचा शोध काढुन श्यामा नाईकाने.सोमला,धावजी बुडा यास साखरा येथे जमा केले व त्यावेळी एक दोन वर्ष श्यामा नायकाने स्वतः ची शेती देऊन धन-धान्य देऊन मदत केली अशी ही सुंदर गावाची सुंदर कहाणी आहे. लेखक धनजी लालसिंग नाईक यांनी संत सेवालाल महाराजांचे ऐतिहासिक साहित्य आणि आठवणी चा अनमोल ठेवा  लिहुन ठेवला आहे. सदर पुस्तकाचे साखरा येथील सर्व कर्मचारी, अधिकारी एकत्र येवून हजारो प्रतीचे प्रकाशन करून तमाम गोरबंजारा पंर्यत हा अनमोल ठेवा पोहचवावा. जय सेवालाल👏👏

किंमत-20 रूपये.

पेज-35

मुद्रक-सेंट पाँईट,नमुना-5, अमरावती 

🌴🌾🌿⛳🍀🌵🌷🌻


✍ * *याडीकार,पुसद* *

Post a Comment

0 Comments