Subscribe Us

23 जुलै 2021 ला राष्ट्रीय निवड


 






*🙏जै गाेर, जै सेवालाल🙏*
----------------------------------------
*बंजारा समाज धर्मपीठ चे महंत बाबुसिंग महाराज,महंत काबिरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत शेखर महाराज यांच्या आशिर्वादाने व कोअर कमिटी यांच्या हस्ते गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक पदी विलास रामावत तर गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष पदी अरुण चव्हाण यांची निवड*
----------------------------------------
            महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद अकरा वर्षे भूषविणारे हरित क्रांतीचे जनक महानायक वसंतरावजी  नायक यांच्या जन्मभूमित गहुली या गावी साहेबांचीच प्रेरणा घेऊन हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला., 
गोर सीकवाडी आणि गोरसेना ही चळवळ बंजारा समाजातील विविध मागण्या, बंजारा समाजाला शासन कडून मिळणाऱ्या विविध सुविधा जे तांडा, पाडा, वस्ती मध्ये पोहचल्या नाही.,बंजारा समाजावर होणारे अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यासाठी, बंजारा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी गोर सेना ही चळवळ मागील १८ वर्षापासून समाजामध्ये काम करत आहे.,
परंतु काल गुरु पौर्णिमेचे आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी डॉ. रामराव बापू यांच्या जयंतीचे औचित्य साधून अधिकृतरित्या चळवळीला व संघटनेला सुरूवात करण्यात आली आहे., 
         *संपूर्ण भारत देशामध्ये चळवळ काम करत असून काल  "बंजारा समाज धर्मपीठ चे महंत बाबुसिंग महाराज,महंत काबिरदास महाराज,महंत जितेंद्र महाराज,महंत शेखर महाराज यांच्या आशिर्वादाने व गाेरसिकवाडी च्या काेअर कमिटी च्या हस्ते गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक पदी विलास रामावत तर, गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष पदी अरुण चव्हाण यांची निवड कोअर कमिटीने घालून दिलेल्या नियम नुसार करण्यात आली.,*
                      गोर सीकवाडी आणि गोरसेना ही चळवळ अधिकृतरित्या कागदपत्रांची पूर्तता करून आणि शासनाची परवानगी घेऊन त्या अंतर्गत कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून काेअर कमिटी च्या आदेशानुसार गोरसीकवाडी राष्ट्रीय संयोजक व गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष यांची बंजारा समाजाचे धर्मपीठ पोहरागड,आणि गहुली येथून आज दिनांक 23 जुलै 2021 ला बंजारा समाजाचे दैवत आदर्श सतगुरु सेवालाल महाराज यांना साक्षी मानुन,व धर्मगुरू  तपस्वी डॉक्टर रामराव महाराज यांच्या  जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर *पोहरागड येथील महंत बाबुसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, रमेश महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज यांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास भाऊ रामावत व गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांची कोअर कमिटिच्या वतीने निवड करण्यात आली.*
            या कार्यक्रमाला  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील  गोर सीकवाडी आणि गोर सेनेचे पदाधिकारी यांनी हजारोंच्या संख्येने भरपावसात हजेरी लावली होती.
                 *यावेळी माजी मंत्री आ.संजय भाऊ राठोड, लोकनेते वसंतराव नाईक साहेब यांचे नातू आ. अॅड. निलयभाऊ नाईक,मा.अमय नाईक,यांनी*
*गोर सीकवाडी राष्ट्रीय संयोजक विलास भाऊ रामावत, गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण यांना समाज कार्यासाठी आशीर्वाद देऊन भरभरुन शुभेच्छा दिल्या.,*
या ऐतिहासिक कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील गोर सीकवाडी व गोर सेनेचे राज्याचे सर्वच पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष , जिल्हा पदाधिकारी उपस्थिती होते.व परिसरातील असंख्य समाज बांधवांनी उपस्थिती लावली., 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रमेश गाेलाळी गाेरसिकवाडी महाराष्ट्र सहसंयोजक, प्रास्ताविक मा. श्रीकांत राठोड गाेरसिकवाडी महाराष्ट्र सहसंयोजक, आणि आभार नामदेव पवार गाेर सेना प्रदेश अध्यक्ष यांनी केले.,
----------------------------------------
काेअर कमिटी गटीत,नाेंदणीकृत गाेरसिकवाडी गाेर सेना भारत



Post a Comment

1 Comments

  1. अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठीं शुभेच्छा

    ReplyDelete