Subscribe Us

जलक्रांतीचे प्रणेते सुधाकरराव नाईक स्मृतिदिन विशेष.. (१० मे २०२१)


 *——————————————————*

*काकाने महाराष्ट्रात हरितक्रांती घडवून आणली तर पुतण्याने जलक्रांती !*

*——————————————————*

● जलक्रांतीचे प्रणेते सुधाकरराव नाईक स्मृतिदिन विशेष.. (१० मे २०२१)

*------------------------------------*

             *~ डॉ. सुभाष राठोड, पुणे*

               

   आपल्या अल्पशा कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनावर कणखर निर्णयांची एक ठाम मुद्रा उमटविणारे मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक साहेब होत. २५ जून, इ.स. १९९१ ते २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते पुतणे होत. त्यांना *'जल क्रांतीचे जनक मानले जाते.'* जुलै १९९४ रोजी सुधाकरराव नाईक यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्त करण्यात आले होते. १७ सप्टेंबर १९९५ पर्यंत ते हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची यशस्वी धुरा सांभाळली.

   यवतमाळ जिल्ह्यातील 'गवली' या छोट्याशा गावात २ ऑगस्ट १९३४ रोजी सुधाकररावांचा जन्म झाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात सरपंच ते मुख्यमंत्री व राज्यपाल अशी अद्वितीय राजकीय सफर त्यांनी केली. पाण्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्वयंमपूर्ण असावा असे त्यांना वाटत. " पाण्यासाठी वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर या महाराष्ट्राला वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही." असे ते म्हणत. *'पाणी अडवा, पाणी जिरवा'* या मूलमंत्राचा संदेश देत सुधाकररावांनी महाराष्ट्र 'सुजलाम् सुफलाम्' तर केलाच पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मोठी जलक्रांती घडवून आणली. दुष्काळ आणि पाणी टंचाईने होरपळणारया महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी त्यांनी राज्यात जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारणाच्या कामांत गती देत राज्याला जलसमृद्ध केले. पाणलोट क्षेत्रात विकास हे नवे सूत्र नाईकांनी प्रभावीपणे वापरले. त्यातूनच  त्यांच्या संकल्पनेतून जलसंधारण हे खाते निर्माण केले. त्यामुळे छोटे बंधारे व पाझर तळाव निर्मितीस चालना मिळाली. महाराष्ट्रात विनाअनुदानीत तत्वावर अभियांत्रिकी महाविद्यालय उघडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही, हे ते जाणून होते. म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षणशुल्क माफ करण्याचे धोरण राबवले. महिला आणि बाल सुरक्षेचे अनेक प्रश्न  त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात यशस्वीपणे सोडविले. काकाने महाराष्ट्रात हरितक्रांती घडवून आणली तर पुतण्याने जलक्रांती !

जिल्हा परिषद अध्यक्षांना त्यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांची संपूर्ण देशभरात प्रशंसा झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मुंबईतील माफियाराज संपवून भूखंड माफियांना कठोर शिक्षा देवून त्यांना गजाआड केले. विशेषतः गुंड प्रवृत्तीच्या राजकारणी लोकांना त्यांनी चांगलाच धडा शिकवला. हाजी मस्तान, दाऊद इब्राहिम, पप्पू कलानी, छोटा राजन, अरुण गवळी त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांचे विच्छेदन केले यामुळे ते गुंडांसाठी कर्दनकाळ ठरले आणि जनमाणसात त्यांची प्रतिमा अधिक उंचावली. त्यांनी राजकारणातील गुंडा गर्दीला करारी स्वभावाने छेद दिला. मुख्यमंत्री म्हणून प्रशासनात दरारा निर्माण केला. 'मन कवीचे आणि मनगट प्रशासकाचे'  या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप राज्याच्या राजकारणात उमटली. त्यांच्या सरळ आणि स्वच्छ राजकारणाची छाप आजही महाराष्ट्रात कायम आहे. महाराष्ट्र शासन दरवर्षी सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनाला (१० मे ) *'जलसंधारण दिन'* म्हणून साजरा करते. 

   गहुलीच्या सरपंच पदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री व  राज्यपाल या संपूर्ण राजकीय प्रवासात सुधाकररावांनी बाणेदारपणा जोपासला. कला, संस्कृती, साहित्याचे रसिक असलेल्या सुधाकरराव यांची मातीशी असलेली नाळ कायम जुळलेली होती. समाजातील वेदनांची त्यांना जाण होती. महाराष्ट्राच्या माती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुधाकरावांना चांगले ठाऊक होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी केली. ''पाणी आडवा पाणी जिरवा'' या मंत्रातून धरणे, बंधारे बांधून महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम केले आणि महाराष्ट्रात हरित क्रांतीची पहाट उगवली. वसंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुतणे सुधाकररावांनी '' जलक्रांती '' चा ध्यास घेतला. सुधाकरराव यांचे दांडगे वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि तज्ज्ञांच्या विचारांचे अचूक परिशीलन या त्यांच्या गुणांमुळे ते भविष्याचा वेध सहजतेने घेत. 

    मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्याआधी त्यांनी कृषी, पाटबंधारे, शिक्षण, उद्योग, महसूल, पुनर्वसन, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, गृहनिर्माण अशी खाती सांभाळली. त्यातील अनुभवातून त्यांना एक गोष्ट जाणवली. राज्याच्या शेतीचा प्रश्न बागायती नसून कोरडवाहूचा आहे, त्यासाठी जलसंधारणाला पर्याय नाही. शेती आणि जलतज्ज्ञांशी संवाद साधताना दिवसेंदिवस भूजल पातळीत होणारी घट आणि राज्याची हळूहळू वाळवंटाकडे होत चाललेली वाटचाल लक्षात आली आणि धीरगंभीर असलेले सुधाकरराव अधिक गंभीर बनले. ''भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होऊ देणार नाही'',  ही मनाशी खूणगाठ बांधत या द्रष्ट्या नेत्याने राज्यात प्रथमच स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती केली. त्यासाठी अन्य खात्यांमधून जलसंधारणासाठी पैसा उभा केला आणि जलसंधारणांच्या कामांना चालना दिली. परंतु, अल्पावधीतच त्यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कार्याकडे नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले, ही खंत आजही जनसामान्यांच्या मनात आहे.

    मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे उभारावी, याद्वारे अधिक शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, या छोट्या प्रकल्पांमुळे शेतकरी भूमिहीन होणार नाही तसेच पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे विचार ते आपल्या भाषणांमधून मांडत असत. त्यांची जलसंधारणाची विचारधारा आणि धारणा अतिशय परिपक्व होती. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेची स्थापना केली. जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या सुधाकरराव नाईक यांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष पद स्वीकारतील की नाही अशी विलासरावांना शंका होती. मात्र जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाल्याने सुधाकरराव मनातून आनंदित झाले. ठप्प झालेल्या जलसंधारण कामांना गती देण्यासाठी सुधाकरराव यांनी दृढ निश्चय केला. ते अगदी नेमके बोलत, मुद्द्याचे सांगत 

जलसंधारण चळवळीसाठी सुधाकररावांनी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले. पुसद येथील त्यांचे सहकारी व तत्कालीन जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी यांना सोबत घेतले. या बैठकी खूप गाजल्या. जलसंधारणाच्या जागराने शासकीय यंत्रणा जागी झाली आणि जलसंधारणाच्या चळवळीत सुधाकररावांनी ऊर्जा भरली. जलसंधारण ही लोक चळवळ व्हावी, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी जलसंधारण चळवळीसाठी स्वत:ला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. कदाचित सुधाकररावांना अधिक वेळ मिळाला असता तर राज्यातील जलसंधारणाचे चित्र अधिक फलदायी ठरले असते. दुष्काळी स्थितीत महाराष्ट्र आज पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. अशावेळी सुधाकररावांच्या जलसंधारण कार्याची आठवण तीव्रतेने होते. महाराष्ट्राचे भविष्यात वाळवंट होऊ नये, ही अपेक्षा बाळगताना जलसंधारणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे.

   ‌युवावस्थेत सुधाकरराव यांच्यावर सर्वोदयी नेते विनोबा भावे यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता.  सुधाकरराव मुत्सद्दी राजकारणी होते. त्यांच्या निर्णयांनी राजकीय पंडितांना अनेकदा चकित केले. साहित्यिक आणि पत्रकारांवर त्यांचे प्रेम होते. स्वच्छ मन, मनाची सहृदयता आणि रसिकता त्यांच्या ठायी होती. “जलसंधारणातून महाराष्ट्रात समृद्धी नांदू शकते,’ हा त्यांचा चिरंतन विश्‍वास त्यांनी शेवटपर्यंत जपला. मुख्यमंत्री पदानंतर राज्य जलसंधारण सल्लागार परिषेदेचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारण ही जनचळवळ करण्यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न केले.

   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने १२ जून २०२० रोजी परिपत्रक जाहीर करून महाराष्ट्रातील 'जलक्रांतीचे जनक' शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १४ जुलै रोजी 'जलभूषण पुरस्कार' प्रदान करण्याचे ठरवले आहे. मात्र, जलसंधारणाचे खरे कार्य माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी केले आहे. महाराष्ट्र सरकारने १० मे हा त्यांचा स्मृतिदिन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत *'जलसंधारण दिन'* म्हणून घोषित केलेला आहे. त्यांना 'जलक्रांतीचे प्रणेते' घोषित केल्यानंतर आता राज्य सरकारने 'जलक्रांतीचे जनक' म्हणून शंकरराव चव्हाण यांना घोषित करून त्यांच्या जन्मतिथीला जलभूषण पुरस्कार देण्याची रीतसर कारवाई केल्याने सुधाकरराव नाईक यांच्या कार्यावर कुरघोडी करुन त्यांचे या क्षेत्रातील श्रेय लाटण्याचे हे षड्यंत्र आहे अशी संतप्त भावना मागील काही दिवसांपासून चाहत्यांनी प्रसार माध्यमांतून व सोशल मीडियातून व्यक्त केली आहे.

  महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढताना महाआघाडी सरकारमधील काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुधाकरराव नाईक यांचे जलक्रांतीचे अविस्मरणीय कार्याला डावलून माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना 'जलक्रांतीचे जनक' हा सन्मान देण्यात आलेला आहे. सुधाकररावांनी जलसंधारणाच्या खात्याची महाराष्ट्रात पहिली सुरुवात केली. जलसंधारणाला राज्यात मोठी चालना दिली. राज्य जलसंधारण सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रात झंझावती दौरे करून भूजलपातळी वाढविण्यासाठी कार्यक्रम आखले. 'जलसंधारणाचे कार्य झाले नाही तर भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होईल', असा इशारा त्यांनी दिला. जलचळवळ जनचळवळ करण्यासाठी त्यांनी शेवटच्या काळात क्षणाचीही उसंत घेतली नाही. असे असताना त्यांचे श्रेय लाटणे हे साफ चुकीचे आहे.    सुधाकररावांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द म्हणजे *"उत्कंठावर्धक अन्‌ चित्तथरारक वन डे क्रिकेट मॅच होय.”* असे त्यांच्या कारकिर्दीचे चपखल शब्दात वर्णन दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले आहे. सुधाकररावांच्या सृजनशील निर्णयाने तंत्रशिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारात पोचली आहे. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उपेक्षित शिक्षण खात्याला त्यांनी झळाळी दिली. महाराष्ट्रात विनाअनुदान तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये उघडण्याचा निर्णय त्यांनी 1983 मध्ये घेतला आणि पाहता पाहता महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाची क्रांती घडून आली. त्यांच्या काळात मुलींना शिक्षण शुल्कमुक्त झाले. मुली आणि सेवारत महिलांना वसतिगृह लाभले. अमरावती विद्यापीठ, तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना झाली.  मुख्यमंत्री पदानंतर सुधाकररावांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून राजवस्त्रे अंगावर घातली; परंतु काळी माती आणि मराठी मनाशी नाळ जुळलेल्या सुधाकररावांना सिमल्यात करमले नाही. ते पुसदच्या बंगल्यात परतले.

   वसंतराव नाईक यांनी १९६३ पासून १९७५ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. नाईक यांचा हा रेकॉर्ड तोडणे कुणालाही शक्य झाले नाही. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्रात हरितक्रांतीचे जनक मानले जाते. सलग दोनदा मुख्यमंत्री पद भूषवणारे एक एकमेव मुख्यमंत्री ठरले आहेत. अर्थात, देवेंद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी, त्यांचा का कार्यकाळ केवळ काही तासांचा होता. 

  सरपंच पदापासून सुरु झालेली सुधाकरराव नाईक यांची राजकीय कारकीर्द राज्यपाल पदापर्यंत पोहोचली. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री अशी पदेही भूषवली. यातही त्यांनी कृषी मंत्र्यापासून ते गृहनिर्माण मंत्र्यापर्यंतची खाती सांभाळली. पुसद विधानसभेतून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. मुंबईतील अंडरवर्ल्डचे राज संपवून तिथे कायदा सुव्यवस्थेचे राज्य निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणूनही सुधाकरराव नाईक यांच्याकडे पहिले जाते. यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली. उल्हासनगरचे आमदार आणि गँगस्टर भाई ठाकूर याला अटक करण्यात त्यांचा वाटा होता. मुंबईतील गुंडाराज संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. ते प्रशासनावर पकड असणारे मुख्यमंत्री होते.

   सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात जल संधारणाची कामे मोठ्या प्रमाणात उभारली. “पाणी अडवा पाणी जिरवा,” या मंत्रातून त्यांनी धरणे, बंधारे बांधण्याचा सपाटा लावला. यामुळेच आज महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला आहे.हरितक्रांतीची वाट धरणाऱ्या वसंतराव नाईक या त्यांच्या काकांपासूनच प्रेरणा घेत सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्रात जलक्रांती घडवून आणण्याचा ध्यास घेतला त्यामुळेच आदराने त्यांना जल क्रांतीचे जनक मानले जाते.' मन कवीचे आणि मनगट प्रशासकाचे ' या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप राज्याच्या राजकारणात उमटली. त्यांच्या या संपूर्ण राजकीय प्रवासात सुधाकररावांनी बाणेदारपणा जोपासला. कला, संस्कृती, साहित्याचे रसिक असलेल्या सुधाकरराव यांची मातीशी असलेली नाळ कायम जुळलेली होती. समाजातील वेदनांची त्यांना जाण होती. महाराष्ट्राच्या माती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुधाकरावांना चांगले ठाऊक होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी केली. ''पाणी आडवा पाणी जिरवा'' या मंत्रातून धरणे, बंधारे बांधून महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम केले आणि महाराष्ट्रात हरित क्रांतीची पहाट उगवली. वसंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुतणे सुधाकररावांनी 'जलक्रांती'चा ध्यास घेतला. सुधाकरराव यांचे दांडगे वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि तज्ज्ञांच्या विचारांचे अचूक परिशीलन या त्यांच्या गुणांमुळे ते भविष्याचा वेध सहजतेने घेत. 

   मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्याआधी त्यांनी कृषी, पाटबंधारे, शिक्षण, उद्योग, महसूल, पुनर्वसन, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, गृहनिर्माण अशी खाती सांभाळली. त्यातील अनुभवातून त्यांना एक गोष्ट जाणवली. राज्याच्या शेतीचा प्रश्न बागायती नसून कोरडवाहूचा आहे, त्यासाठी जलसंधारणाला पर्याय नाही. शेती आणि जलतज्ज्ञांशी संवाद साधताना दिवसेंदिवस भूजल पातळीत होणारी घट आणि राज्याची हळूहळू वाळवंटाकडे होत चाललेली वाटचाल लक्षात आली आणि धीरगंभीर असलेले सुधाकरराव अधिक गंभीर बनले. ''भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होऊ देणार नाही'',  ही मनाशी खूणगाठ बांधत या द्रष्ट्या नेत्याने राज्यात प्रथमच स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती केली. त्यासाठी अन्य खात्यांमधून जलसंधारणासाठी पैसा उभा केला आणि जलसंधारणांच्या कामांना चालना दिली. परंतु, अल्पावधीतच त्यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कार्याकडे नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले, ही खंत आजही जनसामान्यांच्या मनात आहे.

    मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे उभारावी, याद्वारे अधिक शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, या छोट्या प्रकल्पांमुळे शेतकरी भूमिहीन होणार नाही तसेच पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे विचार ते आपल्या भाषणांमधून मांडत असत. त्यांची जलसंधारणाची विचारधारा आणि धारणा अतिशय परिपक्व होती. सुधाकरराव हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झालेत. परंतु, त्यांचे मन सिमल्याच्या राजगृहात फारसे रमले नाही. पक्षी सायंकाळी आपल्या घरट्याकडे परततात तसे ते आयुष्याच्या सायंकाळी विधानसभेच्या लोक मायेच्या घरट्यात परतले. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेलेले सुधाकरराव मायमातीच्या ओढीने पुसद गहुलीत परतले. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेची स्थापना केली. जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या सुधाकरराव नाईक यांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष पद स्वीकारतील की नाही अशी विलासरावांना शंका होती. मात्र जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाल्याने सुधाकरराव मनातून आनंदित झाले. ठप्प झालेल्या जलसंधारण कामांना गती देण्यासाठी सुधाकरराव यांनी दृढ निश्चय केला. सुधाकररावांना प्रसिद्धीचा सोस नव्हता. स्वच्छ मन, मनाची सहृदयता आणि रसिकता त्यांच्या ठायी होती. त्यांना कार्याप्रती विश्वास होता. ते अगदी नेमके बोलत, मुद्द्याचे सांगत. जलसंधारण चळवळीसाठी सुधाकररावांनी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले. पुसद येथील त्यांचे सहकारी व तत्कालीन जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी यांना सोबत घेतले. त्यांच्या बैठकी खूप गाजल्या. जलसंधारणाच्या जागराने शासकीय यंत्रणा जागी झाली आणि जलसंधारणाच्या चळवळीत सुधाकररावांनी ऊर्जा भरली. जलसंधारण ही लोक चळवळ व्हावी, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी जलसंधारण चळवळीसाठी स्वत:ला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. कदाचित सुधाकररावांना अधिक वेळ मिळाला असता तर राज्यातील जलसंधारणाचे चित्र अधिक फलदायी ठरले असते. दुष्काळी स्थितीत महाराष्ट्र आज पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. अशावेळी सुधाकररावांच्या जलसंधारण कार्याची आठवण तीव्रतेने होते. महाराष्ट्राचे भविष्यात वाळवंट होऊ नये, ही अपेक्षा बाळगताना जलसंधारणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे

    “जलसंधारणातून समृद्धी नांदू शकते,’ हा त्यांचा चिरंतन विश्‍वास त्यांनी शेवटपर्यंत जपला. मुख्यमंत्री पदानंतर राज्य जलसंधारण सल्लागार परिषेदेचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारण ही जनचळवळ करण्यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत प्रयत्न केले. परंतु, आज सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुधाकरराव नाईक यांच्या जलक्रांतीच्या कार्यावर कुरघोडी करून त्यांच्या कर्तृत्वावर अन्याय केला आहे, 

    अशा या जीगरबाज नेत्याला  त्यांच्या स्मृतिदिनी शतशः सलाम आणि विनम्र अभिवादन ! 🙏


   -------------------------------------

 ● *डॉ. सुभाष राठोड, पुणे*

   -------------------------------------

Post a Comment

1 Comments