Subscribe Us

जनतेच्या मनातील कँबिनेट मंत्री..आमदार.मा.निलयभाऊ नाईक

 


*जनतेच्या मनातील कँबिनेट मंत्री.....आमदार.मा.निलयभाऊ नाईक*
🎂💐
""'""""""'""""""""""""""""""""""''''''''''''''
✍याडीकार,पुसद......📞9552302797.

आज 24 मार्च 2021  *आदरणीय आमदार  निलयभाऊ नाईक* यांचा वाढदिवस🎂💐याडी परीवारा तर्फे मनभर शुभेच्छा.मा.निलयभाऊ यांची जिल्हा परीषद अध्यक्ष पदाची कार्यकिर्द आठवली की आजही मनाला समाधान वाटते.मा.भुषण गगराणी साहेब  सि.ई.ओ. आणि मा.निलयभाऊ नाईक अध्यक्ष ही जोडी अंत्यत हुशार,अभ्यासु,विषयालाच़ं नाही तर गोरगरीब जनता, हजारो शिक्षक,अधिकारी, कर्मचारी यांना न्यायाने वागणूक देणारी, त्यांचे हित जपणारी होती. श्रद्धेय जलनायक  सुधाकरभाऊ नाईकसाहेबांच्या कुपादुष्टीने केवळ आपल्या करीता सर्वच जिल्हातील अध्यक्ष यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देवुन त्यावेळी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यामुळेच आपण यवतमाळ मध्येच नाही तर मंत्रालयातील सभेत शुद्धा आपसुकच आपण मंत्रीच होता.तमाम महाराष्ट्र जलनायक सुधाकरभाऊच्या कामाला प्रेरीत होवुन जवळपास सर्वच जिल्हा परीषद काँग्रेसच्या ताब्यात आल्या होत्या.आपण आणि मा.भुषण गगराणी साहेबा बरोबर चे आपले प्रत्येक पंचायत समीती मधील विकास कामाचे दौरे,आपले अभ्यास पुर्ण भाषण .मन हेलावुन टाकत होते.प्रंचड टाळयाच्या गडगडात सुरु झालेली सभा,आपले मौलीक विचार ऐकून तमाम कर्मचारी यांना.प्रेरणा मिळत होती. जिल्हा परीषद महासंघाचे अध्यक्ष मा.आर.एल.राठोड साहेब,ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दिंवगत काळे साहेब महागांव यांनी आपल्या अनेक सभा घेऊन जिल्हा आघाडी वर ठेवण्यास कायम मेहनत घेतली होती. मा.गोविंदराव पाटील काका आणि मा.सुधाकरभाऊ यांनंतर यवतमाळ ला लाभलेले आपण एकमेव   धडाडीचे अध्यक्ष होते. संपूर्ण महाराष्ट्र जलनायक सुधाकरभाऊच्या राजकीय किर्दीने गाजत असंताना आपण आता अध्यक्ष पदावरून थेट मंत्रालयात जाणार अशी जनभावना तमाम जिल्हावाशीयांची होती. पंरतु झाले उलटेच. आपल्या बरोबरीचे अनेक नेते जसे मा.अजीतदादा, मा.सुनील तटकरे, मा.अशोक चव्हाण आणि इतर.बरीच मंडळी  मंत्रीपदावर जाऊन बसली.पण आपल्या नशीबाने साथ दिली नाही  की ते नियतीलाच मंजुर नव्हते. ते देवचं जाणो. पुसदमधुन मा.डॉ. पंजाबराव देशमुख साहेब, मा.चोंढीकर पाटील साहेब, मा.डॉ. हिराणी साहेब यवतमाळ मधून मा.संदीप बाजोरीया साहेब धडाधडा विधानपरीषदेवर गेले. यवतमाळ लोकसभा मतदार संघातुन अनेक अनिवाशी मंडळी खासदार झाली. पण आपला नंबर का कुणास ठाऊक..भाऊ आला नाही हे मात्र तमाम पुसदवाशी जनतेच्या मनातील  न सुटलेले कोडेचं आहे. अजूनही पुसद मध्ये राजकीय चर्चा निघाली की हा विषय अग्रक्रमाने येतोच येतो.मनाचा मोठेपणा करून भाऊ आपण खुब दिवस काढली. संयम ठेवला .पण आमदारकीचं हे पद आपणास कायम हुलकावणी देतं होतं.कारण *संत तुकाराम महाराज  आपल्या  एका अंभगात सांगतात*............
*आपुलाची वाद आपल्या शी* या अंभगानुसार कदाचित असेलही. पण भाऊ आपला संयमाचां बांध फुटला .आपण भिमप्रतीज्ञा करून निवडणूकीला ऊभे ठाकलांत.प्रंचड गदारोळ. यवतमाळचं नव्हे तर महाराष्ट्र ढवळुन निघांल. आपणास समजावण्याचा.प्रयत्न झाला. पण आपल्या मतावर आपण ठाम.होता.त्या परीस्थीतीत कदाचित आपला निर्णय बरोबर जरी नसला .तरी  चुकीचा मात्र अजीबात नव्हता.अशी लोकांची जनभावना आजही आहे. अनेक व्यक्ती आपणास समजावून सांगत होती मी आणि. प्रा.संजय चव्हाण आणि बंजारा कर्मचारी. संघटनेचे मा.के.डी राठोड साहेब, मा.जयसिंग राठोड, मा.प्रा.प्रेम राठोड सर आणि इतर मंडळी आपल्या बंगल्यावर आलो.तेवढयात महागांव तालुक्यातील  एक जिल्हा परीषदेचे प्रभावशाली नेते आपल्या पायऱ्या उतरून आमच्या जवळ आले .आणि बोलले.आपण मा.भाऊला समजावण्यासाठी आला असाल तर कुपा करून परत जा.पण मी आणि प्रा.संजय चव्हाण यांनी हट्च धरला.त्यावर ते महणाले जा भाऊ तुम्हाला मारल्या शिवाय सोडत नाही. प्रश्न समाजाचा,असल्याने आम्ही सगळा धिर एकवटुन ...मा.निलयभाऊनी मारलं तरी चालेलं पण आपण या धर्मसंकटात  आपल्या भावना आपण मा.निलयभाऊ पंर्यत  पोहचवल्याच पाहिजे. अशी मनाची खुणगाठ बांधून सरा सर पायऱ्या चढुन मां भाऊच्या पुढयात ऊभे झालो. हिम्मत होत नव्हती..

 मा.भाऊंनी विचारंल.......बोला......मी आणि. प्रा.संजय चव्हाण एकाच सुरात सुर मिळवत.....भाऊ निवडणूक लढवण्यासाठी ही वेळ नाही... (धीर गंभीर होऊन)
भाऊ...माझ्यावर अन्याय झाला हे आपण समजु शकता पण मला संधी केव्हा हे आपण विचारून आलांत का? किती दिवस थांबायंचे एक ना अनेक प्रश्न भाऊंनी आमच्या समोर मांडली आम्ही नि:शब्द  ऐकत होतो.नेत्यांनी सांगितल्यानुसार  काहीही घडंले नाही.भाऊनी संयम ठेवुन आमच्या भावना ऐकून घेतल्या.कोणतीही आरडाओरड नाही. खंरचं माणसाच्या जिवनात उच्च शिक्षणाचा फरक नक्कीच पडतो.
.शेवट पंर्यत आपण माघार घेणार अशी पुसदच्या भोळयाभाबडया लोकांना आशा होती. पण आपण  ठाम राहीलांत भाऊ.शेवटी संत तुकाराम महाराज याच्यां अंभगानुसार *आपुलाची वाद आपल्या शी*   काही काळानंतर राजकीय उलथापालथ होऊन महाराष्टात  बिजेपीची सत्ता आली.अचानकचं आपल्या ला प्रतिक्षा असलेल्या आमदार पदावर पोहचण्यासाठी मा.देवेंद्र. फडणवीस साहेबांची फार मोठी मदत झाली. आपण आमदार  झालांत. सर्व ईले. मिडीया आणि प्रिंट मिडीयांनी आपल्या नावासमोर  महानायक वसंतराव नाईकसाहेबांचा नातु  अशी नाम उपादीने सुरुवात केली.तमाम गोरबंजारा समाजाच्या आंनदाला पारावार नव्हतां.आपण नाईकसाहेबाच्यां पावनभुमी पुसद मध्ये प्रवेश करताचं  भव्यमिरवणुक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपल्या बंगल्यापंर्यत हार गुच्छे,गुलाल,पेढे चा हिशोब नव्हता.प्रंचड मोठी मिरवणूक होती. खेडया पाडयातुन जनसागर लोटला होता.आपल्या बाजुने नसणारेही कार्यकर्ते आपल्या मिरवणुकीत सामील झाले होते .प्रंचड उत्साह आंनदाचे वारे होते.रात्री उशीरा पंर्यत आपले अभिनंदन करण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. थोडयाच दिवशात पुसद मध्ये मा.देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली... जय सेवालालने सुरु झालेल्या सभेमध्ये  भाषणाच्या शेवटी   आपल्या ला मंत्रीमंडळात सामावुन घेण्याची घोषणा  पुसदवाशीयासाठी फार महत्त्वाची,आंनदाची होती.पुसदवाशीयांना मनोमंन वाटत़ होते.नाईकसाहेबांचे गतवैभव परत येईल. गणमान्य मंडळीची मदींयाळी पुसद मध्ये पुर्वी सारखी येईल या व अशा अनेक गोष्टी ने सुखावणारा हा पुसद परीसर. मात्र .मा.देवेंद्र फडणवीस साहेबांच्या... *मी परत येईन...मी परत येईन* या घोषणेने घात झाला.आणि पुसदवाशीयांचे स्वप्न  पुर्ण झाले नाही..पुन्हा आपल्या ला मंत्रीपदाने हुलकावणी दिली... आपल्याच पक्षातील  नेते मा.प्रवीण दरेकर,मा.चित्रा वाघ,मा.भातचिखलकर यांनी बंजारा समाजा विरूद्ध आघाडी घेत असतांना आपण अधिवेशन काळातील आपले  अभ्यास पुर्ण विधानपरीषदेत केलेले  भाषण ऐकून पुन्हा महाराष्ट्र आस लावुन बसला आहे. आपल्या बोलण्यातील चढ उतार,संयम पणा,समाजाविषयी सुरु असलेली  बदनामी थांबविण्यासाठी  आपण दाखवलेली तळमळ ,पक्ष विरोधी भुमीकेत असतांना ही आपण मांडलेले मुद्धे.  आजही लोकाच्यां मनात घर करून आहे.हे आपले भाषण मी 40 ग्रुप मध्ये टाकले होते. जवळपास 12500  हजार लोकांनी पाहीले.असावे अनेक लोकांनी फोन करून विचारणा केली. *यावरून  ..भाऊ  आपण आजही *  जनतेच्या मनातील कँबीनेट मंत्रीच आहात* कारण मंत्रीपदासाठी लागनारी अँबँलीटी,पर्शनालीटी,आन् गावराणी भाषेत सांगायचं झाल्यास डोक्यालिटी शुद्धा आपणा कडे आहे.आपल्या अंगी असलेला संयम,नमपणा, उच्च शिक्षण  या जमेच्याबाजु तर आहे.पण सर्वात मोठी  राजकीय बाजु आपण महानायक वसंतराव नाईकसाहेबांचे नातु आहात. एकदिवस आपल्याला सरकार कोणत्याही पक्षाचे  असो कँबीनेट मंत्री जरूर बनवेल.कारण सरकार मधील बरीचशी मंडळी नाईकसाहेबाच्या पुण्याईने आजही मंत्रिमंडळात आहे.ते आपल्या वरील उपकाराची परतफेड करण्याची संधी शोधत असतात.आपल्याला माहितीच आहे.ज्या *मा. शरद पवार साहेबाला नाईकसाहेबांनी राज्यमंत्री केलं होतं त्या शरद पवार  साहेबांनी मा.सुधाकरभाऊनां मुख्य मंत्री बनवुन आपल्या उपकाराची परतफेड  केली होती*.हा इतीहास ताजा आहे. मा.भाऊ आप जिवो हजारो साल..🎂 *जाता जाता एवढंच...सांगेन....तांडा...आपली..आतुरतेने...वाट बघतोय*
धन्यवाद🎂💐

✍याडीकार,पुसद. ९४२१७७४३७२

Post a Comment

0 Comments